कोकणातील अस्सल हापूस म्हणजे महाराष्ट्रातील खवय्यांचा जीव की प्राण मात्र याच हापूसबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. रत्नागिरी- कोकणच्या हापूस विरुद्ध वलसाड गुजरात हापूस वादात मोठी घडामोड समोर येतेय. कोकणच्या हापूसला वलसाड गुजरात हापूसने आव्हान दिलं आहे. गुजरातने केलेल्या अर्जावर चेन्नईमध्ये अंतिम सुनावणी पार पडली आहे. सुनावणी दरम्यान GI रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना एक महत्त्वाची सूचना केली आहे.
2018 मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी 'कोकण हापूस'ला पहिले आणि एकमेव GI मानांकन मिळाले. 2023 मध्ये भारतीय किसान संघ (गांधीनगर) आणि नवसारी कृषी विद्यापीठाने 'वलसाड हापूस' नावाने स्वतंत्र GI मानांकन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. याला कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस उत्पादक संस्था आणि बागायतदारांनी या दाव्याला कडाडून विरोध केला आहे. कोकणची जमीन, हवामान आणि चव यातील तांत्रिक व वैज्ञानिक फरक पुराव्यानिशी मांडण्यात आले आहेत.
भौगोलिक वैशिष्ट्यानुसार कोकणातल्या पाचही जिल्ह्यातील हापूसची चव त्याचा रंग त्याची साल ही वेगळी. अविट गोडी मुळे कोकणातला हापूसला वेगळा दर्जा. या दर्जाची तुलना गुजरातच्या वलसाड आंब्याशी होणार नाही. त्यामुळे ऑफिसचं जीआय मानांकन गुजरातला देऊ नये. अन्यथा कोकणातला अंबा बागायतदार रस्त्यावर उतरेल. केंद्र आणि राज्य सरकारनं या संदर्भातील भूमिका जाहीर करावी, अशी मागणी कोकणातल्या आंबा बागायदारांनी केली आहे.
कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस उत्पादक संस्था आणि बागायतदारांनी या दाव्याला कडाडून विरोध केला आहे. कोकणची जमीन, हवामान आणि चव यातील तांत्रिक व वैज्ञानिक फरक पुराव्यानिशी मांडण्यात आले आहेत. वलसाड हापूसला वेगळं GI मिळावं, यासाठी गुजरातने केलेल्या अर्जावर चेन्नईमध्ये अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी दरम्यान GI रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना एक महत्त्वाची सूचना केली आहे. समाजाच्या मोठ्या हितासाठी दोन्ही बाजूंनी तडजोड करावी, सामंजस्याने मार्ग काढावा, असं रजिस्ट्रीने सांगितलंय.
दरम्यान, सुनावणी संपली असून आता निकाल ठेवला गेलाय राखीव. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सुनावणीनंतर निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने आणि हापूस उत्पादक संस्थेने याला जोरदार विरोध केला आहे.
मानांकनासाठी कोणी किती प्रयत्न केले तरी कोकणच्या हापुस आंब्याचे महत्व कधीच कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. कर्नाटकात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. बिगरमोसमी आंब्याचे उत्पादन घेतले जाते हे सांगताना वलसाडच्या आंब्यासाठी त्यांचे ते प्रयत्न करतील. कोणी किती प्रयत्न केले तरी कोकणच्या हापूस आंब्याची चव आगळी वेगळीच राहणार आहे. प्रत्येकाला आपल्या राज्यात जे जे पीक येते त्याच मानांकन करण्याचा अधिकार राहू शकतो असंही मत त्यांनी स्पष्ट केलं आहे.