SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुकाराम मुंढेंचा प्रोटीन पावडरवर मोठा ॲक्शन प्लॅन! जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान; तुमच्यावर काय परिणाम?

प्रोटीन पावडर, पोषणपूरक उत्पादने आणि जेवणाला पर्याय म्हणून विकल्या जाणाऱ्या पदार्थांची सखोल तपासणी करण्याची भूमिका महाराष्ट्र FDA ने घेतली आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 15, 2026, 02:13 PM IST | Updated: Oct 15, 2026, 02:25 PM IST
Image Credit: एफडीएची कारवाई
Join

शरीर कमावण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर आणि पोषणपूरक उत्पादनांचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या उत्पादनांची गुणवत्ता, त्यातील घटक आणि पाकिटांवरील दाव्यांची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उत्पादकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


प्रोटीन पावडर आणि पोषणपूरक उत्पादनांची तपासणी

प्रोटीन पावडर, पोषणपूरक उत्पादने आणि जेवणाला पर्याय म्हणून विकल्या जाणाऱ्या पदार्थांची सखोल तपासणी करण्याची भूमिका महाराष्ट्र FDA ने घेतली आहे. या उत्पादनांचा वापर विशेषतः तरुणांमध्ये वाढत आहे. शरीरसौष्ठव, वजन नियंत्रण आणि स्नायूंच्या वाढीसाठी अनेक जण अशा उत्पादनांकडे वळतात. मात्र, उत्पादनाच्या पाकिटावर दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील घटक यामध्ये तफावत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

पाकिटावरील माहिती आणि आरोग्यविषयक दावे तपासणार

काही उत्पादनांमध्ये विशिष्ट घटक असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्ष तपासणीत ते घटक पुरेशा प्रमाणात नसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे FDA उत्पादनातील घटक, पोषणमूल्ये, पाकिटावरील माहिती आणि उत्पादकांनी केलेले आरोग्यविषयक दावे यांची तुलना करणार आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच त्याची विक्री कशी केली जाते, ग्राहकांना कोणती माहिती दिली जाते आणि संबंधित नियमांचे पालन होते का, यावरही लक्ष दिले जाणार आहे. नियमभंग आढळल्यास संबंधित उत्पादनांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

प्रोटीन पावडर म्हणजे संपूर्ण आहाराचा पर्याय नाही

तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन पावडर घेतल्याने संतुलित आहाराची गरज संपत नाही. शरीराला प्रथिनांसोबत कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटकांचीही आवश्यकता असते. त्यामुळे केवळ पूरक उत्पादनांवर अवलंबून राहणे योग्य नाही. आहारातून आवश्यक पोषक घटक न मिळाल्यास शरीराच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पूरक पदार्थ घेणे टाळा

बाजारात अनेक पोषणपूरक उत्पादने सहज उपलब्ध असल्याने काही जण वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करतात. मात्र, प्रथिने, जीवनसत्त्वे किंवा खनिजे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मधुमेह किंवा अन्य आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कोणतेही पूरक उत्पादन सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. उत्पादनावरील सूचना व घटकांची यादीही काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

FDA च्या या भूमिकेमुळे पोषणपूरक उत्पादनांच्या बाजारपेठेतील गुणवत्ता आणि पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्पादनातील घटक, पोषणमूल्ये, पाकिटावरील माहिती आणि विक्रीसंबंधी नियमांची तपासणी केली जाणार आहे. दोष आढळल्यास संबंधित उत्पादन किंवा उत्पादकावर लागू कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES