SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘रामदास कदमांनी फालतू धंदा बंद करावा’; प्रसाद लाडांचा घणाघात, महायुतीत नव्या वादाची ठिणगी!

रामदास कदमांच्या आरोपांना प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले. ‘फालतू धंदा बंद करा’ म्हणत लाड यांनी घणाघात केला. मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद पाहायला मिळतोय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 23, 2026, 07:55 PM IST | Updated: Oct 23, 2026, 08:07 PM IST
Image Credit: प्रसाद लाड यांचा इशारा
Join

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासह काही नेत्यांच्या जरांगे यांच्याशी असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना प्रसाद लाड यांनी कदमांवर जोरदार टीका केली. ‘स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी काहीही बोलू नका,’ असा टोला लगावत त्यांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, असा सल्लाही दिला.

‘आरोपांचे खंडन करतो’; प्रसाद लाडांचा पलटवार

रामदास कदम यांनी भाजप आणि आपल्यावर केलेले आरोप प्रसाद लाड यांनी फेटाळून लावले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उघडपणे जातो. यामध्ये लपवण्यासारखे काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यासोबत उदय सामंत आणि शंभूराज देसाई असल्याचे सांगत, आपण कोणतीही स्वतंत्र बैठक घेतली नसल्याचा दावाही लाड यांनी केला. या संदर्भात फोटो दाखवण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘युतीत मिठाचा खडा टाकू नका’

रामदास कदम यांना उद्देशून बोलताना प्रसाद लाड यांनी वयाचा उल्लेख करत संयम राखण्याचा सल्ला दिला. आवाज वाढवला म्हणजे आम्ही घाबरलो, असे समजू नका, असे म्हणत त्यांनी कदमांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला. स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी काहीही बोलू नये आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये विनाकारण वाद निर्माण करू नये, असेही लाड म्हणाले.

जरांगेंच्या जुन्या विधानांचा संदर्भ

2023-24 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, त्या वेळी रामदास कदम कुठे होते, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. सध्याच्या वादात जुन्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी कदमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलांबाबतच्या विधानांचा इशारा

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलांबद्दल रामदास कदम यांनी केलेल्या विधानांच्या क्लिप बाहेर काढण्याची वेळ आणू नका, असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला. कदमांच्या वक्तव्यांमुळे युतीमध्ये तणाव वाढत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली.

उदय सामंत यांनी खुलासा करावा, लाडांची मागणी

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचे उदय सामंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खंडन करावे, असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले. संबंधित नेत्यांना वेळीच समज द्यावी; अन्यथा यापुढे आपल्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं काय घडलं? 

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटी रुपयांच्या कथित देवाणघेवाणीचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे सांगितले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES