'जातीपातीवर मोठं होऊ पाहणाऱ्यांना नेत्यांचे भविष्य...'; भगवान भक्ती गडावरुन पंकजा मुंडेंच्या नेत्यांना इशारा
दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवान भक्ती गडावरुन पंकजा मुंडे यांनी जातीपातीवर मोठं होऊ पाहणाऱ्या नेत्यांना इशारा दिला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे सुरू असून, मेळाव्यासाठी रात्रीपासूनच समर्थकांनी गर्दी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एक जुटीने त्याच्याशी लढा देऊ असं साद त्यांनी समर्थकांना घातली.
या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की, हे जे दशक आहे हे सीमोल्लंघनाचं वर्ष आहे. भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईने मी इथे आहे. महाराष्ट्रात दुष्काळ आहे दसरा मेळावा कसा होणार आहे. उन्हाच्या तडाक्यात दसरा मेळाव्या कसा होणार, असं मला पत्रकार विचारत होते. पण मी पुढच्या विचार न करता क्षणात निर्णय घेते. ही शक्ती गोपीनाथ मुंडेंच्या लेकीची शक्ती आहे. मधमाशी कसे कष्ट करतात तशी माझी ही लेकरं कष्ट करतात. शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य सीतेमध्ये आहे. आता हे युग झेजे
लोकांसाठी मी माझं आयुष्य वाहून दिले आहेत. जातीच्या या भिंती या मनगटाने मोडून काढायच्या आहेत. दुष्काळ कोणा गरीब किंवा श्रीमंतवार वेगळा येत नाही. या दुष्काळात जातीच्या भिंती तोडून काढल्या आहेत. मला सर्वत्र प्रेम वाटायचं आहे. मी अंतरवाली गाव दत्तक घेतलं आहे. आता मी अंतरवालीचा विकास करायचा आहे. जातीपातीवर मोठं होऊ पाहणाऱ्यांना नेत्यांचे भविष्य नाही. दुष्काळाविरोधात एक मुठीने काम करायचं आहे.
पुढच्या मेळावा होणार की नाही माहिती नाही. अशावेळी त्यांनी उपस्थितीत लोकांना विचारलं मेळावा बंद करायचा तर ...कार्यकर्त्यांनी एक आवाज नाही असा प्रतिसाद दिला. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्यात की, किती सिद्ध करायचं की.