)
निवडणुकीत अधिकारी देखील दबावाखाली निकाल देताना दिसले , तेच घडले आहे. सतेज पाटील कोर्टात निकाल काहीही लागो, देव तुमच्या मागे आहे. गोकुळ कोल्हापूर जिल्हा पुरता आहे असे म्हणता, मग दिल्लीतून वकील का आणला. ही लढाई कोल्हापूरची नाही, ही लढाई महाराष्ट्राची आहे, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
सतेज पाटलांच्या संघर्ष मोर्चाच्या सभेच्या ठिकाणी सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे माजी आमदार जयंत आसगावकर,उपस्थित झाले आहेत
औरंगाबाद खंडपीठात याचिकेवर सुनावणी सुरु
सतेज पाटलांकडून अभिषेक मनू सिंघवींचा युक्तीवाद सुरु
सरकारने काढलेले आदेश संचालक नेमण्याबाबत पूर्णतः कायद्याच्या विरोधात आहे, असविधानिक आहे, त्यांचा उद्देश मुळात चूक आहे, असा युक्तिवाद सिंघवी करत आहेत...
सरकारने काढलेले आदेश संचालक नेमण्याबाबत पूर्णतः कायद्याच्या विरोधात आहे, असविधानिक आहे, त्यांचा उद्देश मुळात चूक आहे - सिंघवी
अध्यक्ष निवडणूक जुन्या पद्धतीने व्हायला हवी सरकारचा आताचा निर्णय असा लागू करता येणार नाही. सरकारच्या या आदेशाने यांनी ताकतीने mejority तयार करण्याचा प्रयत्न केला, असा युक्तीवाद करण्यात आला.
सप्तश्रृंगी गडावर आलेल्या धमकीनंतर खबरदारी
नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस सतर्क
मंदिराला नुकसान पोहोचवण्याची धमकी. पोलिसांनी मंदिराची सुरक्षा वाढवली.
इस्रायलमध्ये विद्यमान पंतप्रधान नेतन्याहू यांची गच्छंती अटळ…अध्यक्षांकडून प्रतिस्पर्धी गादी आयसेनकोट यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण…
गोकुळसंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारी आघाडीनं कोर्टात आव्हान दिलंय... मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये यासंदर्भात याचिका दाखल केलीये...यावर आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे..... कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल आहे, मात्र दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने ही सुनावणी औरंगाबाद खंडपीठमध्ये होणार आहे...गोकुळवर शासन नियुक्त 4 संचालक नेमून त्यांना मताचा अधिकारी देण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हणणं समविचारी आघाडीचं आहे... हा अध्यादेश रद्द करण्यासाठी राजर्षी शाहू समविचारी आघाडीनं रविवारी याचिका दाखल केलीय...राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली... राज्यपालांनीही त्याचा वटहुकूम काढला आहे...मात्र, हा वटहुकूम बेकायदेशीर असून तो रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलीय..
सांगलीच्या पलूस तालुक्यात कोल्ह्याने धुमाकूळ घातला असून, एकाच दिवसात चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.. बुर्ली, रामानंदनगर आणि गोंदीलवडी येथे ही घटना घडलीय.. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुण्याच्या खडकवासला धरणसाखळीत सध्या २२.६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.. गेल्या वर्षी याच दिवशी ९६.८४ टक्के पाणीसाठा होता.. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५.५६ टीएमसीने घट झाली असून धरणांमध्ये पाण्याची आवक पूर्णपणे थांबली आहे
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा ११ लाख दशलक्ष लिटरवर घसरला आहे.. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी साठा आहे.. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पालिकेने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
मुंबईत 2027 अखेरपर्यंत बेस्टचा बस ताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.. या विस्तारासाठी 200 अतिरिक्त सहाय्यक वाहतूक अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे.. यामुळे बस व्यवस्थापन आणि नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ३५ उड्डाणपूल, पादचारी पूल आणि सबवेची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे.. यासाठी पालिका ५७ कोटी ६१ लाख रुपये खर्च करणार असून, कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मुंबईतल्या डोंगरी परिसरात भीषण आग लागली होती...रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे...या आगीमध्ये अनेक झोपड्या भक्षस्थानी सापडल्या आहेत...आग लागल्यानंतर दूरपर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.
विरार पश्चिमेतील एका सोसायटीमध्ये लागलेल्या भीषण आगीवर अखेर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने रौद्ररूप धारण करत वरच्या मजल्यापर्यंत भडका घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं, तरी घरातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्ग सहापदरी होणार.. MSRDCकडून महामार्ग रुंदीकरणाचा निर्णय..लवकरच प्रकल्प आराखडा सरकारला पाठवणार..
ऐन दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास गैरसोयीचा.. कनेक्टिंग लिंकला जोडणाऱ्या 2 मार्गिका बंद.. पाचपैकी 2 मार्गिका दुरुस्तीच्या कामासाठी बंद..
शासननियुक्त संचालक नेमण्याच्या सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान…समविचारी आघाडीची औरंगाबाद खंडपिठामध्ये याचिका…सरकारचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा…
गोकुळ अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष शिगेला…सतेज पाटलांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा…सर्व सभासद दूध उत्पादकांना सहभागी होण्याचं आवाहन…
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर आता शिवसेनेच्या विलीनीकरणाची चर्चा... ठाकरे, शिंदे एकत्र आल्यास हीच खरी दिवाळी.... आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानं मोठी खळबळ...
पार्थ पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी घेतली शरद पवारांची भेट…सिल्व्हर ओकवर दोघांत अडीच तास चर्चा…भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात…तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 9 november 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना आज खासदार पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांचा आणि राज्यातील वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेऊयात एका क्लिकवर