)
बोईसर येथे बाईकचा भीषण अपघात झाला. बोईसर नवापूर रोडवर बाईक आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. बोईसर जवळील पाम टेंभी गावाच्या हद्दीत अपघात झाला. अपघातात बाईक वरील तिघांचा जागीच मृत्यू. भरधाव बाईकची ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातात मोहित शर्मा, रवी गुप्ता, आणि नयन महातो अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. बोईसर च्या गणेश नगर परिसरातील हे तिन्ही विद्यार्थी संध्याकाळचा सुमारास नांदगाव आलेवाडी बीचवर बाईकवरून जात असताना अपघात.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करावी व त्यांच्या पक्षाने भाजपप्रणित 'एनडीए'त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिशरद पवार यांचा पक्ष 'एनडीए'सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त 'लोकमत'ने रविवारच्या अंकात दिल्यानंतर एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राने सोमवारी हेच वृत्त दिले आणि वृत्तवाहिन्यांनीही तशा बातम्या दिल्याने या संबंधीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात अधिकच उधाण आले असताना
आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.'एनडीए' सोबत गेल्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार शरद पवार यांनी सोडला.
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड; १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस करण्यात आलीय. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल सादर झाला. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ,संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस आहे.किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आलीय.
सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात 3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झालीय.जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 30 हजार 600 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 61हजार700 रुपयांवर गेलीय.
सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात 3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झालीय.जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 30 हजार 600 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 61हजार700 रुपयांवर गेलीय.
पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. हे काम गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. या २४ तासांच्या कालावधीत ‘जी’ उत्तर, ‘के’ दक्षिण, ‘के’ उत्तर, ‘एच’ पूर्व व ‘एस’ विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच ‘के’ दक्षिण, ‘एस’ व ‘एन’ या विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येते. मात्र दरवर्षी ही पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. पण ही कायमस्वरूपी करण्यात यावी आणि तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी मागणी चैत्याभूमी स्मारक समितीने मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने मुंबईचे जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला होता. आज अखेर शासनाने शासन निर्णय जाहीर केलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त,आता दरवर्षी पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही.
Maharashtra Breaking News Today LIVE : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त,आता दरवर्षी पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही. शासनाने शासन निर्णय जाहीर केलाय.पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून याप्रसंगी रवींद्र धनगेकरांच्या पोस्टवर चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले आहे.