Gold Price Prediction: सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण होत आहे. चांदीच्या दरात 39,000 पेक्षा जास्त घट झाली. सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे दसऱ्याला सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोनं चांदीच्या दरातील घसरण सातत्याने सुरुच आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं चांदीचे दर कमी झाले आहेत. दिवाळी पर्यंत सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली येऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
1 ऑक्टोबर 2026 रोजी 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,687 होता. 30 ऑक्टोबर 2026 ला सोन्याचा दर 140,054 झाला. एकूण आकडेवारी पाहिली असता एका महिन्यात सोन्याचे दर 8,663 रुपयांनी घसरले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा दर प्रति किलोग्राम 220,829 होता. 30 ऑक्टोबर 2026 ला चांदीचा दर 181,344 रुपयांवर आला. गेल्या महिन्यात चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 39,485 ची घट झाली.
दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,39,030 आहे. मुंबईत सोन्याचा दर 1,38,880 इतका आहे. तर चांदीचा दर 2,16,000 प्रती किलो इतका आहे.
अमेरिकी सरकारी रोख्यांवरील वाढता परतावा हे इंडियन गोल्ड मार्केट क्रॅश होण्याचमागचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. जानेवारी 2026 मध्ये जेव्हा सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. तेव्हा 10-वर्षीय अमेरिकी सरकारी रोख्यांवरील परतावा सुमारे 4.24 टक्के होता. 5 ऑक्टोबरपर्यंत तो 5.31 टक्के पर्यंत वाढला होता. दरम्यान, महागाई विचारात घेणारा 10 -वर्षीय रोख्यांवरील परतावा 2.92 टक्के पर्यंत वाढला होता. जो 2008 च्या विक्रमी पातळीच्या जवळ होता.
जागतिक बाजारात घडणाऱ्या घडामोडी पाहता सोन्याचा दर एक लाखाच्या खाली येवू शकतो असा अंदाज तज्ञानी वर्तवला आहे. इतकचं नाही तर बँक ऑफ अमेरिकाने (BofA) देखील सोन्याचे दर एक लाखाच्या खाली येऊ शकतात. असा अंदाज वर्तवला आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या दाव्यानुसार सोन्याचा दर प्रति औंस सुमारे 3,700 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. भारतीय चलनात, हा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.12 लाख रुपये इतका होतो. जानेवारी 2026 मध्ये सोन्याने प्रति औंस सुमारे 5,595 डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता. यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू झाली असं बँक ऑफ अमेरिकाना अहवालात म्हंटले आहे.
सोन्याच्या दरात अस्थिरता असली तरी सोन्याचा दर 1.48 ते 1.39 लाख रुपये या दरम्यान स्थिरावला आहे. घसरण कायम राहिल्यास सोन्याचे दर घसरू शकतात. सोन्याचा दर 3,250 डॉलर गेला तर भारतीय चलनानुसार प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 98 हजार रुपयांपर्यंत येवू शकतो. सोन्याचा दर 1,54 ते 1,55 लाखावर गेला तर सोन्याच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.
दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दराने सर्वांची जोप उडवली होती. जानेवारी 2026 मध्ये सोन्याचा दर 1.83 लाखांपर्यंत पोहचला होता. 2026 मध्ये चांदीचा दर देखील प्रति किलो 4 लाखाच्या वर पोहचला होता.