• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Live Updates : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, वाहन चालकांसाठी अभय योजना
Live Now

Live Updates : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, वाहन चालकांसाठी अभय योजना

Maharashtra breaking news : राज्यातील त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 04, 2026, 02:49 PM IST|Updated: Nov 04, 2026, 03:49 PM IST
joinshare
Live Updates :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, वाहन चालकांसाठी अभय योजना
04 Nov 2026 15:49 IST (IST)
share

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

वाहनांवरील दंडासाठी अभय योजना
नियमभंग केलेल्या वाहनावरील दंडासाठी महाराष्ट्र वाहतुक पोलीस चलान अभय योजना-२०२६
चलनावरील प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार
वाहन धारकांना थकबाकी भरून वाहन दंडमुक्त करता येणार

04 Nov 2026 15:15 IST (IST)

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली, दिवाळीनंतर पुढील सुनावणी होणार. 

04 Nov 2026 15:10 IST (IST)

ध्रुव मेहता यांनी विविध प्रकरणांचा दाखल देत आहेत

ध्रुव मेहता मार्टिन जी. विश्वनाथन मल्लोत यांच्याशी संबंधित निकालाचा संदर्भ देण्यात आला, निकालातील परिच्छेद क्रमांक ७ आणि पान क्रमांक २३५ चा उल्लेख. 

हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले होते

खंडपीठाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.

२०१६ मध्ये यासंदर्भात आदेश पारित करण्यात आला होता.

याचिकाकर्ते त्या वेळी राज्यसभेचे सदस्य होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला आहे.

सद्यस्थिती लक्षात घेता, संबंधित कायदेशीर मुद्द्यांवर निर्णय देणे उचित ठरणार नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते असे ध्रुव मेहता म्हणाले

04 Nov 2026 14:58 IST (IST)

ध्रुव मेहता यांच्याकडून राणा केसचा उल्लेख

ध्रुव मेहता यांच्याकडून राणा केसचा उल्लेख
व्हिप नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाचा - मेहता
आयोगाने पुराव्याच्या आधारे निर्णय दिला - मेहता
आयोगाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय स्वतंत्र 
वकील ध्रुव मेहता यांनी युक्तीवादावेळी काही इतर प्रकरणांचा उल्लेख केला. 

04 Nov 2026 14:54 IST (IST)

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सव्वा तीन वाजेपर्यंत ध्रुव मेहता युक्तिवाद करणार

सव्वा तीन वाजेपर्यंत ध्रुव मेहता युक्तिवाद करणार
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ध्रुव मेहता यांना सव्वा तीन वाजेपर्यंत युक्तिवाद करण्यास सांगितले
उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे देखील सुरुवातीलाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले 

04 Nov 2026 14:52 IST (IST)

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात 
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु
एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद केला सुरू
आमदार अपात्रता संबंधी युक्तिवाद केला सुरू

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Maharashtra News

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्ञानेश कुमारांची चौकशी होणार; सरकारने दिले आदेश!

यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्ञानेश कुमारांची चौकशी होणार; सरकारने दिले आदेश!

2

धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

3

ODI मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, कोहलीने ठोकले अर्धशतक!

4

5 जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, शस्त्र हिसकावताना झटापट अन्....

5

मुंबईकरांनो, 'या' भागात फटाके फोडाल तर दिवाळी जाईल तुरुंगात; 2 डिसेंबरपर्यंत आदेश लागू!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra breaking news : शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरु असलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर पाहायला मिळतील. अतिक्रमण धारकांच्या मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी महापालिकेला हवी होती एक महिन्याची मुदतवाढ, मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करायचे असल्याचे महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण. ब्लॅागच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.