• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

Shubman Gill About Rohit Sharma : भारताने न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला. या सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत शुभमन गिलने रोहित शर्माला सामना पलटवण्याचं क्रेडिट दिलं.

Reported Bypooja pawar
Published: Nov 04, 2026, 08:49 PM IST|Updated: Nov 04, 2026, 09:36 PM IST
joinshare
शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य
Image Credit: शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

2

कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा

3

दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी

4

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

5

शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Shubman Gill About Rohit Sharma : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवार 4 नोव्हेंबर रोजी पहिला सामना ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने डकवर्थ लुईस स्टर्न (DLS) नियमानुसार 5 विकेट राखून विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली, तर अनुभवी रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही आणि तो शून्यावर बाद झाला. रोहित शर्मा अपयशी ठरला असला तरी सामना फिरवण्यात त्याचे योगदान असल्याचे गिलने मान्य केले.

रोहित शर्माने न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असताना डेरिल मिचेलला जबरदस्त रन आउट केलं होतं. शुभमन गिल सामन्यानंतर टर्निंग पॉईंट बद्दल बोलत असताना याच रन आउटबाबत बोलला. हा रन आउटमुळे सामन्याचा मोमेंटम बदलला. हा रनआउट पहिल्या इनिंग दरम्यान झाला जेव्हा ग्लेन फिलिप्स आणि डेरिल मिचेल यांच्यात चांगली भागीदारी झाली होती.

काय म्हणाला शुभमन गिल?

सामन्यानंतरच्या मॅच प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना शुभमन गिलने सांगितले की, 'आमची गोलंदाजी अतिशय उत्तम होती. फिल्डिंग सुद्धा उत्कृष्ट झाली. रोहित भाईचा रन-आउट होण्याचा प्रसंग सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलणारा ठरला. मिचेल आणि फिलिप्स यांच्यातील भागीदारी खूप धोकादायक वाटत होती; या दोघांनी भारतात किती चांगली फलंदाजी केली होती, हे आपण पाहिलेच होते. एकूणच आमच्या संघाचे प्रदर्शन अतिशय चांगले राहिले'.

हेही वाचा : विराटने केल्या 74 धावा, अर्शदीपने घेतल्या 4 विकेट्स तरी अंशुल कंबोज कसा ठरला प्लेअर ऑफ द मॅच?

अंशुल कंबोजचं केलं कौतुक :

न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अंशुल कंबोजने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 10 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा देऊन 2 विकेट आपल्या नावावर केल्या. यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. अंशुलबद्दल बोलताना गिल म्हणाला, 'अंशुल अशा प्रकारचा गोलंदाज आहे जो या परिस्थितीसाठी अगदी योग्य आहे. तो सातत्याने चांगल्या गतीने गोलंदाजी करतो आणि बॉलला सीम मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. जुन्या बॉलने देखील अंशुल उत्तम गोलंदाजी करतो. आम्हाला असे वाटले की जेव्हा खेळपट्टीवरून फारशी मदत मिळत नसते, तेव्हा तो अतिरिक्त बाउन्स मिळवू शकतो. त्याची गती आणि आज रात्री त्या दोघांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते पाहणे खरोखरच अद्भुत होतं'.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rohit Sharma
Team india
Cricket News
News in Marathi