रेल्वे स्थानकांवरील दुकानांत आता चहा-कॉफी विक्री बंद, पण 'हे' सामान मिळणार; वाचा ही यादी!
मध्य रेल्वेवरील स्थानकात असलेल्या किराणा दुकानात आता चहा किंवा कॉफी मिळणार नाही. का असा निर्णय घेण्यात आला.
प्रवासाचा शिण घालवण्यासाठी चहा हा अत्यंत गरजेचा असतो. रेल्वे स्थानकात छोट्या छोट्या स्टॉलवर चहा-कॉफीची विक्री करण्यात येते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्यास अनेक प्रवासी या स्टॉलवरुन चहा-कॉफी घेतात. मात्र आता रेल्वे स्थानकांवरील किराणा किऑस्कमध्ये चहा, कॉफी आणि शिजवलेले खाद्यपदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने स्थानकांवरील या किराणा कि ऑस्कमध्ये विक्रीसाठी परवानगी असलेल्या आणि प्रतिबंधित वस्तूंची यादी निश्चित केली आहे. स्थानकांवरील किराणा किऑस्कच्या कामकाजात एकसमानता आणण्याबरोबरच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष पाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
किराणा दुकानांच्या नावाखाली होणारी अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री रोखणे आणि एकसमानता आणणे हा यामागचा उद्देश आहे. किराणा दुकानांवर चहा कॉफीवर बंदी आणली असती तरी प्रवाशांना नेहमीप्रमाणे स्थानकांवरील अधिकृत चहाचे स्टॉल, कॅन्टीन आणि फूड प्लाझा याठिकाणी चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थ मिळणार आहेत. थोड्यात, सामान्य चहाच्या अधिकृत स्टॉलवर कोणतीबी बंदी नसून किराणा दुकानातून चहा-कॉफी खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष स्वच्छता मोहिम 6.0 चा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेच्या किराणा स्टॉलवर काय मिळणार?
रेल्वे स्थानकात परवानगी देण्यात आलेल्या किराणा दुकानात तांदूळ, गहू, इतर धान्ये, पीठ, डाळी, खाद्यतेल, साखर, गूळ, मीठ, मसाले आणि सुकामेव यांसारख्या किराणा वस्तू तसेच रेल्वेने मान्यता दिलेल्या बँडचे पॅकेज्ड पिण्याचे पाणी, फळांचे रस, ऊर्जा पेये आणि शीतपेयांनाही परवानगी देण्यात आली आहे.
तसंच, या यादीत बिस्किटे, पॉपकॉर्न, विप्स, इन्स्टंट नूडल्स, तयार आहद्यपदार्थ, सॉस, जॅम आणि लोणची यांसारख्या पॅकबंद वस्तूंची विक्री करता येणार याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, पराठे, कटलेट यांसारखे शिजवण्यासाठी तयार असलेले गोठवलेले पदार्थ आणि मध्यम आकाराच्या डीप फ्रीजरमध्ये आइस्क्रीम ठेवण्यास परवानगी असेल.
या यादीमध्ये साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट, टिश्यूज, नॅपकिन्स आणि टॉयलेट पेपर यांसारख्या वैयक्तिक काळजी आणि स्वच्छतेच्या उत्पादनांचाही समावेश आहे. डायपर्स, बेबी फूड आणि वाइप्स यांसारखी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्य, पाळीव प्राण्यांच्या काळजीची उत्पादने, स्टेशनरी आणि लहान उपयुक्त वस्तूंचीही विक्री केली जाऊ शकते.