तुकाराम मुंढे : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का?असा सवाल पुण्यातील कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारला. यावेळी हा केवळ विश लिस्टचा भाग असून मी वस्तुस्थितीत जगणं पसंत करतो, असं उत्तर मुंढेंनी दिलं. पुण्यात यूथ फेस्टिव्हलमध्ये तुकाराम मुंढेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल तुकाराम मुंडे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ 'विश लिस्ट'चा भाग आहे. मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो, असं स्पष्टीकरण दिले. मी एक लोकसेवक आहे आणि केवळ नोकरीपुरतं मर्यादित न राहता आपली भूमिका समजून ती जगण्याचा प्रयत्न करतो, असंही मुंडे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणं, हीच माझी जीवनाची व्याख्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडरबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने नियमावली जारी केलीय. आता प्रोटीन पावडर किंवा हेल्थ सप्लिमेंट्स परवानगीशिवाय विक्री केल्यास कारवाई होणार आहे. जीम, फिटनेस सेंटर्सना विक्रीसाठी लायसन्स बंधनकारक असणार आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्यासही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय.
दिवा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या एका दरोड्यामुळे खळबळ उडाली. डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले. तर, त्याचं झालं असं दिव्यातील आगासन गावात व्यावसायिक तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. मध्यरात्री २ ते पहाटे ५ च्या दरम्यान खिडकी आणि ग्रील उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. यावेळी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बातमी समोर येताच लोकांना तुकाराम मुंडे म्हणजे डॅशिंग आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे वाटले अन् सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. सामान्यांसह यंत्रणांचीही त्यामुळे धांदल उडाली. मात्र, तपासाअंती हा गोंधळ नामसाधर्म्यामुळे झाल्याचं समोर आलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.