• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

दुष्काळी जालन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी सुरू झाली आहे. इस्लामवाडी येथील टेकडीवरून ड्रोनच्या साहाय्याने क्लाऊड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. सुमारे 400 मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 01, 2026, 08:12 PM IST|Updated: Nov 01, 2026, 08:15 PM IST
joinshare
महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळी पर्यंत सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली येणार? 2026 मधील सोन्याच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार?

दिवाळी पर्यंत सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली येणार? 2026 मधील सोन्याच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार?

2

नमन धीरचा विकेट घेतला अन् ब्लेअर टिकनरचं अनोखं सेलिब्रेशन! जाणून घ्या सेलिब्रेशन मागचं कारण, पहा Video

3

भाऊबीजला भावासाठी परफेक्ट गिफ्ट शोधताय? उपयुक्त आणि स्टायलिश गिफ्ट्सची खास यादी

4

पीएफ खात्यातील पैसे आता व्हॉट्सअ‍ॅपवर! बॅलन्स ते पासबुक एका मेसेजवर; आजपासून काय बदललंय?

5

महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जालना : शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दुष्काळाच्या या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. विमानातून नव्हे, तर चक्क ड्रोनच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग जालन्यात सुरू करण्यात आला. स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचा वापर करून करण्यात येणारा हा प्रयोग नेमका काय आहे?

यामुळे खरंच पाऊस पडणार का?

दुष्काळ... शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणारं संकट. यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका जालन्यासह राज्यातील अनेक भागांना बसला आहे. खरीप हंगामावर पाणी फिरलंय, तर आता रब्बी हंगामही संकटात सापडण्याची भीती आहे.

पिकं करपलीत, पाण्याचे स्रोत आटतायत आणि शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी जालन्यात एक अनोखा प्रयोग हाती घेण्यात आला. तो म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा! जालना शहराजवळील इस्लामवाडी टेकडीवरून स्वदेशी बनावटीच्या ड्रोनच्या साहाय्याने हा प्रयोग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, स्वदेशी ड्रोनचा वापर करून क्लाऊड सीडिंग करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग नेमका कसा असेल?

ड्रोनद्वारे क्लाऊड सीडिंग केले जाते
कृत्रिम पावसासाठी योग्य ढगांची निवड
इस्लामवाडी टेकडीवरून ड्रोनचं उड्डाण
400 मीटर उंचीवर ढगांमध्ये सीडिंग द्रव्याची फवारणी
ढगांतील सूक्ष्म जलकणांच्या प्रक्रियेला चालना
अनुकूल वातावरण असल्यास पावसाची शक्यता

आतापर्यंत कृत्रिम पावसासाठी प्रामुख्याने विमानांचा वापर करण्यात आला. मात्र,  विमानांच्या तुलनेत ड्रोनचा वापर कमी खर्चात, गरजेनुसार आणि ठरावीक भागात करता येऊ शकतो का, याची चाचपणी या प्रयोगातून केली जात आहे. पुण्यातील  आयआयटीएमने सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात क्लाऊड सीडिंगवर संशोधन केलंय..त्यामुळे जालन्यातील ड्रोन प्रयोगाकडेही आता आशेने पाहिलं जात आहे.

एकीकडे दुष्काळाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसाला आमंत्रण देण्याचा हा प्रयत्न जालन्यात सुरू झाला आहे. अर्थात, ड्रोनने फवारणी केली म्हणजे पाऊस पडेलच, असं नाही. ढगांची स्थिती, हवेतील आर्द्रता आणि अनुकूल वातावरण या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे स्वदेशी ड्रोनच्या माध्यमातून होणारा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Weather
Weather News