Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 11 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 11 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE : 11 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.
11 Nov 2026 16:48 IST
मुंबईच्या कुर्ला भागात गोळीबार, एकाचा मृत्यू
Kurla Firing : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. हलाव पुलाजवळ 2 गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबारात विनोद पवार यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर पवार कुटुंबीयांनी न्याय मिळत नसल्याचा आरोप करत कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.. कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Nov 2026 16:01 IST
जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये CRPFच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला
Terrorists Attack on Soldiers : जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे... दरम्यान या हल्ल्यात 3 जवान जखमी झाल्याची माहिती आहे... सीआरपीएफच्या गस्त घालणा-या जवानांवर दुपारी सव्वा दोन वाजता हा हल्ला करण्यात आला आहे... त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे... दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना अनंतनागच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
11 Nov 2026 14:17 IST
मुंबईतील कुर्ल्यात गोळीबार, दोन गटातील वादातून गोळीबार
Mumbai : मुंबईतील कुर्ला भागात गोळीबाराची घटना...दोन गटातील वादातून गोळीबार..कुर्ला पश्चिम भागातील हलाव पुलाजवळ गोळीबार...गोळीबारात विनोद पवार नावाची व्यक्ती जखमी
11 Nov 2026 13:05 IST
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन
आता बातमी सर्वांची चिंता वाढवणारी.. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीये. कोरोनाचा 'पीजे. 2. 1' हा नवा व्हेरिएंट सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत असून, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या महामारीची भीती निर्माण झाली आहे. या नव्या व्हेरिएंटची सुरुवात यंदाच्या मे महिन्यात कॅनडातील ऑन्टारियो येथे झाली. या व्हेरिएंटची कोणतीही वेगळी किंवा अत्यंत गंभीर अशी स्वतंत्र लक्षणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. नेहमीच्या सर्दी, खोकला, हलका किंवा तीव्र ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, सततची थकवा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखीच याची लक्षणे आहेत. हा व्हेरिएंट मानवी पेशींवर हल्ला करतोय असा दावा संशोधकांनी केलाय..
11 Nov 2026 12:47 IST
मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला आग
Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला आग...गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग...गणेश नाईकांच्या 'पावनगड' बंगल्याला आग...अग्निशमनदल घटनास्थळी दाखल
11 Nov 2026 12:33 IST
'जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील', NCP विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत झी २४तासवर मोठी बातमी...'जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील'...विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य...एका वाक्यातील उत्तराने विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा बळ
11 Nov 2026 11:55 IST
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर...पुण्यात तीन कार्यक्रमांना उपस्थिती लावणार... रन फॉर युनिटी मॅरेथॉन कार्यक्रमाला हजेरी लावणार... दौ-या दरम्यान राजकीय बैठकांचीही शक्यता
11 Nov 2026 11:14 IST
राष्ट्रवादीतून आमदार फुटणार- संजय राऊत
Sanjay Raut on NCP : राष्ट्रवादीतून आमदार फुटणार, संजय राऊतांचा दावा...'20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत'...आमदार स्वगृही परततील किंवा इतर पक्षात जातील....राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संजय राऊतांचा दावा
11 Nov 2026 10:40 IST
'दादा तुझ्याशिवाय पहिली भाऊबीज',सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित दादांच्या आठवणीत एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी जुन्या दिवाळीच्या आनंदी क्षणांचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 'दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज असं सुळेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय..
11 Nov 2026 10:26 IST
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...सकाळी 11 वाजता होणार बैठक...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...बैठकीतील निर्णयाकडे लक्ष
11 Nov 2026 09:35 IST
शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसची मुभा
शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसची मुभा...राज्य सरकारच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती...सुप्रीम कोर्टाचे आदेश येईपर्यंत कारवाई थांबवली...शासकीय सेवेतील डॉक्टरांना तूर्तास दिलासा
11 Nov 2026 09:17 IST
2026 सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता
2026 सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद...तापमानाचा पारा 1.5 अंशाचा टप्पा ओलांडणार?...सुपर अल निनोचा परिणाम
11 Nov 2026 08:41 IST
मुंबई, दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब
देशातील प्रमुख महानगरांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न आणखी गंभीर झालाय... देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आलीय... मुंबईतील AQI 132 ते 171च्या दरम्यान नोंदवण्यात आलाय... वांद्रे, घाटकोपर आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्ये AQI 200-260 अंकांपर्यंत पोहोचली आहे... फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झालीय... लखनौ, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्येही हवेची गुणवत्ता 'खराब' ते 'अतिशय खराब' क्षेणीत गेलीय... यामुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ झालीय...
11 Nov 2026 08:08 IST
जळगावात फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल 16 घटना
जळगावात फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल 16 घटना...6 ठिकाणी कचऱ्याला आग, 8 ठिकाणी गवताला आग...अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठ्या दुर्घटना टळल्या...फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ ...अग्निशमन दलाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
11 Nov 2026 07:42 IST
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद....राष्ट्रवादी विलीनीकरणावर काय बोलणार याकडे लक्ष...11 वाजता सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेणार
11 Nov 2026 07:40 IST
NCP आमदारांनी पवारांकडे वेळ मागितली,भेटीसाठी आजची वेळ मागितली-सूत्र
राजकारणाच्या सारीपाटावर नव्या घडामोडींची चाहूल लागली की राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण येतं... सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील घडामोडींमुळे असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आज या भेटीसाठी वेळ मागण्यात आल्याचं समजतंय... यापूर्वी पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.. सध्या शरद पवार मुंबईत असून पुढील काही दिवस सिल्व्हर ओकवरच विश्रांती घेणार आहेत.. या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.