• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /पीएफ खात्यातील पैसे आता व्हॉट्सअ‍ॅपवर! बॅलन्स ते पासबुक एका मेसेजवर; आजपासून काय बदललंय?

पीएफ खात्यातील पैसे आता व्हॉट्सअ‍ॅपवर! बॅलन्स ते पासबुक एका मेसेजवर; आजपासून काय बदललंय?

ईपीएफओने व्हॉट्सअ‍ॅपवर पीएफ बॅलन्स, पासबुक आणि अलीकडील व्यवहार पाहण्याची सुविधा सुरू केली आहे. तसेच 1 हजार रुपयांपर्यंतच्या पात्र निष्क्रिय पीएफ खात्यांचे पैसे आपोआप जमा होणार आहेत.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 01, 2026, 08:54 PM IST|Updated: Nov 01, 2026, 09:06 PM IST
joinshare
पीएफ खात्यातील पैसे आता व्हॉट्सअ‍ॅपवर! बॅलन्स ते पासबुक एका मेसेजवर; आजपासून काय बदललंय?
Image Credit: ईपीएफओ पीएफ तपास

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मोदी आणि त्यांच्या आईच्या AI व्हिडीओ प्रकरणी काँग्रेसच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

मोदी आणि त्यांच्या आईच्या AI व्हिडीओ प्रकरणी काँग्रेसच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

2

दिवाळीत धो धो पाऊस? महाराष्ट्राच्या हवामानात भयानक बदल, भारतातील 21 राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट

3

घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल अंडा खिमा; 10 मिनिटांत तयार होणारी झटपट रेसिपी

4

महाराष्ट्रात सावकारी कर्जवसुलीला कायमचा लगाम? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

5

दिवाळी पर्यंत सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली येणार? 2026 मधील सोन्याच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने 1 नोव्हेंबर 2026 रोजी व्हॉट्सअ‍ॅप आधारित सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 74 व्या स्थापना दिनानिमित्त या सुविधेचे उद्घाटन केले. यामुळे सदस्यांना पीएफ खात्यातील शिल्लक, पासबुकची माहिती आणि अलीकडील पाच व्यवहार व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाहता येणार आहेत. आजपासून काय बदललंय? याचा पीएफ खातेदारांवर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.

कोणत्या सुविधा मिळणार?

या सेवेमुळे पीएफ खात्यातील जमा रक्कम, अलीकडील व्यवहार आणि पासबुकची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. तसेच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PMVBRY) संदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन आणि मदतही मिळणार आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांना किरकोळ माहिती मिळवण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊ शकते.

निष्क्रिय खात्यांचे पैसे आपोआप मिळणार

ईपीएफओने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधार पडताळणी पूर्ण झालेल्या आणि निष्क्रिय असलेल्या ज्या पीएफ खात्यांमध्ये 1 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, अशा पात्र खात्यांचे पैसे मिळवण्यासाठी सदस्यांना स्वतंत्र क्लेम दाखल करावा लागणार नाही. आवश्यक ओळख आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ईपीएफओ स्वतःच पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे एक लाख खात्यांना फायदा होण्याचा अंदाज असून, त्यात एकूण पाच कोटी रुपयांची रक्कम आहे.

आठ कोटी सदस्यांना सेवा देणारी यंत्रणा

ईपीएफओ देशातील सुमारे आठ कोटी योगदान देणाऱ्या सदस्यांना आणि 85 लाख पेन्शनधारकांना सेवा देते. संस्थेच्या व्यवस्थापनाखाली जवळपास 32 लाख कोटी रुपयांचा निवृत्ती निधी आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सारख्या लोकप्रिय माध्यमातून सेवा उपलब्ध होणे ही डिजिटल सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कसा फायदा?

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते. विशेषतः वारंवार नोकरी बदलणाऱ्या किंवा जुन्या पीएफ खात्यांची माहिती मिळवू इच्छिणाऱ्या सदस्यांना याचा फायदा होईल. असे असले तरी व्हॉट्सअ‍ॅपसेवेचा अधिकृत क्रमांक आणि वापरण्याची संपूर्ण प्रक्रिया ईपीएफओच्या वेबसाईटवरूनच तपासावी. अनोळखी क्रमांकावर यूएएन पासवर्ड, ओटीपी किंवा बँक तपशील देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
EPFO
PF