Maharashtra Breaking News Today LIVE: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा श्रीक्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा
Dasara Melava 2026: उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार.तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटर पार पडणार. याशिवाय RSS, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचाही मेळावा असेल. या आणि इतर घडामोडींवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून अपडेट्स मिळवा.
Dasara Melava 2026 Maharashtra Breaking News Today LIVE: महाराष्ट्रातील आजच्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळावा २०२६ च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यांकडेही लक्ष असेल. राज्यातील राजकीय घडामोडी, नेत्यांची भाषणं, महत्त्वाच्या घोषणा आणि ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी या ब्लॉगला फॉलो करा.
20 Oct 2026, 2:24 PM
अंतरवालीत उपोषणाला बसल्यानंतर 8 दिवसांनी मला एक गोष्ट कळाली
अंतरवालीत उपोषणाला बसल्यानंतर 8 दिवसांनी मला एक गोष्ट कळाली.माझ्या विरोधात असं षड्यंत्र ठरलं आहे मी कुणाचंही बदनामी करत नाही एकनाथ शिंदेंनी मला यावर उत्तर द्यावे, उद्या संध्याकाळी उत्तर द्या. शिंदे साहेब तुम्ही भाजपच्या लोकांना मला 500 कोटी रुपये दिले असं सांगितलं का.?
20 Oct 2026, 1:52 PM
मराठा समाजाच्या सर्व अडी अडचणीसाठी स्वतंत्र नंबर दिला जाईल - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या सर्व अडी अडचणीसाठी स्वतंत्र नंबर दिला जाईल या नंबरवर त्याने अडीअडचणी कळवाव्यात असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
20 Oct 2026, 1:11 PM
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा श्रीक्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. थोड्याच वेळात जरांगे नारायण गडावर पोहोचतील आणि दसऱ्या मेळाव्यानिमित्त संबोधित करतील. नारायणगडाच्या पायथ्याशी हा दसरा मेळावा होऊ घातला आहे. आरक्षणाच्या मुद्दायवर जरांगे काय बोलणार याची उत्सुकता लागलीय..
20 Oct 2026, 12:56 PM
दसऱ्याच्या गोडव्याला महागाईचा फटका...
साखर, दूध महागल्यानं दस-याच्या मिठाईही महागली फटका...श्रीखंडाचे दर किलोमागे ५०० रुपयांच्या पार
20 Oct 2026, 12:10 PM
'बॉलिवूडला सुरक्षा देण्याची वेळ का येते?- राऊत
'बॉलिवूडला सुरक्षा देण्याची वेळ का येते?- राऊत ----- 'मुंबई गुंड आणि बिल्डरांच्या हाती गेली- राऊत
20 Oct 2026, 11:04 AM
मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दोन मेळावे
मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दोन मेळावे --- शिवाजी पार्कात ठाकरेंची तोफ धडाडणार --- गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आवाज --- राजकीय परिस्थिती, दुष्काळावर काय बोलणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमात स्थान देण्यात आलेलं नाही. गावागावांमधल्या शिवसैनिकांनी किंवा दूरच्या जिल्ह्यांमधल्या शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यासाठी येऊ नये, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अधिकाधिक मदत करावी असा सल्ला मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या मेळाव्यासाठी फक्त मुंबई, ठाणे, पालघर नवी मुंबई आणि रायगडच्या कार्यकर्त्यांनी येण्याचे निर्देशही शिंदेंनी दिले आहेत. दरम्यान, कलानगर परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये.
20 Oct 2026, 8:56 AM
नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचं संकट
नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचं संकट घोंगावू लागलं आहे... नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके सरकारने पहिल्या टप्प्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने ग्रामीण भागातील जलसाठे झपाट्याने खालावत आहेत. त्यामुळे येत्या जून २०२७ पर्यंत जिल्ह्यातील तब्बल २ हजार १०६ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ३५५ टँकरचे नियोजन केलं असून, तब्बल १३ कोटी ८४ लाख ४२ हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा शासनाला सादर केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०५, दुसऱ्या टप्प्यात १३५, तर तिसऱ्या टप्प्यात ११५ टँकर सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शासनाच्या मंजुरीनंतर या आराखड्याची अंमलबजावणी कशी होते आणि टंचाईग्रस्त गावांपर्यंत पाणी कसं पोहोचवलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
20 Oct 2026, 8:25 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर
सुनेत्रा पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली-भेटीदरम्यान दोघांमध्ये अर्थखात्यावर चर्चा-सूत्र,राज्यातील इतरही विषयावर भेटीदरम्यान चर्चा
20 Oct 2026, 8:23 AM
मच्छिंद्रनाथ गड आष्टी येथे आमदार सुरेश धस यांचा दसरा मेळावा
विजयादशमीला श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर १८ वा दसरा मेळावा,संत-महंतांच्या उपस्थितीत धार्मिक सोहळा; आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे सालाबादप्रमाणे, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मेळाव्याचे अठरावे वर्ष असून, आमदार सुरेश धस यांच्यासह विविध संत-महंतांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
20 Oct 2026, 8:23 AM
नागपुरमध्ये RSS दसरा मेळावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) वार्षिक विजयादशमी उत्सव (दसरा मेळावा) आज नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना आणि देशाला संबोधित करतील. त्याचबरोबर माझी उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि इस्राईलचे महामणिज्यक उपस्थित असतील
20 Oct 2026, 8:21 AM
नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आज बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगड येथे पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी ११:०० वाजता नारायणगडावर दाखल होतील आणि जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील
20 Oct 2026, 8:19 AM
भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पारंपारिक दसरा मेळावा आज बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणार आहे, पंकजा मुंडे मार्गदरशन करणार -सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणारा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा.
20 Oct 2026, 8:17 AM
उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा
उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता.आजच्या दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी पक्षाच्या वतीने मोठी घोषणा करण्याची शक्यता,ठिकाण: नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्र, गोरेगाव, मुंबई.वेळ: उद्या सायंकाळी ५:०० वाजता हा मेळावा सुरू होईल
20 Oct 2026, 8:16 AM
शिवसेना UBT पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा
शिवसेना UBT पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) मैदानावर पार पडणार आहे. उध्दव ठाकरे मार्गदरशन करणार.सायंकाळी ५:०० ते ६:०० वाजता मेळाव्याला सुरुवात होईल.
'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.