टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह, घर आणि ऑफिसची केली रेकी
Tiger Shroff Attack News : टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या घराची तर रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा रेकी केली होती. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Tiger Shroff Attack News : मागील रविवारी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला होता. यात टायगरच्या कारवर तीन अज्ञात लोकांनी गोळीबार करत तीन राउंड फायर केले. यात सुदैवाने टायगरला किरकोळ दुखापत झाली असली तरी यात त्याच्या ड्रायव्हर मात्र गोळी लागून गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आज आरोपींना मुंबईतील किला कोर्टात हजर केलं जाणार आहे. असं असतानाच त्या संदर्भात आता अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची रेकी केली होती. एवढंच नाही तर अभिनेता रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा आरोपींनी रेकी केली असल्याचं समोर आलं आहे. सदर बातमीमुळे इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे. रणबीर कपूर हा देखील हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलंय.
रणबीर कपूरच्या घराची रेकी :
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्याआधी रणबीर कपूरच्या घराची सुद्धा रेकी केल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे. रणबीरच्या बांद्रा येथील घराची रेकी करण्यात आली, त्यामुळे टायगरच नाही तर बॉलिवूडमधील इतर काही सेलिब्रिटी देखील हल्लेखोऱ्यांच्या रडारवर होते अशी माहिती समोर आली आहे. यामुळे सेलिब्रिटींमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. सलमान खानच्या घरी सशस्त्र कमांडो तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या घराबाहेर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.
रणवीर सिंहच्या ऑफिसची रेकी :
अभिनेता टायगर श्रॉफच्या संदर्भातील गोळीबाराच्या घटनेच्या तपासात, मुंबई गुन्हे शाखेला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या अंकितने ज्याला यापूर्वी पकडलेल्या फूल सिंग, रेहान आणि हृतिक या तीन शूटर्ससोबत अटक करण्यात आली होती. त्याने चौकशीदरम्यान कबूल केले की, त्यांनी अनिल पंडित याच्या सूचनेवरून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची रेकी केली होती.