SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 19 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 19 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 19, 2026, 07:35 IST | Updated: Nov 19, 2026, 23:22 IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News LIVE : 19 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.

19 Nov 2026 20:18 IST

नाशिकचा मानचिन्ह पक्षी म्हणून गिधाडाला बहुमान

Nashik's Bird : नाशिकचा मानचिन्ह पक्षी कोण असावा?, यासाठी नाशिकमध्ये अनोखी निवडणूक पार पडलीय...  या निवडणुकीमध्ये कावळा अन् गिधाड आमनसे-सामने होते... या अनोख्या निवडणुकीत गिधाडाने कावळ्यावर मात करत निवडणुकीत बाजी मारली आहे. कावळा आणि गिधाडामध्ये झालेल्या या हायहोल्टेज लढतीत तब्बल 958 मतांच्या फरकाने कावळ्याचा पराभव झालाय... या निवडणुकीत 3032 एवढे एकूण मतदान झालं... यापैकी कावळ्याला 1037 मते मिळालीय... तब्बल 958 मतांच्या फरकाने गिधाडाचा या निवडणुकीत विजय झालाय.

19 Nov 2026 20:10 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

Shinde's Helicopter Technical Failure : पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने निघालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रवासात अचानक तांत्रिक अडथळा निर्माण झाला... कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पंढरपूर परिसराची पाहणी केली.. त्यानंतर मुंबईला परतण्यासाठी ते हेलिकॉप्टरने रवाना होणार होते.. मात्र उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं.. त्यामुळे हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून शिंदे कारने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

19 Nov 2026 17:04 IST

गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती, ठाकरेंच्या आमदारांना पाठवलेली नोटीस बेकायदेशीर- कपिल सिब्बल

Shivsena Party & Symbol Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली.. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही... भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती आणि ठाकरेंच्या आमदारांना पाठवलेली नोटीस बेकायदेशीर...ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद... पुढील सुनावणी बुधवारी होणार... कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार.


 

19 Nov 2026 14:10 IST

अभिनेता सैफ अली खानला धमकी

Saif Ali Khan  : अभिनेता सैफ अली खानला धमकी...बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरच्या नावाने धमकी मिळाल्याची माहिती...मुंबई पोलिसांकडून धमकीची चौकशी, धमकी झिशान अख्तरनेच दिली की त्याच्या नावाने अन्य कोणी दिली, याची पडताळणी सुरू

19 Nov 2026 13:38 IST

नाशिक धर्मांतर, लैंगिक अत्याचार प्रकरणी इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

Imtiaz Jaleel : नाशिक धर्मांतर, लैंगिक अत्याचार प्रकरण...इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर...50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

 

19 Nov 2026 13:12 IST

पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का...माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश...प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश
 

19 Nov 2026 12:13 IST

शिवसेना UBTचं मुंबईसह राज्यभरात आंदोलन, शायना एनसींविरोधात शिवसेना UBT आक्रमक

शायना एनसींविरोधात शिवसेना UBT आक्रमक...शिवसेना UBTचं मुंबईसह राज्यभरात आंदोलन...बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा निषेध

19 Nov 2026 11:41 IST

स्पाईसजेट विमान कंपनी आर्थिक संकटात

स्पाईसजेट विमान कंपनी आर्थिक संकटात...काही विमानं रद्द तर काहींचं वेळापत्रक बदललं...जूनपासून विमान कर्मचा-यांचं वेतनही थकीत...60 पैकी 12 विमानं केवळ उड्डाणासाठी उपलब्ध?..स्पाईसजेटच्या आर्थिक संकटाचा प्रवाशांना फटका...याच पार्श्वभूमीवर स्पाइसजेट कंपनी उभारणार 5 हजार 500 कोटींचे भांडवल ...आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठी तयारी
 

19 Nov 2026 11:20 IST

पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद

Pune : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित एक महत्त्वाची बातमी... पुणे शहरातील महत्त्वाचा असलेला भिडे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय.. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या बांधकामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.... पुलाचे बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.. 31 डिसेंबरपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Nov 2026 10:44 IST

'बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांवर कारवाई करा', संजय राऊत यांची मागणी

Sanjay Raut on Shaina NC : 'बाळासाहेबांचा फोटो फाडणा-यांवर कारवाई करा'...खासदार संजय राऊत यांची मागणी...'बाळासाहेबांना सरकारकडून राष्ट्रपुरुषाचा दर्जा'...फोटो फाडण्याचं कृत्य निंदनीय, संतापजनक- राऊत...सोशल मीडियावर पोस्ट करताना संजय राऊतांनी कायद्यावर बोट ठेवलंय.. पाहूया राऊतांनी कायद्याचा दाखला देत असताना नेमकं काय म्हटलंय...

19 Nov 2026 10:16 IST

'शिवसैनिक, बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागते', शायना एनसी यांचा माफीनामा

Shaina NC : शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी मागितली माफी...'शिवसैनिक, बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागते'...'अनावधानानं घडलेल्या कृत्याबद्दल माफी मागते'...'बाळासाहेब माझ्यासाठी केवळ नेते नसून दैवत होते'...माझ्या कृतीचा, वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला- शायना एनसी

बातमीचा व्हिडीओ पाहा-


 

19 Nov 2026 09:19 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या घरावर हातोडा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या घरावर हातोडा ...भेंडी बाजारातील घर, कार्यालयावर बुलडोझर...मुंबई महापालिकेकडून दाऊदच्या घरावर कारवाई ...पोलीस बंदोबस्तात तोडकाम सुरु 
 

19 Nov 2026 09:14 IST

कल्याण, डोंबिवलीत गुरुवार, शुक्रवार पाणीपुरवठा बंद

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवार, शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.... गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.... पुढील आदेश येईपर्यंत पाणीपुरवठ्याचे हे नियोजन सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कल्याणचे अभियंता यांनी

19 Nov 2026 08:38 IST

राष्ट्रवादी SP, द्रमुक डिलिमिटेशनसाठी अनुकूल?

राष्ट्रवादी SP, द्रमुक डिलिमिटेशनसाठी अनुकूल? ..अटी-शर्तींसह विधेयकाला पाठिंब्याचे संकेत...दोन पक्षांच्या लवचिक भूमिकेमुळे सरकार आशावादी ...सरकारचा विधेयक मंजुरीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता...मतदारसंघ फेररचना सर्व राज्यांसाठी समान असावे अशी दोन्ही पक्षांची अट

19 Nov 2026 08:24 IST

ठाण्यात पाणीटंचाईचे सावट होणार गडद

Thane : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली आहे... मात्र, ती लागू होण्यापूर्वीच ठाणेकरांना दररोज ४७ दशलक्ष लिटर पाण्याची तूट सहन करावी लागत होती... आता आणखी ५९ दशलक्ष लिटरची घट होणार असल्याने शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.... वाढती लोकसंख्या आणि नव्या गृह संकुलांमुळे शहराची पाण्याची गरज ६३७ दशलक्ष लिटरवर पोहोचली असताना प्रत्यक्षात केवळ ५९० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे.... कपातीनंतर ही उपलब्धता सुमारे ५३१ दशलक्ष लिटरवर येण्याची शक्यता आहे..... त्याचा सर्वाधिक फटका घोडबंदर रोड, वर्तकनगर, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसराला बसत आहे.....तर काही भागांत कमी दाबाने किंवा अपुऱ्या वेळेत पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत....

19 Nov 2026 07:38 IST

गोकुळचं दूध 4 रुपयांनी महागलं

गोकुळचं दूध 4 रुपयांनी महागलं ...म्हशीच्या दूध विक्री दरात 4 रुपयांची वाढ...शनिवारपासून नवे दर लागू होणार ...एक लीटर दुधासाठी 82 रुपये मोजावे लागणार ...नव्या दरवाढीमुळे कोल्हापूरकराना एक लिटर दुधासाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहे तर मुंबईकराना ८२ रुपये द्यावे लागणार आहेत.
 

19 Nov 2026 07:36 IST

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात महासुनावणी...शिंदेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद पूर्ण...आज पुन्हा ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल बाजू मांडणार...'21 जूनच्या बैठकीत दिलीप लांडेंची स्वाक्षरी बनावट'...'ठाकरेंनी बहुमत गमावल्यानं मविआ सरकार कोसळलं'...शिंदेंच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहतांचा युक्तिवाद

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES