SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 october 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 23, 2026, 07:40 AM IST | Updated: Oct 23, 2026, 12:09 PM IST
Image Credit: Breaking news live updates
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 october 2026: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या 5 मतदारसंघात आज मतदान होत आहे. 5 जागांसाठी एकूण 182 उमेदवार रिंगणात आहेत. तर 10 लाख 68 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. महायुती आणि मविआत मुख्य लढत असली तरी दोन्ही बाजूंची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. त्याचबरोबर, राज्यातील व देशातील इतर ठळक घडामोडींचा आढावा घेऊयात लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

23 Oct 2026, 12:04 PM

दिवाळीनंतर राज ठाकरे महाराष्ट्रातील दुष्काळ दौ-यावर

दिवाळीनंतर राज ठाकरे महाराष्ट्रातील दुष्काळ दौ-यावर

दुष्काळात मनसेचा शेतक-यांना मदतीचा हात

राज्यात दुष्काळ परिस्थिती- बाहेर पडा आणि शेतक-यांच्या बाजुनं उभे रहा- राज ठाकरेंचे मनसे पदाधिका-यांना आदेश

जनावारांना चारा मिळण्यास मदत करा

राज ठाकरेंच्या मनसे बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा

23 Oct 2026, 12:03 PM

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलवरून धमकी

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलवरून धमकी

दिल्लीतील रोहिणी येथील वेंकटेश्वर पब्लिक स्कूल आणि मयूर विहार येथील सालवान पब्लिक स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सकाळी 9.37 आणि 9.57 वाजता धमकीची माहिती मिळाली

दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

प्रकरणाचा तपास सुरू

23 Oct 2026, 10:14 AM

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी दीड हजार झाडांवर कु-हाड?

 

एकीकडे मुंबईला प्रदुषणाचा विळखा असताना गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १,५२४ झाडांवर कु-हाड चालवली जाणार आहे...गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १,५२४ झाडांबाबत वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे....या प्रस्तावानुसार ६९५ झाडे तोडणार, तर ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे... वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखीनच खालावण्याची भीती व्यक्त केली जातेय..त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे...

23 Oct 2026, 10:10 AM

पुणे शिक्षक मतदार संघात पैशांचं आमिष दिल्याचा आरोप

 

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत... पुणे शिक्षक मतदार संघात पैशांचं आमिष दिल्याचा आरोप उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी केलाय.... शिक्षकांना मतदानासाठी 15 हजार दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.
 

23 Oct 2026, 9:13 AM

अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना विजयाचा विश्वास

 

पुणे शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. काही वेळापूर्वी सानप यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं औक्षण केलंय..तसंच सानप यांनी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलंय..

23 Oct 2026, 9:12 AM

पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

 

पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी साता-यात मतदानाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ आणि पदवीधरसाठी ९३ अशी एकूण १३७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे ९,४५४ तर पदवीधर मतदारसंघाचे ४७,४६३ मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

23 Oct 2026, 9:12 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: अमरावतीमध्ये मतदानाला सुरुवात

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील ३५ हजार ८१० शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २६ उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. सर्व पाचही जिल्ह्यात ८१ मतदान केंद्र आहेत  सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे

23 Oct 2026, 9:10 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: बुलढाण्यात पाणी उपसा बंदीच्या सूचना

--बुलढाण्यात पाणी उपसा बंदीच्या सूचना
--येळगाव धरणातील पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना
--17 ग्रामपंचायतींना पाणी उपसा बंद करण्याचं पत्र

23 Oct 2026, 8:20 AM

मुंबईकरांवर दुहेरी संकट

 

जगातील सर्वात प्रदूषित शहरांत मुंबई तिसरी…बाष्पीभवनामुळे धरणामधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट…१७ दिवसांत जलसाठा ६ टक्क्यांनी घटला.

23 Oct 2026, 8:20 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ

 


दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ...डाळींसह कडधान्याच्या दरात प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांची वाढ... कमी पावसामुळे उत्पादन घटल्याचा फटका...

23 Oct 2026, 8:19 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

 

ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव... खासगी बिल्डरच्या मागणीला वनविभागाची मान्यता...143 एकर फ्लेमिंगोअभयारण्याची जागा संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव...

23 Oct 2026, 8:18 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: ''शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी महायुतीकडून पैसे वाटप''

 


शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी महायुतीकडून पैसे वाटप…ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप…प्रत्येक मतदार शिक्षकाला १५ हजार दिल्याचा दावा…

23 Oct 2026, 8:18 AM

नितेश कराळेंना बंडखोरी भोवली

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: 


नितेश कराळेंना बंडखोरी भोवली... पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी.... पक्षाच्या कारवाईनंतर नितेश कराळेंना अश्रू अनावर... याचे परिणाम भोगावे लागतील... मविआला इशारा

23 Oct 2026, 8:16 AM

मतदारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत. खासगी आस्थापनांतील पात्र कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES