SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

विलासरावांच्या लेकाचा भाजपाला धक्का! धीरज देशमुखांनी मोठ्या विजयासहीत सत्ता राखली; देशमुख विरोधकाला मिळाली अवघी 2 मतं

लातूरमधील ही निवडणूक राज्यभरामध्ये चर्चेत असतानाच या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. नेमकं कोण कुठून आणि कसं जिंकलंय जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 16, 2026, 12:06 PM IST | Updated: Nov 16, 2026, 12:20 PM IST
Image Credit: देशमुख विरुद्ध निलंगेकर असा संघर्ष रंगला (फाइल फोटो)
Join

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेचा फैसला लागण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 99.40 टक्के मतदान झाल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 999 पैकी 993 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एका बाजूला परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, तर दुसऱ्या बाजूला सहकार पॅनलमधून काँग्रेसचे आमदार तथा दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख अशी ही थेट लढत होत आहे. 15 पैकी 12 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये देशमुख यांच्या सहकार पॅनलने 8 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय मिळाला. धीरज देशमुख यांनीही दणदणीत विजय मिळवला.  उदगीरमध्ये प्रीती भोसले यांनी विजय मिळवलाय, तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांनी बाजी मारली. 

धीरज देशमुखांचं काय झालं?

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सव्वा दहाच्या सुमारास धीरज देशमुख यांनी विजय मिळवल्याचं मतमोजणीनंतर निश्चित झालं. धीरज देशमुख यांना 15 मतं पडली. त्यांच्याविरोधात असलेले भारत चामले यांना अवघी 2 मतं पडली.

काकी विरुद्ध पुतण्या, जिंकलं कोण?

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालाचा पहिला कल हाती आला तो सकाळी दहाच्या सुमारास. सुरुवातीलाच निलंगा मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर झाला. परिवर्तन पॅनलचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवत सहकार पॅनलच्या संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. पुतण्या विरुद्ध चुलती अशा रंगलेल्या लढतीत पुतण्याने बाजी मारली. दुसरीकडे उदगीरमध्ये सहकार पॅनलच्या प्रीती भोसले यांनी विजय मिळवला. तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांच्या विजयाची नोंद झाली. पहिल्या फेरीतील या निकालामुळे जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाला आता वेगळं वळण मिळाल्याचं दिसून आलं. 

भाजपा आमदाराचा मुलगा जिंकला

परिवर्तन पॅनलचे ऋषिकेश कराड 19 मताने विजय झालेत. ऋषिकेश कराड हे भाजपाचे आमदार रमेश कराड यांची चिरंजीव आहेत.

अपहरण नाट्य

या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कर्जवाटपावरून देशमुखांना लक्ष्य करण्यात आलं, तर देशमुखांकडूनही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यातच अपहरण प्रकरणाने निवडणुकीला मोठं नाट्यमय वळण दिलं. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही पळवून नेण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा अमित देशमुख यांनी केला. या सगळ्या घडामोडींमुळे जिल्हा बँकेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.

दोन्ही बाजूंनी काय सांगण्यात आलं?

दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात आला होता. देशमुखांचं बँकेवरील वर्चस्व कायम राहणार की निलंगेकर सत्तांतर घडवणार? याचा फैसला आज मतमोजणीतून होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आजच्या निकालाकडे लागलं होतं. काँग्रेस महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या बाजूने नेहमीप्रमाणे मतदारांचा कौल राहील, असा विश्वास धीरज देशमुख यांनी काल झालेल्या मतदानानंतर व्यक्त केला होता. तर या निवडणुकीत विजयाचा आत्ताच दावा करणे योग्य ठरणार नाही... मतदार जो कौल देतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES