Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 22 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 22 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 22 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
22 Nov 2026 09:25 IST
नागपुरातील 53 भागांत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
NAGPUR : नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय... नागपुरातील 53 भागांत अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी जाहीर करण्या आलीय... सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत... शहरातील वाढती वाहनसंख्या, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, रुग्णालये आणि प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी लक्षात घेता निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत...
22 Nov 2026 08:42 IST
मुंबई आणि ठाण्यात गारठा वाढला
MUMBAI, THANE COLD : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीत वाढ झाली असून मुंबई, ठाण्यातही गारठा वाढला आहे... मुंबईत 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय... तर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात पारा 12 अंशापर्यंत खाली आलाय... मुंबईकरांना आठवड्याभरापासून पहाटे सुखद गारवा जाणवत आहे... उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे... पुढील काही दिवस तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे...
22 Nov 2026 08:25 IST
राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंचं निधन
RAMRAO WADKUTE : हिंगोलीच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र उपचारादरम्यानची त्यांची झुंज संपली असून रामराव वडकुते यांचं दुर्दैवी निधन झालं असून हिंगोलीसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
22 Nov 2026 08:23 IST
ताडदेव परिसरात इमारतीला भीषण आग
MUMBAI : मुंबईतील ताडदेव मधील हिरा मंजिल इमारतीला रात्री आग लागली.. एका वृद्ध महिला राहत असलेल्या घरामध्ये आग लागली त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली... हिरा मंदिर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली...त्यानंतर आग तिस-या आणि चौथ्या मजल्यापर्यंत गेली..या आगीमध्ये आठ जणांचे रेस्क्यू करण्यात आली असून यामध्ये दोन वृद्ध दोन महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश होता.
22 Nov 2026 08:22 IST
मणिपूरमध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा बळी
MANIPUR : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा बळी गेला आहे. तर हजारहून अधिक जणांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.. गेल्या दोन ते तीन दिवसांत ही घटना समोर आलीये. दारू प्याल्यानंतर लोकांची प्रकृती बिघडली. ही दारु कुठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत. गंभीर बाब म्हणजे या वर्षात विषारी दारू प्यायल्याने मध्य प्रदेश, गुजरातसह 6 राज्यांमध्ये 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.