• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!

'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!

दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आलीय. रोहित पवारांवर टीका, मत्स्य व्यावसायिकांना कर्जमाफी आणि मोदी-पवार संवादावरही भाष्य केलय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 04, 2026, 08:47 PM IST|Updated: Nov 04, 2026, 09:06 PM IST
joinshare
'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!
Image Credit: नितेश राणे

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

2

शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

3

'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!

4

"प्रत्येक व्यवसायाला व्यासपीठ मिळायलाच हवे": मराठी उद्योजकांसाठी डॉ ॐकार हरी माळी यांची योजना

5

दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, चांदी 10 हजारांनी तर सोनं 3 हजार 500 रुपयांनी वाढलं, पाहा सोनं चांदीचे ताजे रेट्स

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळीच्या व्हिडीओवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयाच्या निर्देशानंतरही थांबण्याची चिन्हे नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मिर्झावर टीका केली. ईद, मोहरम आणि बकरी ईदच्या वेळीही तिने पर्यावरणाबाबत भूमिका मांडावी, असे ते म्हणाले. याशिवाय रोहित पवार, सहर शेख, राहुल गांधी आणि मत्स्य व्यावसायिकांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.

'सर्व धर्मांच्या सणांची काळजी घ्या'

दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, हा प्रश्न मुंबई महापालिकेला विचारला पाहिजे. व्हिडीओ अपलोड करण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिया मिर्झा हिंदू सणांच्या वेळी पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन करते; मात्र ईद, रमजान, मोहरम किंवा बकरी ईदच्या वेळी अशी भूमिका घेताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. सर्व धर्मांच्या सणांबाबत समान भूमिका घेतली तरच सर्वधर्मसमभाव दिसेल, असे राणे म्हणाले.

रोहित पवारांवर हज यात्रेचा उल्लेख करत निशाणा

रोहित पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना राणे यांनी हज यात्रा, रमजान आणि पश्चिम बंगालमधील मशिदीच्या देणगीतील कथित अनियमिततेचा उल्लेख केला. या विषयांवर रोहित पवार बोलत नाहीत; मात्र हिंदू सणांच्या वेळीच भूमिका घेतात, असा आरोप त्यांनी केला. हिंदू सणांपुरतीच त्यांची भूमिका मर्यादित आहे का, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. 

सहर शेख यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य

इकडे हिरवेकरण करण्यासाठी तिला सुपारी दिली गेली आहे. मुघलाची आठवण येत असेल तर ती पाकिस्तानात गेली तर आम्हाला त्याची काळजी नसेल.असे हिरवे साप आम्हाला देशात नको आहे. मुघलाची आठवण येत असेल तर वडिलांना घेऊन मुघलाकडे गेली तर आमची हरकत नाही, असे राणे म्हणाले. ती हिंदू राष्ट्रांमध्ये निवडून आली ही ती विसरली असावी.. मुघलांना गाडून तयार झालेली ही शिवाजी महाराजांची भूमी.. आणि महादेवाची भूमी आहे.  हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही हे त्यांनी आठवण ठेवावं नाहीतर असे पार्सल आम्हाला पाकिस्तान मध्ये पाठवता येतात, असेही ते पुढे म्हणाले.

राहुल गांधींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. या संवादाचे राणे यांनी कौतुक केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपण्याचा आदर्श मोदी यांनी घालून दिला आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या पंतप्रधानांवरील टीकेला उत्तर देताना 'वह कितना छोटा आदमी है, हमारे मोदी जी कितने बड़े हैं' अशी टिप्पणी त्यांनी केली.

मत्स्य व्यावसायिकांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलती?

राज्यात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती आणि कर्जमाफीच्या धर्तीवर मत्स्य व्यावसायिकांनाही लाभ देण्याचा सरकारचा विचार असल्याचे राणे म्हणाले. मत्स्यबीज उत्पादनासाठीही मदतीची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित निकषांमध्ये बदल करून मत्स्य व्यवसायासाठी मदतीची व्याप्ती वाढवल्याचा दावाही त्यांनी केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nitesh Rane
Mumbai
Mumbai News