SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

झी 24 तासचा 'उत्सव बांधिलकीचा'; दुष्काळग्रस्त नाईकनगरमधील बळीराजाचा बांधावर दिवाळी साजरी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नाईकनगर गाव दुष्काळाच्या संकटात सापडले आहे. पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना झी 24 तासने 'उत्सव बांधिलकी'चा अंतर्गत दिवाळी बळीराजाच्या दारी हा सामाजिक उपक्रम हाती घेतलाय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 07, 2026, 07:21 PM IST | Updated: Nov 07, 2026, 07:40 PM IST
Image Credit: झी 24 तासचा उत्सव बांधिलकीचा
Join

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नाईकनगर गाव दुष्काळाच्या संकटात सापडले आहे. पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना झी 24 तासने उत्सव बांधिलकीचा अंतर्गत दिवाळी बळीराजाच्या दारी हा सामाजिक उपक्रम हाती घेतलाय.

नाईकनगरची भीषण परिस्थिती

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नाईकनगर हे सुमारे 200 लोकवस्तीचे गाव आहे. एकेकाळी केळी, ऊस आणि कापसाच्या शेतीने बहरलेला हा परिसर यंदा पाण्याअभावी संकटात सापडला आहे. ज्या शिवारात बाराही महिने शेतीची कामे सुरू असायची, तिथे आता पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाला फटका बसला आणि पाण्याअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीचा हा उपक्रम राबवताना समोर आलेल्या भीषण वास्तवाबद्दल जाणून घेऊया.  

संपादक कमलेश सुतार यांची भूमिका

'महाराष्ट्रात सध्या पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे आहे. माध्यम म्हणून आपण शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवतो; पण एवढ्यावरच थांबायचे का? यंदा आम्ही दुष्काळग्रस्त गावात जाऊन दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि कपडे देण्याचे ठरवले आहे. सिंदखेराजातून या उपक्रमाची सुरुवात करत आहोत,' असे झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्न मांडण्याबरोबरच संकटातील माणसांपर्यंत मदतीचा आणि आपुलकीचा हात पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

मानसी नाईकसोबत दिवाळी 

झी 24 तासच्या टीमसोबत दुष्काळग्रस्त भागात विविध सेलिब्रिटी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळच्या सिंदखेडराजा तालुक्यातील नाईक नगर गाव झी 24 तासच्या टीमसोबत मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री मानसी नाईकदेखील उपस्थित होते. दुष्काळाचं भीषण वास्तव आणि शेतकऱ्यांची व्यथा पाहून मानसी नाईक यांना अश्रू अनावर झाले.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; जनावरांचं काय?

गावातील विहिरींची पाणीपातळी खालावली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरमधून मिळणारे पाणी पिण्यासाठी वापरायचे की घरातील इतर गरजांसाठी, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. मात्र, या संकटाची दुसरी बाजू म्हणजे जनावरांची तहान आणि चाऱ्याची व्यवस्था. माणसांच्या पाण्याची गरज भागवतानाच जनावरांसाठी पाणी आणि चारा कुठून आणायचा, हा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे. परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे जपलेली जनावरे विक्रीसाठी काढण्याची वेळ काही कुटुंबांवर आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

शेती गेली, मजुरी गेली; शेतमजुरांच्या घरची चूल कशी पेटणार?

नाईकनगरमधील अनेक कुटुंबांकडे स्वतःची शेती नाही. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून मिळणाऱ्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, शेतात पिकेच नसतील तर मजुरीची कामे मिळणार कुठून? खरीप हंगामातील नुकसान आणि रब्बी हंगामाची अनिश्चितता यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरची चूल पेटवणाऱ्या कुटुंबांसमोर आता दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यंदा झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी!

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांच्या अडचणी केवळ बातम्यांमधून दाखवून थांबायचे नाही, तर त्यांच्या दिवाळीत आनंदाचा छोटासा वाटा उचलायचा, या उद्देशाने झी २४ तासने उत्सव बांधिलकीचा अंतर्गत 'दिवाळी, बळीराजाच्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात सिंदखेडराजा तालुक्यातून करण्यात आली आहे. दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि कपडे घेऊन दुष्काळग्रस्त गावातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. संकटात असलेल्या कुटुंबांना सणाच्या काळात आपुलकीचा आधार देणे, हा या मोहिमेमागचा हेतू आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES