)
बीडच्या पालवण चौकातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला भीषण आग लागलीय. या आगीत कार्यालयातील सर्वच ऐवज जळून खाक झाले आहे. तर कार्यालयाच्या प्रांगणात उभे असलेल्या सर्वच वाहने आगीच्या भक्षस्थानी लक्ष झाले. सायंकाळी अचानक आग लागली. यावेळी अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले आहे. मात्र त्याआधीच संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे
भाऊबीजेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ आणि यमुनोत्री धामची द्वारं हिवाळी हंगामासाठी बंद करण्यात येणार आहेत. यासह या दोन्ही तीर्थक्षेत्रांची यंदाची वार्षिक उन्हाळी यात्रा संपणार आहे. यंदा चारधाम यात्रेला ६४ लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली असून, ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. मंदिरांची द्वारं बंद करण्याची तयारी सुरू असून, दोन्ही मंदिरं अनेक क्विंटल फुलांनी सजवण्यात आली आहेत.
नाशिकच्या पक्षी निवडणुकीत गिधाडाची कावळ्यावर आघाडी पहायला मिळाली. ऑनलाइन मतदानात गिधाडाला 62.6 टक्के मते मिळाली. कावळ्याच्या पारड्यात 37.4 टक्के मतदान झाले.
आतापर्यंत 2300 पेक्षा अधिक नाशिककरांचा मतदानात सहभाग. बुधवारी 11 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता मतदान थांबणार. 12 नोव्हेंबरला महापौरांच्या उपस्थितीत अंतिम निकाल जाहीर होणार. विजेता ठरणार जिल्ह्याचा पक्षी, उपविजेता शहराचा पक्षी. सायबर फ्रॉडच्या भीतीमुळे ऑनलाइन मतदानाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हवालदाराकडेच देशी दारूची बाटली सापडली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर अंगझडतीदरम्यान प्रकार उघड झाला. हवालदार यादव कचरू जाधव यांच्याकडे १८० मिली बाटली आढळली. १ नोव्हेंबर रोजी सकाळी तपासणीदरम्यान घटना घडली. आठवडाभरापूर्वी कारागृहातील पोलिसाकडे गांजा सापडला होता. बंदींकडे यापूर्वी तंबाखू, सिगारेट आणि मोबाइलही आढळले. कारागृहात निषिद्ध वस्तूंची ने-आण कशी होते, प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नाशिक पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेसला नॉन-सुपरफास्ट दर्जा देण्याची मनसेची मागणी करण्यात आली आहे. दर्जा न बदलल्यास आंदोलनाचा रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन सादर. सुपरफास्ट सरचार्जमुळे तिकीट आणि मासिक पास महाग आहे. नॉन-सुपरफास्ट दर्जा मिळाल्यास प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार.
नऊ लांब पल्ल्याच्या गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द, मात्र पंचवटी-राज्यराणीचा समावेश नाही. मराठी प्रवाशांना वेगळा न्याय दिल्याचा मनसेचा आरोप. सणासुदीच्या काळात रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचीही मागणी.
सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.15 अंतिम मुदत आहे. धरणांमधील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी राखीव आहे.
जनावरे, चारा आणि बी-बियाणे कार्यक्रमाची गरज भागविणार. पाणी शिल्लक राहिल्यासच शेतीसाठी सिंचन मंजूर होणार. कमी पाणी लागणाऱ्या भुसार पिकांना प्रथम प्राधान्य. नाशिक पाटबंधारे विभागाच्या विविध कालवा लाभक्षेत्रांसाठी आवाहन. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी वापरात किमान 10 टक्के कपातीचे आदेश. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणीपुरवठा टिकविण्याचे आव्हान.
पाकिस्तानी टीव्ही अँकर राबिया एहसान हिची गोळी झाडून हत्या झाली. ही घटना रावळपिंडीमध्ये तिच्या घरी घडली. या घटनेने पाकिस्तानी मिडिया इंडस्ट्री हादरली आहे. तिची हत्या का करण्यात आली? याचा तपास केला जात आहे. राबियाच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीचे नाव समोर येत आहे.
पाकिस्तानच्या ‘समा’ या वाहिनीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी टेलिव्हिजन अँकर तिच्या रावळपिंडी येथील राहत्या घरी रविवारी मृतावस्थेत आढळली. तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तिच्या पतीचे नाव समोर आले आहे. त्यांनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे. राबिया यांच्या पतीचे नाव एहसान ताहीर खान असे आहे.
तुळजापुरात सलग दुसऱ्या दिवशी आग लागल्याची घटना घडली आहे. तुळजाभवानी मंदीरात जाणाऱ्या दर्शन रांगेतील बीडकर पायऱ्या परीसरातील झाडाला आणि कचऱ्याला आग लागली.
फटक्यामुळे आग लागल्याची प्राथमीक माहीती, कचऱ्याला आग लागल्याने धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट पसरले. अग्निशमन दलाचे वाहन दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. दर्शन मंडपाकडे जाणाऱ्या भागातच आग लागल्याने भाविकांची धावपळ
नोटबंदीला 10 वर्षे पूर्ण, मात्र नाशिक जिल्हा बँकेचे 21 कोटी रुपये अद्याप अडकले. जुन्या नोटांच्या स्वरूपात 21 कोटी 32 लाख रुपयांचा निधी पडून आहेत. नोटा बदलून न मिळाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बँकेवर जुन्या नोटांचा अतिरिक्त भार आहे. जुन्या नोटांच्या सुरक्षेचा आणि देखभालीचाही बँकेला भुर्दंड.
मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र मधील सातारा औंध गॅझेटियर बाबत सरकारची तीन महिन्यांची मुदत पूर्ण होत आली आहे त्यामुळे सरकारने याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी थेट केदारनाथ येथे जाऊन मंदिर बंद होण्याच्या एक दिवस आधी साकडे घातले आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवासी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जेवण ऑर्डर करतात. मात्र, अशा सेवांपैकी काही अनधिकृत प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने शनिवारी प्रवाशांना अशा वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला. अनधिकृत प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवल्यास अन्नाच्या स्वच्छतेचा प्रश्न, आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा थेट जन्मसिद्ध अधिकार नसतो, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. आजोबांच्या संपत्तीचे प्रथम श्रेणीतील वारसांमध्ये वाटप झाल्यानंतर, वडिलांना मिळालेला हिस्सा त्यांची वैयक्तिक मालमत्ता ठरतो. त्यामुळे अशा संपत्तीवर नातवाला जन्मतः कोणताही हक्क सांगता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत कायदेशीर स्थिती आणखी स्पष्ट केली.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात 'झुरळ जनता पार्टी'चे नेते अभिजीत दीपके यांच्या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होईल. अभिजीत दीपके यांनी आज हजर राहण्यापासून सूट मागितली होती. ज्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याकडून जामीनपत्रावर सही करून घेतली होती, ती कागदपत्रे अभिजीत दीपके यांच्या वकिलांनी दंडाधिकारी न्यायालयाकडे मागितली आहेत.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक न झाल्यास ठाणे जिल्हा बंद करण्याचा इशारा आयरे ग्रामस्थांनी दिला. डोंबिवलीतील आयरे गावात प्रदीप पूर्णेकर यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावातील हनुमान मंदिरासमोर पूर्णेकर यांची रांगोळी साकारत ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र या श्रद्धांजलीसोबतच हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणीही करण्यात आली. भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे. राष्ट्रवादी(SP) प्रवक्ते सुनील माने यांनी प्रतिक्रिया दिली. विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा आता नाहीत. राष्ट्रवादी (SP)ने विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.
पुढच्या वेळेस मंत्री राहूनच नरकासूर दहन करणार. आमदार रवी राणांचं मंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केले. माझ्या नेत्याने मंत्रिपदाबाबत शब्द दिला आहे असा रवी राणा म्हणाले.
येणा-या काळात मंत्री म्हणून शपथ घेईल असं रवी राणा म्हणाले. अमरावतीच्या बडनेरामध्ये नरकासूर दहनाच्या कार्यक्रमात रवी राणा यांचं मोठं विधान.
सुनील तटकरे ची सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा केली. तटकरेंची सुनेत्रा यांच्यासह पार्थ पवारांसोबत चर्चा झाली. अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरील दर्शनानंतर तटकरेंची चर्चा झाली.
काटेवाडीच्या निवासस्थानी तटकरेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट घेतली. चर्चेनंतर तटकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं.
झालं गेलं सर्व विसरून एकत्र काम करू असं आवाहन विजयानंतर राजेश पाटील यांनी केलं आहे. दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेऊन एकत्र काम करू असं राजेश पाटील यांनी म्हटलं आहे. तर लोकशाही पद्धतीनं आमचाच विजय झाल्याच म्हणत शशिकांत चुयेकर यांनी महायुतीला इशारा दिला आहे.
LIVE Updates 10 November 2026 : राजकीय वर्तुळात गाजलेल्या कोल्हापूरमधील गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीच्या वादावर अखेर पदडा पडला आहे. गोकुळ दूध संघावर अखेर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीला 16 तर समविचारी आघाडीला 13 मतं. महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या अनुषंगाने देखील हालचाली पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे.