SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींकडून विधेयक विचारार्थ लोकसभेकडे मांडण्याची शिफारस

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 28, 2026, 16:21 IST | Updated: Nov 28, 2026, 21:53 IST
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 :  डिलिमिटेशन विधेयकावरुन देशात राजकारण पेटले माजले आहे. शरद पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. या विधेयकावरून काँग्रेसने  शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इंडियाआघाडी आणि माहविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तर, दुसरीकडे डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तर, देशातील अनेक राज्यांमध्ये देखील याचे पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट जाणून घ्या.

28 Nov 2026 21:47 IST

डी लिमिटेशन प्रक्रियेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; खासदार सुनील तटकरे यांनी केले सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत

डी लिमिटेशन प्रक्रियेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा

खासदार सुनील तटकरे यांनी केले सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डी लिमिटेशन करण्याचा यापूर्वीचा प्रयत्न दोन तृतीयांश बहुमत नसल्याने अयशस्वी झाला

1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी डी लिमिटेशन करून लोकसभेच्या 543 जागा केल्या
त्यावेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आता ती 140 कोटी झाली आहे

आता होणाऱ्या डी लिमिटेशनचे स्वागत आहे

28 Nov 2026 21:09 IST

उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षाची भूमिका ठरवणार; पक्षाकडून खासदारांना व्हिप जारी

उद्या सायंकाळी ४ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाची बैठक

बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हिप जारी

चिप व्हिप अनिल देसाई यांनी जारी केला व्हीप

पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती

28 Nov 2026 20:17 IST

DMK, BRS, YSRCP, TDP, जनसेना आणि JDS; दक्षिण भारतातील 129 पैकी 75 खासदारांचा विधेयकाला पाठिंबा

दक्षिण भारतातील 60% खासदारांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे.  DMK, BRS, YSRCP, TDP, जनसेना आणि JDSचा पाठिंबा आहे. 
आंध्र प्रदेश,तामिळनाडू,तेलंगणा,केरळ,कर्नाटकातील खासदारांचा पाठिंबा आहे.  दक्षिण भारतातील 129 पैकी 75 खासदारांचा विधेयकाला पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  

28 Nov 2026 20:12 IST

लोकसभेत ⁠सुप्रिया सुळे कोणाच्या बाजूला बसणार हे ठरलं; NCP, शिवसेना, समाजवादी पक्ष, द्रमुकच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल

लोकसभेत द्रमुकच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल 

डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार असल्यापूर्वी लोकसभा सचिवालयाचा निर्णय

⁠इंडिया आघाडीपासून स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची मागणी द्रमुकने केली होती

खासदार कनिमोळी यांनी यासंदर्भात मे महिन्यात पत्र लिहिलं होतं

या बदलामुळे समाजवादी पक्ष, NCP (शरद पवार), शिवसेना (UBT) आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल

⁠सुप्रिया सुळे कनिमोळी यांच्या बाजूला बसतील

28 Nov 2026 18:27 IST

तुम्ही NDAत सहभागी व्हायला पाहिजे, शरद पवारांना मी अनेकदा सांगितले; प्रफुल पटेल

तुम्ही NDAत सहभागी व्हायला पाहिजे, शरद पवारांना मी अनेकदा सांगिलत्याचं, प्रफुल पटेल यांनी म्हटलंय... यासंदर्भात शरद पवारांसोबत अनेकदा चर्चा झाल्याचंही प्रफुल पटेल म्हणालेत.. तसंच NDAत सहभागी होण्याच्या मार्गानं पवार येत असतील तर स्वागतच असल्याचं पटेल म्हणालेत...

28 Nov 2026 18:25 IST

विरोधकांना सरकार नाही तर व्यवस्था बदलायची आहे; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय... विरोधकांना भारतात अराजकता निर्माण करायची आहे... विरोधकांना सरकार नाही तर व्यवस्था बदलायची आहे... विरोधकांना संविधान संपवून नवीन रेजीम आणायचं आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केलीय... रोज खोटं बोलल्यानं लोकांना ते खरं वाटेल असं राहुल गांधींना वाटतं असल्याचं म्हणत फडणवीसांनी टीका केलीय..

28 Nov 2026 18:11 IST

निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी भाजपने नवा प्लॅन तयार केलाय; राहुल गांधीचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये 14 कोटी अपात्र लोकांनी मतदान केले. त्यामुळे 2024 ची निवडणूक बेकायदेशीर ठरते.

देशातील 80 टक्के नागरिक आणि जवळपास 100 टक्के Gen Z यांचा नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार निवडणुका चोरत असल्यावर विश्वास आहे

निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी भाजपने नवा प्लॅन तयार केला आहे. या नव्या प्लॅनची रचना आणि त्याचे परिणाम आज स्पष्ट करणार

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली

बिहारमध्ये मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली

आसाममध्ये भाजपच्या फायद्यासाठी संपूर्ण राज्याची पुनर्रचना करण्यात आली

पश्चिम बंगालमध्ये 100 पेक्षा जास्त जागा चोरण्यात आल्या

मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना आम्ही घेरले आहे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत आमच्याकडे पुरेशी माहिती आहे. ही माहिती लवकरच सार्वजनिक करणार

लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांऐवजी 850 जागा करण्याची भाजपची योजना आहे

महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी उद्याही होऊ शकते. मग 850 जागांची गरज काय

लोकसभेच्या 850 जागा झाल्यास भाजपला आपल्या फायद्यासाठी भारताचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्याची मोठी संधी मिळेल

या माध्यमातून भाजपविरोधी समुदायांचे प्रतिनिधित्व कमी करता येईल आणि विरोधी पक्षांच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करता येईल

लोकसभेच्या 850 जागांचा आकडा लक्षात ठेवा. हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा आकडा आहे

850 जागांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना भारतातील मतदारसंघांचा नकाशा आपल्या मर्जीनुसार बदलण्याची मोकळीक मिळणार

या बदलांमुळे देशातील लोकशाही व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येईल

परिसीमन आयोगात ज्ञानेश कुमार सदस्य असतील. मोदी आणि अमित शाह यांच्या निवडीचा सर्वोच्च न्यायालयाचा एक माजी न्यायाधीश दुसरे सदस्य असतील, तर तिसऱ्या सदस्याची निवड ज्ञानेश कुमार स्वतः करणार आहेत

परिसीमन आयोगाची रचना मोदी आणि शाह यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली असेल. आयोगाच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही

निवडणूक आयोगावर कब्जा केल्यानंतर आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ रचना बदलण्याची तयारी सुरू आहे

जातनिहाय जनगणना बाजूला ठेवण्यात आली असून 2027 ची जनगणनाही अप्रासंगिक ठरवण्यात आली आहे

2011 च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असून 2051 पर्यंत ही रचना कायम ठेवली जाणार आहे. म्हणजेच पुढील 40 वर्षे सामाजिक न्यायाचा मुद्दा बाजूला पडेल

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे

एससी आणि एसटी प्रवर्गासाठीच्या जागा पुढील 40 वर्षांसाठी गोठवल्या जातील. या समाजांची लोकसंख्या वाढली तरी त्यांच्या जागांमध्ये वाढ होणार नाही

आम्हाला सर्वपक्षीय परिसीमन आयोग हवा आहे. परिसीमन प्रक्रिया निष्पक्ष आणि सर्वपक्षीय सहमतीने व्हावी, अशी आमची भूमिका आहे

भाजपला लोकसभेच्या 850 जागा हव्या आहेत, तर आम्हाला सध्याच्या 543 जागा कायम ठेवायच्या आहेत

भाजपला 2011 च्या जनगणनेचा आधार घ्यायचा आहे, तर आम्हाला 2027 च्या जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार परिसीमन हवे आहे

भाजपला 850 जागांवर महिला आरक्षण लागू करायचे आहे, तर आम्हाला सध्याच्या 543 जागांमध्येच महिला आरक्षण लागू करून ओबीसी महिलांसाठी उपकोटा हवा आहे

ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवर कब्जा केल्यानंतर आता संपूर्ण मतदारसंघ रचनाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे

भाजपला देशाचे हुकूमशाहीत रूपांतर करू देणार नाही. देशात हुकूमशाही येऊ देणार नाही

2024 ची निवडणूक बनावट होती आणि नरेंद्र मोदी हे बनावट व बेकायदेशीर पंतप्रधान आहेत

देशातील तरुण आणि Gen Z यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपला घेरले आहे. त्यांचा जुना मार्ग बंद झाल्यानंतर आता भाजप नवा मार्ग शोधत आहे

28 Nov 2026 17:38 IST

पवारांच्या मागे जाऊन आमचे नुकसान झाले, त्यांनी आम्हाला धोका दिला; चंद्रकांत खैरेंची राष्ट्रवादीवर सडकून टीका

महाविकास आघाडीतील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर झाला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, ‘त्यांच्या मागे जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून तेच निघून गेले,’ अशा शब्दांत खैरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) वर जोरदार टीका केली. पवारांनी आम्हाला धोका दिला असून, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार भाजपसोबत जातील, मात्र आम्ही तिथेच राहू, असे अनेक नेते पूर्वी सांगत होते. प्रत्यक्षात सत्ताही मिळाली नाही आणि राजकीयदृष्ट्याही नुकसान झाले, अशी खंत खैरेंनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे,’ अशी टीका केली. शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत खैरे म्हणाले, ‘वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले.’ शरद पवारांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मानतो, असे सांगतानाच त्यांच्या या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.खैरेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

28 Nov 2026 16:52 IST

सोनिया गांधींच्या मतदार यादीतील नावाचे प्रकरण; 1980 मध्ये सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या, दिल्ली पोलिसांचा अहवाल

सोनिया गांधींच्या मतदार यादीतील नावाचे प्रकरण
१९८० मध्ये सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या -दिल्ली पोलिसांचा अहवाल
राऊज अव्हेन्यू न्यायालयात अहवाल केला दाखल
मात्र, १९८० च्या मतदार यादीत नाव असल्याची पोलिसांची माहिती
३० एप्रिल १९८३ रोजी भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे अहवालात नमूद
जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीची पडताळणी
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही मागवले काही रेकॉर्ड
नागरिकत्वापूर्वी नाव नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरली? याचिकाकर्त्यांचा प्रश्न
 

28 Nov 2026 16:49 IST

50 हजार वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी राष्ट्रपतींना निवदेन; यवतमाळमधील सामाजिक कार्यकर्त्यांचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र

'50 हजार वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी राष्ट्रपतींना निवदेन'
यवतमाळमधील सामाजिक कार्यकर्त्यांचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र
वृक्षतोडीला स्थगिती देण्याची पत्राद्वारे मागणी
ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रक्रिया सुरू असल्यानं नाराजी

28 Nov 2026 16:47 IST

शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना NDAत येण्यासाठी पत्र द्यावं लागणार

महायुतीची भूमिका तीच आमची भूमिका
डिलिमिटेशन विधेयकावर भुजबळांचं विधान
शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना NDAत येण्यासाठी पत्र द्यावं लागणार
विधेयकाला पाठिंबा देणं आणि NDAमध्ये येणं वेगवेगळं-पटेल

28 Nov 2026 16:44 IST

प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा

डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार
 प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा केला
"खासदारांनी भाजपच्या जाळ्यात अडकू नये"
 डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा-प्रकाश आंबेडकर

28 Nov 2026 16:42 IST

2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस आपण बोललो होतो - राज ठाकरे

पवारांचं जंतरमंतर आहे, असं म्हणालो होतो, अशी पोस्ट राज ठाकरेंनी सोशल मीडियावर टाकलीय. 2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती. त्यावेळेस आपण बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
 

28 Nov 2026 16:37 IST

शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास; ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांवर उपचार सुरू

शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाला.  ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांवर उपचार सुरू आहेत.  कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पवारांची नियमित चाचणी झाली. डॉक्टरांनी माहिती दिली. शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

28 Nov 2026 16:34 IST

देशहिताचा जो निर्णय असेल तो राज ठाकरे घेतील; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया

देशहिताचा जो निर्णय असेल तो राज ठाकरे घेतील
मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया
सत्ता अबाधित राहावी यांसाठी त्यांचा प्रयत्न"
मनसे नेते बाळा नांदगावकर यांची टीका
28 Nov 2026 16:31 IST

एकनाथ शिंदे डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्यासाठी दिल्लीला जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
विशेष अधिवेशनानिमित्त शिंदेंचा दिल्ली दौरा?
डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती

28 Nov 2026 16:27 IST

देशातील काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार

काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री उद्या पत्रकार परिषद घेणार
 दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली जाणार
 देशातील काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार
उद्या दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन
डिलिमीटेशन अर्थात मतदारसंघ पुरर्रचना विधेयकावर भूमिका मांडणार..

28 Nov 2026 16:25 IST

डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूनं शरद पवारांनी निर्णय घेतला की त्यांच्या सध्याच्या प्रकृतीचा फायदा कुणी घेतला? राजू शेट्टींचा सवाल

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाच्या बाजूनं शरद पवारांनी निर्णय घेतला की त्यांच्या सध्याच्या प्रकृतीचा फायदा कुणी घेतला?, असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय... तसंच जितेंद्र आव्हाडांनी वैचारिक तडजोड केलेली दिसते... त्यांची भूमिका पटलेली नसल्याचं म्हणत राजू शेट्टींनी टीका केलीय...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES