• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने संपवल जीवन
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने संपवल जीवन

Maharashtra Breaking News Today LIVE 8 November 2026: महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींपासून ते देशातील राजकीय क्षेत्रातील हलचालींपर्यंत आणि गावगल्लीतील अपडेट्सपासून ते अंतरराष्ट्रीय बातम्यांपर्यंत सारं काही एकच ठिकाणी... दिवसभरातील ताज्या घडामोडींच्या ए टू झेड अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 08, 2026, 17:28 IST|Updated: Nov 08, 2026, 18:10 IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने संपवल जीवन
Image Credit: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
08 Nov 2026 18:10 IST
share

इंदिरा गांधींचा 'तो' निर्णय चुकीचा, सोनिया गांधींनी दिली कबुली


 

‘‘आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चूक होता. तत्कालीन पंतप्रधान आणि माझ्या सासू इंदिरा गांधी यांनाही त्याची जाणीव झाली होती, ’’ असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.‘बीलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वरील मत व्यक्त केले आहे. माझ्या मते, इंदिरा गांधी मनाने लोकशाहीवादी होत्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वीकारलेल्या मार्गाबाबत त्या स्वतःही कधीच पूर्णपणे समाधानी नव्हत्या. या निर्णयाचे ओझे त्यांच्यावर होते. आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयावर गांधी कुटुंबातही मतभेद होते. माझे पती राजीव गांधी यांनी या निर्णयाला विरोध केला होता.

08 Nov 2026 17:51 IST

'भाजपाला स्वीकृत नगरसेवक पदासाठीपात्र व्यक्ती मिळत नाही, याची मला लाज वाटते'


नंदुरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले आहे. नंदुरबार शहरात तब्बल एक लाख ११ हजार मतदार असतानाही भाजपाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकही पात्र व्यक्ती मिळत नाही, याची मला लाज वाटते, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवत प्रांताधिकाऱ्यांनी तो अवैध घोषित केला. त्यामुळे भाजपाला स्वीकृत नगरसेवक पद मिळू शकले नाही. याच मुद्द्यावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाची खिल्ली उडवत पक्षाला डिवचले आहे. गेल्या काही दिवसांपासून रघुवंशी सातत्याने भाजपावर टीका करत असून आता स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केल्याने नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

08 Nov 2026 17:45 IST

दोन्ही शिवसेना एकत्र येणे हीच दिवाळी, शिंदेच्या आमदाराचे विधान अन् चर्चांना उधाण

 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे.उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल, असं वक्तय शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. शिवसेना दुभंगली गेली, त्याच दिवशी हा दुर्दैवी प्रसंग यायला नको होता. चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

08 Nov 2026 17:43 IST

हार-तुरे बाजूला, मुरलीधर मोहोळांकडून दुष्काळग्रस्तांना लाखो रुपयांचा आधार

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत, वाघोलीमध्ये एक नवा आणि कौतुकास्पद आदर्श घालून देण्यात आलाय! वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च, हार-तुरे आणि बॅनरबाजीला पूर्णपणे फाटा देत, वाघोली गावचे माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी थेट दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय.मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाडळे परिवाराकडून दुष्काळग्रस्त बांधवांसाठी लाखो रुपयांची रोख मदत जाहीर करण्यात आली आहे. सत्तेचा उपयोग आणि नेत्याच्या वाढदिवसाचा उत्सव सामाजिक जाणिवेतून कसा साजरा करावा, याचं हे एक जिवंत उदाहरण ठरलं आहे.

08 Nov 2026 17:39 IST

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने संपवल जीवन

 

हिंगोलीत दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुष्काळाच्या संकटामुळे ऐन सणाच्या दिवशी बळीराजाने संपवले जीवन.हिंगोलीच्या सावरखेडा गावातील धक्कादायक घटना घडली.  कमळाजी लगड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून  दुष्काळामुळे शेतातील सोयाबीन आणि हळदीचे पीक करपले. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कर्जाची परतफेड कशी करायची? अपघातात जखमी झालेल्या मुलाच्या रुग्णालयातील उपचारांचा खर्च कसा भागवायचा? या आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

08 Nov 2026 17:34 IST

उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर ५ येथील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग



उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ५ परिसरातील डम्पिंग ग्राउंडला अचानक भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने परिसरातून प्रचंड प्रमाणात धुराचे लोट निघत आहेत. या  धुरामुळे आसपासच्या निवासी परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलासह अंबरनाथ आणि कल्याण येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

2

हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video

3

15 वर्षांपूर्वी दुसरं लग्न; मुलगा, सून, मुलगी यांनी...; नाशिकमधील RTO अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! पत्नी म्हणाली,'ती शेवटची तारीख...'

4

टॅटू काढण्याचा विचार करताय? पडू शकते महागात, आधी जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

5

22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेट सोन्याची विक्री; महाराष्ट्रात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात खळबळ, चिनी ‘गोल्ड पावडर'चा वापर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.


Maharashtra Breaking News Today LIVE 8 November 2026: हिंगोलीत दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुष्काळाच्या संकटामुळे ऐन सणाच्या दिवशी बळीराजाने जीवन संपवले.दिवाळीच्या पहिल्या पहाटे ऐतिहासिक किल्ले सज्जनगड शेकडो मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला.
शिरूर शहरालगत पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झालेत... शिरूरजवळील गोलेगाव रोड परिसरातील 'सुंदर सृष्टी' येथे मध्यरात्री बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. राज्यासह देशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.