Maharashtra News Live Updates : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला. गोजरेज प्रॉपर्टीजतर्फे पुण्यात द एलिव्हेटेड लिव्हिंग एडिटच्या पुणे आवृत्तीचे आज महाळुंगे इथं शानदार अनावरण झाले...गोदरेज हिल रिट्रिटच्या गृहसंकुलात हा शुभारंभ सोहळा पार पडला. मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहेत लोकल ट्रेन उशिराने येत असल्याने प्रवासी मिळेल त्या लोकलमध्ये चढून पुढचा प्रवास करत आहेत. सायंकाळी घरी जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांना हुशार आणि धावत असलेल्या लोकल ट्रेन चा मोठा फटका बसलाय. आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.
26 Oct 2026, 7:53 PM
लोकल मध्ये चढू न दिल्याने एका रेल्वे प्रवाशाने केली डब्यातील रेल्वे प्रवाशाला मारहाण
रेल्वे वेळापत्रक कोळंबल्याने प्रवाशांमध्ये संताप
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी
मुंबईहून ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल मध्ये मोठी गर्दी
लोकल मध्ये चढू न दिल्याने एका रेल्वे प्रवाशाने केली डब्यातील रेल्वे प्रवाशाला मारहाण
26 Oct 2026, 7:47 PM
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा?
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती. मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे भांडुप प्रभाग क्रमांक १११ चे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीपक सावंत यांनी इतर मागासवर्गातून निवडणूक लढवताना सादर केलेले कुणबी - ८३ हे जात प्रमाणपत्र रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर महापालिका सभागृहात त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा नगरसेवक पद मिळावे यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत.
26 Oct 2026, 7:34 PM
लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहेत लोकल ट्रेन उशिराने येत असल्याने प्रवासी मिळेल त्या लोकलमध्ये चढून पुढचा प्रवास करत आहेत. सायंकाळी घरी जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांना हुशार आणि धावत असलेल्या लोकल ट्रेन चा मोठा फटका बसलाय. अजूनही कर्जत कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवासी लोकलची वाट बघत ताटकळ स्थानकावर उभे आहेत. दरम्यान तांत्रिक बिघाड जरी दुरुस्त झाला असला तरी रेल्वेचं कोलमडलेलं वेळापत्रक हे अजून काही तास तसच राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत
26 Oct 2026, 7:22 PM
शाश्वत सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर
"पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे, ही काळाची गरज आहे. शाश्वत सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत," असे मत 'जीके एनर्जी'चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास ऊर्जा बचतीबरोबरच स्थानिक पातळीवर कौशल्यविकास आणि स्वयंरोजगारालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
26 Oct 2026, 7:21 PM
दुष्काळग्रस्तांसाठी डोंबिवलीकरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख 11 हजार 710
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आणि उद्योजक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 रुपये देणगीचे 110 धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. या संदर्भात रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला डोंबिवली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी उस्फुर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा निधी अल्पावधीत गोळा झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले.
26 Oct 2026, 7:19 PM
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी..
डाऊन मार्गावरून येणाऱ्या लोकल गाड्या या मुलुंड भांडुप स्थानकावरूनच भरून येत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेत चढण्याकरिता प्रवाशांची मोठी कसरत होत आहे, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये गर्दी वाढली आहे.
26 Oct 2026, 7:16 PM
मध्य रेल्वेची वाहतूक दोन तास उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच विस्कळीत झालेली आहे सकाळच्या वेळेस ठाणे आणि मुलुंड दरम्यान ओव्हर वाईट वायर चा प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर भांडुप आणि विक्रोळी च्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे संध्याकाळची चार वाजून 4:14 मिनिटांची लोकल ही कल्याण स्टेशन सहा वाजता येत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
26 Oct 2026, 7:15 PM
भांडुपच्या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर उतरून गाडी पकडायला जाताना युवकाचा मृत्यू
भांडुप स्थानकावर लोकलच्या धडकेत २१ वर्षीय साहिल थिटे तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिल हा मुलुंड कॉलनीमधील अमर नगर परिसरात वास्तव्यास होता.
26 Oct 2026, 7:15 PM
कांजूरमार्ग रेल्वे स्थानका दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहेत लोकल ट्रेन उशिराने येत असल्याने प्रवासी मिळेल त्या लोकलमध्ये चढून पुढचा प्रवास करत आहेत. सायंकाळी घरी जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांना हुशार आणि धावत असलेल्या लोकल ट्रेन चा मोठा फटका बसलाय. अजूनही कर्जत कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवासी लोकलची वाट बघत ताटकळ स्थानकावर उभे आहेत. दरम्यान तांत्रिक बिघाड जरी दुरुस्त झाला असला तरी रेल्वेचं कोलमडलेलं वेळापत्रक हे अजून काही तास तसच राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.