SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

खळबळ! पतीने शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केले; चार महिन्यांतच विवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडकोतील वानखेडेनगरमध्ये 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 01:17 PM IST | Updated: Oct 14, 2026, 01:21 PM IST
Image Credit: Chhatrapati Sambhaji Nagar
Join

शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्या मंडळींकडून सतत हिणवले जात होते. या सगळ्या मानसिक त्रासातून छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

संजना नीलेश शेजवळ असे मृत विवाहितेचे नाव असून लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. 13 ऑक्टोबर रोजी वानखेडेनगर येथील सासरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संजनाच्या वडिलांनी पतीने शासकीय नोकरीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

माहेरहून पैसे आणणे, सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना केशवनगर येथे घडली. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74, रा. केशवनगर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  त्यावरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णा हिचा विवाह 2018 मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES