SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE : डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक - खर्गे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 28, 2026, 10:46 IST | Updated: Nov 28, 2026, 14:26 IST
Image Credit: Maharashtra Breaking 28 November 2026
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने तातडीची बैठक बोलावली आहे. डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत सामनाच्या अग्रलेखात मोठा दावा करण्यात आलाय. महाराष्ट्र काँग्रेसकडून राहुल गांधी आणि शरद पवारांचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. राज ठाकरे आज बदलापूर आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे. 

28 Nov 2026 13:43 IST

लोकशाही संपुष्टात येईल - खर्गे

संविधानाच्या कलम ३३ नुसार  SC आणि ST च्या जागा वाढल्या पाहिजेत

मात्र विधेयकात अशी तरतूद नाही

2027 ची जनगणना होणार आहे

याविषयी सरकारने काही सांगितलं नाही

SC आणि ST चा शेअर मिळू नये असे सरकारला वाटते

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच डिलिमिटेशन ची जबाबदारी देण्यात येणार आहे

हे आम्हाला स्वीकार नाही

सर्व काही गोलमाल होईल

डिलिमिटेशन मध्ये हे काहीही करू शकतात

10 कोटी लोकांना मतदार सूचीतून हटवण्यात आले आहे

अशा व्यक्तीच्या हातात जबाबदारी देणार आहेत

आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये कसे डिलिमीटेशन केले हे आम्ही बघितले

हे जनरल जागेला आरक्षित करतील आणि आरक्षित जागेला जनरल करतील

सत्ता काबीज करण्यासाठी मजबूत काम हे करत आहेत

एप्रिल महिन्यात हे विधेयक आणले गेले

यांनी TMC, NCP, शिवसेना तोडून आकडे जमवले

कोण कोण साथ देणार हे आणखी पक्के नाही

देशाचे मोठे नुकसान होणार आहे

काही लोकांना समजत नाहीये

लोकशाही संपुष्टात येईल

एकदा सत्ता यांच्या हातात गेली तर हे संविधान बदलतील

मनात जे आहे ते करण्यासाठी हत्यार म्हणून वापरतील

मोदी कायमस्वरूपी चीनमध्ये जसे आहे तसे करत आहेत

RSS BJP च्या हातात सरकार राहील

मनुस्मृतीची अंमलबजावणी केली जाईल

सर्वांनी मिळून या विधेयकाच्या विरोध केला पाहिजे

पाच वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

28 Nov 2026 13:40 IST

जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच ट्विट

जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच ट्विट

माझ्या शांततेचा अर्थ सहमती समजू नका

जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्ष पाठिंबा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर नताशा आव्हाड यांचं ट्वीट चर्चेत

माझ्या शांततेला सहमती समझू नका असं म्हणत बिलाच्या विरोधात भूमिका कायम असल्याचे केले  ट्वीट

 

 

28 Nov 2026 13:39 IST

डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक - खर्गे

आज इंडिया आघाडीचे सर्व नेते मिळून आम्ही निर्णय घेतला आहे की, मोदी सरकारकडून संविधान दुरुस्ती विधेयक आणले जात आहे..ते लोकशाहीसाठी मोठा धोका आहे. पूर्ण सत्ता काबीज करण्यासाठी यांनी 800 पार जागा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार नेहमी सत्तेत राहण्यासाठी हे करत आहे. SC, ST सोबत यामध्ये भेदभाव होणार आहे.

28 Nov 2026 13:37 IST

अनुसूचित जाती - जमातीला मोठा धोका - खर्गे


अनुसूचित जाती - जमातीला मोठा धोका - खर्गे
 

28 Nov 2026 13:37 IST

सत्ता कायमस्वरुपी ठेवण्यासाठी भाजपचा डाव - खर्गे

सत्ता कायमस्वरुपी ठेवण्यासाठी भाजपचा डाव - खर्गे
 

28 Nov 2026 13:36 IST

डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक - खर्गे

डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक - खर्गे

28 Nov 2026 13:34 IST

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची काढली आठवण

 

मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती होण्याच्या चर्चा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे चुलतभाऊ अजित पवार यांची आठवण काढली. त्यांनी नाताळच्या दिवशी एक कौटुंबिक फोटो शेअर केला आणि एक भावनिक पोस्ट लिहिली.

 

 

28 Nov 2026 13:32 IST

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ जारी

 

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ शेअर केला त्या ते म्हणाले की, आम्ही आमच्या 'महिला शक्ती'ला एक वचन दिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

 

28 Nov 2026 13:05 IST

रोहित पवार राष्ट्रवादी SPची साथ सोडणार?

रोहित पवार राष्ट्रवादी SPची साथ सोडणार?
---
'दादांनी वेगळा निर्णय घेतला तेव्हा विचारांच्या बाजूने लढलो'
----
'आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल'
-----
डिलिमिटेशन घडामोडींवरून रोहित पवारांचं सूचक ट्विट

 

 

28 Nov 2026 12:36 IST

डिलिमिटेशन बिलावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट - सूत्र

 

डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनंतर काही आमदार, खासदार नाराज

डिलिमिटेशन बिलावरून पक्षाची असलेल्या संस्पेन्स भूमिकेनं नेत्यांची खदखद

आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण

पक्षांच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची नेत्यांची नाराजी

काही आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली नाराजी


शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदार एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली खदखद

शिवसेनेनंर शरद पवार गटाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा

28 Nov 2026 12:03 IST

'शरद पवार भाजपच्या कुटील डावात अडकणार नाहीत'

'शरद पवार भाजपच्या कुटील डावात अडकणार नाहीत'
---
'राष्ट्रवादी SP खासदार डिलिमिटेशनविरोधात मतदान करतील'
---
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आशा

28 Nov 2026 11:55 IST

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून सुशीलकुमार शिंदे-प्रणिती शिंदेमध्ये मतभेद?

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून सुशीलकुमार शिंदे-प्रणिती शिंदेमध्ये मतभेद?
- डिलिमिटेशन व्हायला हवं, सुशीलकुमार शिंदेंची भूमिका
- डिलिमिटेशनवरून प्रणिती शिंदेंची राष्ट्रवादी SPवर टीका
- राष्ट्रवादी SPकडून देश आणि संविधानाशी गद्दारी- प्रणिती शिंदे

28 Nov 2026 11:50 IST

थोड्याच वेळात इंडिया आघाडीची बैठक सुरू होणार

बैठकीसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, गौरव गोगोई , कपिल सिब्बल, राजदचे मनोज झा, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी पोहोचले. 

बैठकीसाठी हे नेते पोहोचले

  1. केसी वेणुगोपाल
  2. पवन खेडा 
  3. प्रमोद तिवारी
  4. नसीर हुसेन
  5. अभय कुशवाह (राजद)
  6. रामजी लाल सुमन (समाजवादी पक्ष)
  7. पी संतोष (सीपीआय)
  8. एनके प्रेमचंद्रन (आरएसपी)
  9. मोहम्मद बसीर (IUML)
  10. ए रहीम (सीपीएम)
  11. मोहम्मद रमजान (NC)

28 Nov 2026 11:45 IST

8व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागलं आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण हा आयोग लागू करणं केंद्र सरकारसाठी आर्थिकदृष्ठ्या सोपं असणार नाही. कारण आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारला ३ लाख कोटी रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. डॉएश बँक रिसर्चच्या अहवालातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

28 Nov 2026 11:41 IST

जावेद अख्तर यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ गीतकार, लेखक आणि विचारवंत जावेद अख्तर यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 2026 चा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  पुण्यातील समता भूमी, महात्मा फुले स्मारक येथे पुरस्कार देण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

28 Nov 2026 11:35 IST

डिलिमिटेशन विधेयकाबद्दल मायावतींचा मोठा निर्णय

--बसपाच्या मायावतींचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा
--33% महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत

28 Nov 2026 11:25 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक - सूत्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती

डिलिमिटेशन बिल संसदेत आल्यानंतर नंतर NDA मध्ये होणाऱ्या बदलाबाबत चर्चा… एनसीपी शरद पवार गटाच्या आगामी घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती

राष्ट्रवादीला अपेक्षित असलेले अर्थमंत्री पद याबाबत तुर्तास निर्णय होणार नसल्याची माहिती तसेच यावर पक्षीय पातळीवर चर्चा नको अशाही सूचना

एनडीएचा घटकपक्ष म्हणून पक्ष बळकटकरण्याच्या आणि अंतर्गत वाद संपुष्टात आणण्याच्या अमित शाह यांच्या सूचना

मागील आठवड्यात बुधवारी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती

28 Nov 2026 11:20 IST

अकोल्यात स्विमिंग पूलच्या पाण्यावरून वाद


विदर्भात एकीकडे पाणीटंचाई असताना अकोला महापालिकेकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप आहे... सांस्कृतिक भवन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या जलतरण तलावात पाणी भरण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा वापर झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे... या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे... मात्र सत्ताधाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून तलावाच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ दहा टक्के पाणीच भरल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय... केवळ प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून आरोप केले जात असल्याची टीका केलीय...

28 Nov 2026 11:19 IST

'यवतमाळमध्ये 50 हजार नाही लाखो झाडं तोडण्याचा डाव'

यवतमाळमधील सिमेंटेशन प्रकल्पासाठी 50 हजार नाही लाखो झाडं तोडण्याचा डाव असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय...तसेच विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय...सोबतच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा निर्धारही वडेट्टीवारांनी बोलून दाखवलाय...

 

28 Nov 2026 11:18 IST

'शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा'

डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केलीय...शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे...त्यांना कुठलाही विचार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...सोबतच सत्तेशिवाय त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार नसतो...सत्तेशिवाय ते राहू शकत नाही असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES