)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत १ मताने संजय काका पाटलांचा विजय
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा झाला पराभव. संजयकाका पाटलांनी पडली 39 मते. माजी आमदार सुमनताई पाटील यांना पडली 38 मते. आमदार रोहित पाटीलांना मोठा धक्का.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विजयामुळे अखेर संजयकाका पाटलांना लागला गुलाल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कवठेमहंकाळमधून अजित घोरपडे विजयी..राष्ट्रवादी SPच्या टी व्ही पाटलांचा पराभव.. अजित घोरपडेंना मिळाली 37 मतं..
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे विजयी... माण सोसायटी गटातून विजयी...जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा केला पराभव...जयकुमार गोरे यांना 53 मते तर त्यांचे बंधू शेखर गोरे 7 आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14 मते
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून खासदार निलेश लंके विजयी. लंके यांना 104 पैकी 63 मते मिळाली
रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी दीड महिन्यांपासून बंद असलेली रायगड रोप-वे सेवा वेळेपूर्वीच पूर्ववत करण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्याने ही सेवा आजपासून पुन्हा सुरू झाली असून,दिवाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 10 जागांचा आज निकाल जाहीर होणार आहे... निवडणुकीत दहा जागेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून 99.27 टक्के मतदान झालं आहे... जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात पॅनलच्या 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता विखे-थोरात यांच्या सहकार पॅनल विरोधात निलेश लंके-सदाशिव लोखंडे यांच्या परिवर्तन पॅनलचा सामना झाला आहे
प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने 5 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा…
नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगावात शेतकऱ्याने आत्महत्या केलीयं.... नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन शेतक-याने जीवन संपवलं....... गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी , शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं..... ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेयं.......
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत 21 जागांसाठी 402 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत... छाननीच्या दिवशी वेगवेगळ्या उमेदवारांच्या अर्जावर 9 जणांच्या हरकती आल्यात... जिल्हा बँकेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय पवारांसह त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आलीय... भाजपच्या मंत्री रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेच्या उमेदवारांनी हरकत घेतलीय... तर मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेच्या 3 उमेदवारांच्या अर्जावर भाजपच्या मंत्री रक्षा खडसेंनी हरकत घेतलीय... छाननीत वैध आणि बाद अर्जाच्या उमेदवारांची यादी आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार आहे...
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बँकेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी होणार असून, यामध्ये सर्वाधिक लक्ष जत सोसायटी गटाच्या निकालाकडे लागलंय.... या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांच्यात चुरशीची लढत झाली आहे...जत सोसायटी गटात अवघे 87 मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयासाठी 45 मतांचा आकडा गाठणे आवश्यक असल्याने दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तर सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचाही आज फैसला होणार आहे, अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये लंके विरुद्ध विखे समर्थकांमध्ये सामना रंगला होता.. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. तर साता-यातही जिल्हा बँकेचा निकाल लागणार आहे..
गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष निवडीचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलंय... एकतर्फी निर्णय घेऊ नये, म्हणून सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलीय... तर याआधी गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा घ्या आणि 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया राबवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत... निवडणूक आयोगानं 7 दिवसाची नोटीस देऊन निवडणूक घ्यावी, असे आदेशच मुंबई हायकोर्टानं दिलेत... निवडून आलेले 25 संचालकांनाच अध्यक्ष पद निवडणुकीला उपस्थित राहता येईल, असं मुंबई हायकोर्ट म्हणालंय... तर आता सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी कॅव्हेट दाखल केलीय...
मीरा भाईंदरमध्ये महायुतीत राजकीय संघर्ष पाहायाला मिळाला....शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपनं भाईंदर पूर्वेतील नवघर नाका येथे जनआंदोलन केलं... यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करत जमीन व्यवहार, विकासकामं आणि इतर कथित भ्रष्टाचारांवरून गंभीर आरोप केले... मात्र, हे आंदोलन सुरू असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दाखल होत भाजपला प्रत्युत्तर दिलं... इतरांवर आरोप करण्यापूर्वी भाजप नेत्यांनी स्वतःच्या कामाचा आरसा पाहावा, असा संदेश देत त्यांनी भाजप नेत्यांना प्रत्यक्ष आरसा दाखवला आणि निषेध नोंदवला....त्यामुळे या आंदोलनादरम्यान भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला...
नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा दणका दिलाय. मनपाच्या निर्णयाला डावलून नगरविकास खात्याने क्लस्टरला मंजुरी दिली होती. मात्र हा निर्णय महासभेने नाकारलाय. हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी रोखठोक भूमिका सभागृह नेते सागर नाईक यांनी घेतली. तर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनीही क्लस्टरविरोधात भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
SIR विरोधी आंदोलनात सहभागी इम्रान खानचा कोर्टात माफीनामा…कृत्याची पुनरावृत्ती होणार नसल्याचं हमीपत्र…अमेरिकन पासपोर्टवर देशात वास्तव्याला असताना नियमांचं उल्लंघन केल्यानं कोर्टाने फटकारल्यानंतर माफी….
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांच्या निवडणूकीचा आज फैसला.. गोपीचंद पडळकरांकडे सा-यांच्या नजरा, सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँकेचा कौल कुणाला याचीही उत्सुकता..
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 03 November 2026 : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता न्यायालयात युक्तिवाद करतील. पुणे मेट्रोच्या पिंक लाईनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींकडून 21,800 कोटींची मेगा भेट