SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सह्याद्रीच्या पर्वतरांगा भेदून तीन नवे बोगदे बांधणार, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा प्रकल्प, किती जिल्ह्यांना जोडणार, कसा असेल मार्ग? वाचा A To Z

सह्याद्रीच्या पर्वतरांगांना भेदून तीन नवे बोगदे बांधण्यात येणार असून कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास होणार वेगवान; महाबळेश्वर-तापोळ्याचा कायापालट होणार

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 21, 2026, 11:19 IST | Updated: Nov 21, 2026, 11:24 IST
Image Credit: three proposed road tunnels through Sahyadri range connecting Konkan with Western Maharashtra
Join

प्रवासाचे अंतर कमी व्हावे आणि वेग वाढावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध प्रकल्पाचे आयोजन करण्यात येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास वेगवान होण्यासाठी तीन नवे बोगदे खोदण्यात येणार आहेत. यामुळं नागरिकांचा मोठा वळसा घालून जाण्याचे कष्ट वाचणार आहेत. तसंच, या प्रकल्पामुळं महाबळेश्वर-तापोळ्याचा कायापालट होणार आहे.

सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमधून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी तीन नवीन भुयारी मार्ग अर्थात बोगद्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर-सातारा आणि रघुवीर घाट-सातारा या मार्गांवर बोगदे प्रस्तावित असून, या प्रकल्पांमुळे घाटरस्त्यांवरील अवघड प्रवासाचा त्रास कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

प्रस्तावित तीन मार्गांमध्ये पोलादपूर-जांभळी (वाई), खेड-सातारा आणि मेढा-तापोळा या मार्गांचा समावेश आहे. पोलादपूर येथून वाई तालुक्यातील जांभळीपर्यंत भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना असून महाबळेश्वरला जोडण्यासाठी स्वतंत्र जोडरस्त्याचाही विचार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या खेड-सातारा मार्गासाठी रघुवीर घाट आणि कास पठाराखालून भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. तर तिसऱ्या मार्गात पाचवड-मेढा नवीन माहामार्गाशी जोडून मेढा ते तापोळादरम्यान भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना आहे.

महाबळेश्वर आणि तापोळा परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी नियोजनामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच तापोळा येथे केबल-स्टेड ब्रिज आणि तापोळा-आपटी पूल उभारण्यात येत असून, पसरणी घाटाचे रुंदीकरणही केले जाणार आहे.

एकूणच, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून होणारी ही बोगद्यांची उभारणी प्रत्यक्षात आल्यास कोकणातील खेड-सातारा हा मार्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील  रघुवीर घाट आणि कास पठाराखालून नेण्यात येऊ शकतो. त्यामुळं दळणवळणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES