SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 November 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 02, 2026, 04:51 PM IST | Updated: Nov 02, 2026, 06:56 PM IST
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 November 2026 : एकीकडे दिल्लीत INDIA आघाडीचं ‘चलो दिल्ली’ आंदोलन सुरु केले आहे. तर, दुसरीकडे भाजपने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा काढली आहे. हैद्राबाद येथून या रॅलीचा शुभारंभ झाला. मुंबईत  देखील पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अमित शाह यांना भेटले आहेत. यामुळे महाराष्ट्रात देखील मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. तर, दुसरीकडे अर्णब'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचं संकट निर्माण झाले आहे. अवघ्या काही तासात हे वादळ धडकणार आहे.  

02 Nov 2026, 6:49 PM

उद्या शिवसेना पक्ष- चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार

उद्या शिवसेना पक्ष- चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  दुपारी 2 वाजतानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.  एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद  करणार आहेत. 

02 Nov 2026, 6:23 PM

मराठवाड्यातील शेतक-यांसाठी मोठी बातमी; जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडणार

जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून प्रत्येकी तीन आवर्तन सोडणार आहे. रब्बी पिकासाठी शेतक-यांना आता पाणी मिळणार आहे. पहिलं आवर्तन 5 नोव्हेंबरला सोडणार आहे. यानुसार संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना पाणी मिळणार आहे. नांदूर मधमेश्वरमधून संभाजीनगरच्या गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांना पाणी मिळणार आहे. पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीय. तसंच उन्हाळी हंगामात एक आवर्तन देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये बैठक होणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

02 Nov 2026, 6:17 PM

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले; माफीनाम्यासह पुन्हा चूक करणार नसल्याचे इम्रान खान हमीपत्र

परदेशी नागरिकला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनवलोकनाला (एसआयआर) विरोध करणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा अजिबात अधिकार नाही. याबाबत पूर्ण जाणीव असतानाही बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा एसआयआरविरोधातील आंदोलनात सहभागी झाला आणि त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी इमरानला फटकारले. तसेच, या चुकीसाठी विनाअट माफी सादर करण्याचे आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याची हमी देण्याचे बजावले.

परदेशी नागरिक असतानाही लहानपणापासून इम्रान हा भारतात, तेही मुंबईत राहिला आहे. त्याचे शिक्षण येथेच झाले आहे आणि त्याने येथेच करिअर देखील केले आहे. तो येथील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. एवढे सगळे त्याला भारत आणि मुंबईने दिले तर त्याने आतापर्यंत भारतीय नागरिकत्व का घेतले नाही ? त्याने भारतीय नागरिकत्व घ्यावे आणि येथे हव्या त्या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने इम्रान याला सुनावले. 

भारतीय नागरिकाने अमेरिका अथवा जगातील अन्य कोणत्याही देशात अशाप्रकारे आंदोलनात सहभाग घेतला असता आणि तेथील सरकारवर टीका केली असती, तर लगेचच त्याची भारतात रवानगी झाली असती, असेही न्यायालयाने सुनावले.

02 Nov 2026, 6:02 PM

पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. पुणे मेट्रोच्या पिंक लाईनचे मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. यानंतर पुणेकरांना हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा मिळणार आहे. पंतप्रधान मोदी 21 हजार 800 कोटींच्या प्रकल्पांचे उद्या उद्घाटन करणार आहेत.

02 Nov 2026, 5:43 PM

बाबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे; सुप्रिया सुळे यांची सोशल मिडियावर पोस्ट

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.  बाबांना खोकल्याचा त्रास झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून, त्यांच्या प्रकृती स्थिर आहेत.

आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल, प्रेमाबद्दल आणि सदिच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

02 Nov 2026, 5:36 PM

बदलापूरच्या कात्रप रिंग रोडवर आढळला साडेआठ फुटी अजगर; सर्पमित्राच्या सतर्कतेने टळला अनर्थ

बदलापूर शहरातील कात्रप रिंग रोडवर रात्रीच्या सुमारास भला मोठा अजगर रस्त्यावर आला होता. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हा अजगर थंडीने किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे सुरक्षित अधिवासातून रस्त्यावर आला असावा. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका वाहनचालकाच्या  नजरेस हा भलामोठा अजगर पडला.वाहनचालकाने तातडीने बदलापूरचे सर्पमित्र स्वप्निल बगाडे यांना याची माहिती दिली. बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितपणे अजगराला रेस्क्यु केले. सुदैवाने, रात्रीच्या वेळेस वर्दळ कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे अजगरावर वाहन गेले नाही, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.त्यानंतर सर्पमित्र स्वप्निल बगाडे यांनी या अजगराला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले आहे. 

02 Nov 2026, 5:35 PM

डोंबिवली पश्चिमेतील कोपरगावात शाळेमागे 8 फुटांचा अजगर आढळल्याने खळबळ!

डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव परिसरात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चारुमामा शाळेच्या मागील परिसरात हा अजगर आढळला. याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधत अजगराला कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयात सुपूर्द करण्यात आले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला सुरक्षित जीवदान मिळाले असून त्यांच्या कामाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

02 Nov 2026, 5:31 PM

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत; मंत्री जयकुमार गोरे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने दुष्काळ जाहीर केला होता. तसेच, शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपयांची मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे.एवढा संवेदनशील मुख्यमंत्री दुष्काळी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ही 5 हजार रुपयांची मदत म्हणजे अग्रिम (अ‍ॅडव्हान्स) मदत आहे, अंतिम मदत नाही. अधिकची मदत शेतकरी बांधवांना होणारच आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा तत्परतेने निर्णय घेतला आहे.

02 Nov 2026, 5:20 PM

हातात लाल संविधान, दुसऱ्या हातात लाल पुस्तक, आम्ही तर निळ संविधान पाहिलयं; देवेंद्र फडणवीस

हातात लाल संविधान घेतात दुसऱ्या हातात लाल पुस्तक आहे. आम्ही तर निळ संविधान पाहिले आहे.  दुसरे लाल पुस्तक आहे ज्यांनी नेपाळ, श्रीलंका व बांग्लादेश मध्ये रेजिम चेंज केले
त्याचाच वापर त्यांनी सुरु केला आहे.  संविधान बदलायचे सांगितलं तर देश त्यांना जोडे मारेल म्हणून संविधानाच्या संस्था खराब सांगत आहेत अस हल्लाबोल देवेंद्र फडणवीस  यांनी केला. 

02 Nov 2026, 5:17 PM

रेजिम चेंजचा अर्थ उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की नाही ते सुद्धा बोलले आम्ही रस्त्यावर आलो; देवेंद्र फडणवीस यांची टीका

बांग्लादेश नेपाळ श्रीलंकामध्ये रेजिम चेंज झाले संविधान बदलले. चारवेळा पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले आम्हाला रेजिम चेंज करायचा आहे. उद्धव ठाकरे यांना अर्थ माहिती आहे की नाही ते सुद्धा बोलले आम्ही रस्त्यावर आलो आहे. 

02 Nov 2026, 5:13 PM

सरकार नाही तर रेजीम चेंज करत संविधान बदलण्याचा डाव; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधीवर गंभीर आरोप

विरोधकांचा नारा सरकार नव्हे तर रेजिम चेंज आहे.  रेजिम चेंजचा अर्थ राजकीय व्यवस्था बदलायची, संविधान बदलायची.  देशातील संपूर्ण संस्था बदलायच्या आहेत. सरकार नाही तर रेजीम चेंज करत संविधान बदलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर केला. 

02 Nov 2026, 5:10 PM

संविधान बदलण्यासाठी काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

लोकशाही वाचवण्यासाठी,  संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत.  आज देशात पुन्हा एकदा भारताच्या संविधानाला बदलण्यासाठी व व्यवस्था संपवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे मोर्चा काढत आहेत असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

02 Nov 2026, 5:09 PM

दिल्ली-NCR मध्ये फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा लिखित आदेश

दिल्ली-NCR मध्ये फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा लिखित आदेश जारी करण्यात आला आहे.   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी ग्रीन फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेतच ग्रीन फटाके फोडता येणार आहेत, असं कोर्टाच्या आदेशात म्हटलं

02 Nov 2026, 5:06 PM

पंतप्रधान व्हायचे असेल, तर आयुष्यभर बनावट संसदेतच राहावं लागेल; अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

तुम्हाला जर पंतप्रधान व्हायचे असेल, तर आयुष्यभर बनावट संसदेतच राहावं लागेल. तुमची पंतप्रधान होण्याची वेळ कधीच येणार नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावलाय. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या रॅलीदरम्यान शाहांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. दरम्यान शाहांच्या विधानानंतर संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.

02 Nov 2026, 5:02 PM

ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली न्यायालय उडवून देण्याची धमकी

सांगली जिल्हा न्यायालया उडवून देण्याची धमकी आली आहे.  ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली न्यायालय उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला आहे.  न्यायालयातील धमकीच्या मेल केल्यानंतर न्यायालयात गोंधळ उडाला.  कामकाज बंद करून वकील आणि कर्मचा-यांना न्यायालयाबाहेर काढले.  घटनास्थळी सांगली पोलीस अधिकाऱ्यांसह फौज फाटा दाखल झाला.  बॉम्ब शोधण्यासाठी श्वान पथकही दाखल झाले.  पोलिसांकडून न्यायालयाचे इमारत आणि परिसराची तपासणी सुरू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल आहे की, खरंच धमकी मेल याबाबत अस्पष्टता आहे. 

02 Nov 2026, 5:00 PM

सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल; न्यायालय बॉम्बने उडवून द्यायची धमकी

सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला आहे.  न्यायालय बॉम्बने उडवून द्यायची धमकी देणारा ई-मेल आला आहे.  कोर्टाला ईमेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले.  संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.  कोर्टातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारना कोर्टाच्या बाहेर काढण्यात आले. 

02 Nov 2026, 4:54 PM

शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्रकृती बिघडल्यानं शरद पवार रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शरद पवार यांना पुण्यातील रूबी हॅाल क्लिनिक इथं उपचारांसाठी दाखल केले आहे.  शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामूळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिकला दाखल करण्यात आले आहे. 

02 Nov 2026, 4:51 PM

ऐन दिवाळीत एसटी कामगारांची आंदोलनाची हाक

ऐन दिवाळीत एसटी कामगारांची आंदोलनाची हाक दिली आहे. तीन टप्प्यात कर्मचारी आंदोलन करणार आहेत.  उद्यापासून एसटी कामगारांचं घंटानाद आंदोलन सुरु होणार आहे.  4 नोव्हेंबरला द्वारसभा घेत तीव्र निषेध करणार आहेत.  मागण्या मान्य झाल्या नाही तर पाच नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES