Maharashtra Breaking News Today LIVE : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 October 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 October 2026 : पदवीधर, शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि संभाजीनगर पदवीधरसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. तर टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारे मनोज जरांगे आता त्यांच्यावर आरोपांचे बॉम्ब टाकत आहेत. नारायणगडावरील दसरा मेळाव्यात 500 कोटींचा आरोप केल्यानंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत या आरोपांसंदर्भातील ऑडिओ क्लिप ऐकवली. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.
22 Oct 2026, 7:31 PM
Breaking News Today LIVE Updates : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले आहेत. राज ठाकरेंची आई कुंदा ठाकरे यांच्या आज वाढदिवस आहे. त्यामुळे काकू कुंदा ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी आले आहेत.
22 Oct 2026, 5:36 PM
Breaking News Today LIVE Updates : इथेनॉल खरेदी न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
-इथेनॉल खरेदी न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
-साखर उद्योगावर मोठं संकट येणार-हर्षवर्धन पाटील
-'राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक इथेनॉल निर्मितीत'
-इथेनॉल निर्मितीसाठी केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याबाबत साखर उद्योगासमोर प्रश्नचिन्ह
22 Oct 2026, 5:02 PM
Breaking News Today LIVE Updates : टायगर श्रॉफवरील गोळीबारापूर्वीचं CCTVफुटेज झी २४तासच्या हाती
टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वीच आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज झी २४तासच्या हाती लागलंय. या दृश्यांमध्ये एक आरोपी पिस्तुलांनी भरलेली निळ्या रंगाची बॅग घेऊन हॉटेलमधून बाहेर जाताना दिसतोय. याच पिस्तुलांतून आरोपींनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला होता. हे सीसीटीव्ही फुटेज संध्याकाळी 4 वाजून 12 मिनिटांचं आहे. दरम्यान इतर दोन आरोपी बाईकवरुन 4 वाजून 13 मिनिटांनी निघाल्याचं दिसतंय. याच हॉटेलमधून दोन्ही आरोपी बाईकवरुन थेट जुहूच्या फुटबॉल मैदानावर पोहोचले होते.
22 Oct 2026, 5:01 PM
Breaking News Today LIVE Updates : अनिल पंडित याला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी घोषित
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य अनिल पंडित याला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे अनिल पंडितने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला होता. गोळीबाराचा कट कोणी रचला, त्यामागील उद्देश काय होता आणि शस्त्रे कुठून मिळवली, याचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करून पोलिसांनी 9 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. वापरलेले मोबाईल जप्त करणे, शस्त्रे हस्तगत करणे आणि फरार आरोपींची भूमिका तपासणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.
22 Oct 2026, 4:58 PM
Breaking News Today LIVE Updates : सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पहिली झलक समोर
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाची पहिली झलक समोर आलीये.. प्रेम, कर्तव्य, विरह आणि आपलेपणाचा शोध अशा भावनांवर आधारीत या पुस्तकाचं कथानक आहे अशी माहिती सोनिया गांधींनी दिलीये. या पुस्तकाची झलक वाचकांसमोर सादर करण्यासाठी उत्सुक असल्याचंही यावेळी सोनिया गांधी म्हणाल्यात..
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे सुपुत्र तसेच प्रसिद्ध व्हिज्युअल आर्टिस्ट-फोटोग्राफर रेहान वाड्रा यांच्या कला प्रदर्शनातून दिल्लीतील आंदोलनांचे 70 हून अधिक फोटो जबरदस्तीने हटवण्यात आले आहेत. दिल्लीतील बिकानेर हाऊसमध्ये 21 ऑक्टोबर रोजी रेहान वाड्रा यांच्या 'No Idea is Final' या वैयक्तिक फोटोग्राफी प्रदर्शनाचा प्रीव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी बिकानेर हाऊस प्रशासनाने रेहान यांच्यावर फोटो हटवण्यासाठी दबाव आणला. बिकानेर हाऊस प्रशासनानं सध्याच्या राजकीय वातावरणामुळे हा निर्णय घेतल्यानं रेहान वाड्रा म्हणालेत. या फोटोंमध्ये गेल्या 6 महिन्यांत दिल्लीत झालेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या विविध आंदोलनांचे चित्रण करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दृश्ये आणि एका फोटोमध्ये राहुल गांधी देखील दिसत होते. याशिवाय, प्रशासनाने राष्ट्रीय ध्वजाचे 2 फोटोही हटवण्यास सांगितले होते, मात्र रेहान यांनी तिरंग्याचे फोटो हटवण्यास साफ नकार दिलाय. जेव्हा सत्तेत बसलेला एखादा माणूस दुसऱ्याच्या बोलण्याला किंवा विचारांना घाबरतो, तेव्हा त्याला समजत नाही, पण ती सत्ता वाचवण्याच्या नादात तो ती आधीच गमावून बसलेला असतो.
22 Oct 2026, 4:57 PM
Breaking News Today LIVE Updates : जरांगेंनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपवर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया
जरांगेंनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपवर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिलीय.... ------------- मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं-शिरसाट ---------- प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे-शिरसाट ---------- जरांगेंनी नावंही जाहीर करुन टाकावी-शिरसाट ----------- एकनाथ शिंदेंच्या बदनामीचा प्रयत्न-शिरसाट ------------- तर... मराठा समाजात फूट पाडण्याचं षडयंत्र- अर्जून खोतकर ----------- ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे- खोतकर
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील माणसं भाजपचीच लोकं यांत दुमत नाही असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. भाजपचे वरिष्ठ नेते यांत नसले तरी कुणाच्या सांगण्यावरून हे करण्यात आलंय का असा सवाल कदम यांनी उपस्थित केलाय. तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तर थेट ऑडिओ क्लिपमधील व्यक्तींची नावं घेत सर्व यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केलीय. तर ऑडिओ क्लिपशी भाजप नेत्यांचा संबंध नाही, सामंतांचा गैरसमज दूर करणार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय.
22 Oct 2026, 4:55 PM
Breaking News Today LIVE Updates : 'समाजाचं काम केलं म्हणून आम्हाला मारुन टाकतील'
ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलंय. ऑडिओ क्लिपमधील लोक कोण आहेत ते शोधा असं आव्हान जरांगेंनी दिलंय. तसंच 500 कोटी दिले असं म्हणणा-यांना शिंदेंनी जाब विचारावा असंही जरांगेंनी म्हटलंय. समाजाचं काम केलं म्हणून आम्हाला मारून टाकतील असा आरोपही जरांगेंनी केलाय.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारे मनोज जरांगे आता त्यांच्यावर आरोपांचे बॉम्ब टाकत आहेत. नारायणगडावरील दसरा मेळाव्यात 500 कोटींचा आरोप केल्यानंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत या आरोपांसंदर्भातील ऑडिओ क्लिप ऐकवली... या ऑडिओ क्लिपची झी 24 तास पुष्टी करत नाही.. जरांगे दावा करत असलेली ऑडिओ क्लिप विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे मार्फत मनोज जरांगे यांना 500 कोटी पोहोचल्याचा दावा या क्लिपमध्ये असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.
22 Oct 2026, 4:53 PM
Breaking News Today LIVE Updates : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरण
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरण ---------------- प्रकरणात आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी ------------ आरोपी राधा, बबिता, कुणाल आणि सुमितला कोठडी ---------------- आरोपींना दिल्लीमधून पोलिसांनी अटक केली होती
22 Oct 2026, 4:52 PM
Breaking News Today LIVE Updates : पदवीधर, शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी
पदवीधर, शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी यंत्रणा देखील सज्ज आहेत. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि संभाजीनगर पदवीधरसाठी उद्या मतदान होणार आहे. तसंच पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक विभागासाठीही उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत. महायुती आणि मविआत थेट लढत होणार आहे. काही ठिकाणी महायुती आणि मविआला बंडखोरी क्षमवण्यात यश आलं तर काही मतदारसंघात अजूनही बंडखोरांनी माघार घेतली नसल्यानं मविआ-महायुतीसाठी अडचणीचं ठरणार आहे. पुणे शिक्षक विभाग निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतच थेट सामना होणार आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.