SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 november 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 09:31 IST | Updated: Nov 26, 2026, 13:51 IST
Image Credit: breaking news live morning marathi news today​ shivsena sc hearing pune firing gangwar ncp sharad pawar mumbai 26 11 attack 26 november 2026 latest News
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 november 2026 : पुणेपाठोपाठ मुंबईत गोळीबाराची घटना, माहीममध्ये पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दुकानावर 5 ते 6 गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या सुनावणीत कोर्टाने बुधवारी सुनावणी घेऊ अस सांगितले होते. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना मानवंदना देण्यात आली. देशभरात आज संविधान दिन साजरा केला जाणार असून, या निमित्ताने संसदेपासून ते राज्यांपर्यंत विविध शासकीय आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

26 Nov 2026 13:51 IST

शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी रद्द

 

शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार नाही. पुढील आठवड्यात होणार सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरील आजची सर्व प्रकरण सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आले
 

26 Nov 2026 12:51 IST

4 तारखेच्या ट्रॅक्टर मोर्चावर रोहित पवार ठाम

 

मुंबईतील पक्षाच्या बैठकीत रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट

सर्व जिल्हाध्यक्षांनी शेतकरी मोर्च्यावर आणि दुष्काळावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी

26 Nov 2026 12:37 IST

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले

--शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले
--रुटीन चेकअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात
--शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले
--मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी

26 Nov 2026 12:30 IST

BMCला धमकीचा मेल, तपास यंत्रणाच्या माध्यमातून महापौर कार्यालय खाली करण्याच्या सूचना.

आज आलेल्या धमकीच्या मेलवरून गंभीर दखल. तपास यंत्रणाच्या माध्यमातून महापौर कार्यालय खाली करण्याच्या सूचना. बॉम्ब शोधक पथकाकडून कार्यालयाची तपासणी सुरु

26 Nov 2026 11:54 IST

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच BMC महापौर कार्यलयाला धमकीचा मेल

 

काल पुण्या-मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटना ताज्या असतांना आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यलयाला धमकीचा मेल. २६ नोव्हेंबरला महापौर कार्यालयात दुपारी १.११ वाजता स्फोट घडवण्याची धमकी. ग्रेनेड हल्ल्याद्वारे मुंबईत दहशत पसरवण्याचा ई-मेलमध्ये उल्लेख. २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मुंबईत ग्रेनेड हल्ले करण्याची धमकी

26 Nov 2026 11:52 IST

आदित्य ठाकरे बीएमसी आयुक्तांची भेट घेणार

 

आमदार आदित्य ठाकरे मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहे... मुंबईतील विकास काम आणि वरळी विधानसभेतील कामांसंदर्भात आदित्य ठाकरे आणि अश्विनी भिडे यांची बैठक होणार आहे.. 

26 Nov 2026 11:52 IST

प्रशांत किशोर यांची टीम 3 दिवसांपासून नागपुरात

 

राष्ट्रवादीच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या पक्षाचे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची टीम गेले तीन दिवस नागपूर आणि विदर्भात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे....प्रामुख्याने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी प्रशांत किशोर यांची टीम ठिकठिकाणी फिरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत माहिती गोळा करत आहे....
नागपूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ ते २० स्थानिक नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांच्या टीमने वेगवेगळी स्वतंत्रपणे सखोल चर्चा केल्याची माहिती आहे....  

26 Nov 2026 11:52 IST

राज्यात अजूनही खंडणी मागीतली जाते-राऊत

राज्यात अजूनही खंडणीखोरांचं राज्य आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. मुंबईसह राज्यात अजूनही खंडणी मगितली जाते आणि दिली जाते... मुंबईतील सर्व व्यापारी खंडणी देतात आणि जे देत नाही त्यांच्यावर गोळीबार होतो असा दावा राऊतांनी केलाय.. 

26 Nov 2026 11:51 IST

पर्यटनाच्या हंगामात हवाई प्रवास महागला

 

हवाई प्रवास 35 टक्क्यांनी महागला...7 प्रमुख क्षेत्रांमध्ये विमान प्रवास दर सर्वाधिक....विमान इंधनाच्या दरवाढीचा प्रवाशांवर भार....

26 Nov 2026 11:50 IST

राज्यातील गोशाळांना दुष्काळाच्या झळा

जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर..थकीत अनुदानामुळे गोशाळा संकटात..तातडीनं चारा-पाणी पुरवण्याची मागणी...

26 Nov 2026 11:50 IST

राज्यातील 54 नद्या प्रदूषणाच्या विळख्यात

ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरमधील नद्यांचा समावेश..रासायनिक सांडपाणी, वाढत्या शहरीकरणाचा फटका.

26 Nov 2026 11:38 IST

चौपाट्यांवर कबुतरांना दाणे टाकल्यास दंड...

 

दादर, माहीममध्ये महापालिकेची कारवाई...चौपाट्यांवर नियमावलीचे फलक लावणार..दोन्ही चौपाट्यांवर कर्माचारी तैनात करणार.

26 Nov 2026 10:17 IST

अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब, भारताचं ठाम प्रत्युत्तर

 

अमेरिकेने घेतलेल्या या टॅरिफच्या निर्णयावर भारताने ठाम प्रत्युत्तर दिलंय... भारत सरकारने सांगितले की, या प्रकरणातील चौकशीबाबतची नोटीस तपासली जात आहे... संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी अमेरिकेसोबत रचनात्मक चर्चा केली आहे... भारत चर्चेसाठी तयार आहे...तसेच भारतातील कोणत्याही क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन नसल्याचंही स्पष्ट केलंय...अमेरिकेसोबतच्या व्यापारविषयक सर्व मुद्द्यांवर चर्चा ही सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या  वाटाघाटींच्या चौकटीतच केली जावी...अशी भूमिका भारत सरकारने मांडलीय... 

26 Nov 2026 10:16 IST

चिपळूणमध्ये भरदिवसा कोयत्यानं वार

 

रत्नागिरीच्या चिपळूनमध्ये भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय... हल्ल्यात तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे... भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे चिपळूणमध्ये भीतीचे वातावरण आहे... कौटुंबीक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, आणि यातूनच कोयत्याने हल्ला झाला... 

26 Nov 2026 10:15 IST

त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने बंद राहण्याची शक्यता

 

त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने बंद राहण्याची शक्यता...MSIDCचा मंदिर बंदसाठी कुंभमेळा प्राधिकरणाला प्रस्ताव...गर्दीमुळे विकासकामांना अडथळा होत असल्याचा दावा... 

26 Nov 2026 10:15 IST

महाराष्ट्रावरील पाणीसंकट अधिक तीव्र

 

दुष्काळ झळात होरपळणा-या महाराष्ट्रावरील पाणीसंकट अधिक तीव्र...राज्यातील धरणात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के कमी पाणी...नद्यांपाठोपाठ विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने चिंता वाढली...

26 Nov 2026 10:14 IST

'जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेचे 54 कोटी थकवले'

 

जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेचे 54 कोटी थकवले. गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप...स्वतःला सुसंस्कृत समजतात, मग आधी 54 कोटी भरा, पडळकरांनी डिवचलं 

26 Nov 2026 10:13 IST

शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सक्रीय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळेंनी घेतली उदय सामंतांची भेट.. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती... शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याच्या चर्चा

26 Nov 2026 10:12 IST

मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक

बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक, वाढीव खर्चाचा आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा बैठकीत घेतला जाणार  

26 Nov 2026 09:38 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा…

 

मुंबई, ठाणे वगळता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील ३ महिने मोफत धान्य…

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES