Maharashtra Breaking News Today LIVE 5 November 2026 : महाराष्ट्रासह देश, विदेश आणि तुमच्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर
05 Nov 2026, 6:23 PM
स्वराज्याच्या राजधानीत प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभ राहणार
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभ राहतय.कर्जत मधील उल्हास नदीवर या मंदिराची उभारणी होणार असून कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून या मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी कर्जत नगरपरिषद मधून तब्बल कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची होणार आहे.या मंदिर परिसरात सर्वात मोठा स्वराज्य ध्वज ,म्युझियम, गार्डन आणि फूड कोर्ट यासारखे वास्तू उभे राहणार आहेत. येणाऱ्या भावी पिढीला या संकल्पनेतून आगळा वेगळा इतिहास आजमावता येणार आहे. कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांसह सर्व नगरसेवक यांनी या मंदिरा बाबत विशेष पुढाकार घेतलाय.
05 Nov 2026, 5:38 PM
पर्यावरण वाचविण्यासाठी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव यांचा तडकाफडकी राजीनामा
रायगडच्या कर्जत मधील साई डोंगर परिसरात सुरू असलेल्या टोरंट प्रकल्पासाठीची वृक्षतोड ही वनविभाग आणि पर्यावरण विभागाचे गैरकृत्य असून यासाठी सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या कर्जत मधील भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव एडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय.टोरंट प्रकल्पात जी काही गैरकृत्य वन विभाग आणि पर्यावरण विभाग यांनी केलेली आहेत ती धक्कादायक व घातक आहेत आणि त्याला विरोध करण हे राष्ट्रहिताचं कृत्य आहे अस म्हणत ऋषिकेश जोशी यांनी आपली नाराजी व्यक्त करत आपली खदखद सोशल मीडियावर व्यक्त करत हा राजीनामा दिलाय.मीं जिथे लहानाचा मोठा झालो, जिथे खेळलो बागडलो तिथे कोणी व्यापारी वृत्तीने बोगस कागद तयार करून आमच्या वृक्षवेलीवर, पशु पक्षावर व निसर्गावर घाला घालेल तर त्याच्या प्रोजेक्टच आम्ही श्राद्ध घालू अशी परखड भूमिका देखील जोशी यांनी मांडली आहे.
05 Nov 2026, 5:35 PM
संविधानाची हत्या करण्याचं काम काँग्रेसने केलं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरमध्ये महायुतीची पदयात्रा काढली गेली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून राहुल गांधी आणि विरोधकांवर घणाघात घातला. यात बोलताना फडणवीस म्हणाले की, 'संविधानाची हत्या करण्याचं काम काँग्रेसने केलं.लाल संविधानाचा पुस्तक कुठून आणलं?' असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, 'बाबासाहेब यांचं संविधान निळं होतं. आता राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन निघाले आहे. एकीकडे संविधानाचं नाव घ्यायचं आणि संविधानाने एक विमान दिलेली व्यवस्था सोडवण्याचा काम केल्या जात आहे.'
05 Nov 2026, 5:32 PM
राहुल गांधी च्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरूये - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरमध्ये महायुतीची पदयात्रा काढली गेली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून राहुल गांधी आणि विरोधकांवर घणाघात घातला. यात त्यांनी म्हटलं की, 'राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे. आम्हाला व्यवस्था परिवर्तन करायचं आहे असं गांधी म्हणत आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थामध्ये परिवर्तन करायचे आहे. जी व्यवस्था नेपाळ श्रीलंका बांगलादेश मध्ये झाली ती अति डावी व्यवस्था राहुल गांधी यांना भारतात निर्माण करायची. एका हातात संविधान ठेवायचं आणि दुसरीकडे संविधान विरोधी काम करायचं'.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.