SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोहित पवारांनी स्टिंग ऑपरेशन दाखवल्यानंतर राज्यात खळबळ; MHT-CET पेपरमध्ये कसा चालयचा गैरप्रकार? ऐकून बसेल शॉक!

MHT-CET परीक्षेतील कथित गैरप्रकार समोर आणत एड्यू स्पार्क कंपनीला मिळालेले ६८० कोटींचे कंत्राट आणि SIT तपासावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले. न्यायालयीन चौकशीची मागणी करत सरकारवर निशाणा साधला.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 03, 2026, 05:40 PM IST | Updated: Nov 03, 2026, 05:53 PM IST
Image Credit: रोहित पवार
Join

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा उपस्थित केलाय. पुण्यातील सीओईपी आणि मुंबईतील व्हीजेटीआय यांसारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने सीईटी परीक्षा देतात. अशा परीक्षेच्या प्रक्रियेतच गैरप्रकार होत असतील, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी परीक्षेतील कथित गैरप्रकार कशा पद्धतीने घडतात, याचे सादरीकरण करण्यात आले. काही शिक्षकांनी आणि संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीसह एक स्टिंग ऑपरेशनही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

680 कोटींच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

परीक्षा आयोजनाशी संबंधित एड्यू स्पार्क कंपनीला देण्यात आलेल्या सुमारे 680 कोटी रुपयांच्या कामावर रोहित पवारांनी गंभीर आक्षेप घेतला. राज्यात विविध 38 टेंडरच्या माध्यमातून संबंधित कंपन्यांना एकूण 2371 कोटी रुपयांची कामे मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. तीन कंपन्या एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याचा आणि परस्पर संगनमतातून टेंडर मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला. २०२१ मध्ये तत्कालीन कौशल्य विकास मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात या कंपनीला पहिले काम मिळाल्याचे ते म्हणाले. कौशल्य विकास केंद्रासाठी केवळ कंटेंट तयार करण्याच्या कामाला 49 कोटी रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला.

SIT स्थापन झाली, पण तपासाचे काय?

एमएचटी-सीईटी गैरप्रकारांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपास आणि परीक्षा केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची घोषणा केली होती. सर्व तक्रारींची चौकशी आणि आवश्यकतेनुसार एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही दिल्याचे वृत्त आहे. मात्र, एसआयटी स्थापन होऊन दोन महिने उलटले तरी प्रत्यक्षात काय कारवाई झाली, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. केवळ एसआयटी नेमून उपयोग होणार नाही, तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

मंत्र्यांवरही कारवाईची मागणी

या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक किंवा न्यायमूर्ती कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली. या समितीत प्रवीण गेडाम आणि विवेक फणसाळकर यांचाही समावेश करावा, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कथित संभाषणाचा उल्लेख करत त्यांनी तपासावर प्रभाव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान, CET प्रकरणात विद्यार्थ्यांनी काही पुरावे दिल्याचे आणि तुकाराम मुंढे यांची भेट घेतल्याचे सांगत तपास योग्य दिशेने जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने कारवाई न केल्यास राजकीय पातळीवर हा मुद्दा हाती घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न?

पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी पवार कुटुंबातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना राजकीयदृष्ट्या एकटे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जय पवार आणि पार्थ पवार यांच्यात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षातील काही नेत्यांचे राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे हितसंबंध दुखावले असल्याचे ते म्हणाले. काही नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES