SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : 04 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 04 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 04, 2026, 06:29 AM IST | Updated: Nov 04, 2026, 08:25 AM IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 04 नोव्हेंबर 2026  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

04 Nov 2026, 8:24 AM

सुप्रीम कोर्टानं बीएमसी आयुक्तांना फटकारलं

SURPEME COURT ON BMC : अतिक्रमण हटवलं नसल्यानं सर्वोच्च न्यायालयानं मुंबई पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे वेतन रोखले...बोरिवलीमधील बेस्ट बसस्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अतिक्रमण होतं, हे हटवण्याची जबाबदारी बीएमसी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर होती मात्र अतिक्रमण न हटवलं गेल्यानं पालिका आयुक्त अश्विनी भिडेंसह अधिकाऱ्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन रोखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत..तसेच अतिक्रमणधारकांना मदत करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी त्यांच्याशी संगनमत करीत आहेत का, असा सवाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केला...तसेच पालिकेला 5 लाखांचा दंडही ठोठावत कारणे दाखवा नोटीस बजावलीये...

04 Nov 2026, 7:55 AM

दुष्काळग्रस्त भागातील फी-माफीसाठी नवे नियम

DRAUGHT NEWS : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फीमाफीचा दिलासा मिळणार असला, तरी या सवलतीसंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून काही अटी आणि शर्ती जाहीर केल्यात.. त्यानुसार बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच परीक्षेला दुस-यांदा बसणा-या विद्यार्थ्यांना ही फीमाफी मिळणार नाही. तसेच शहरात नोकरी वा व्यवसाय करणा-या आणि गावी शेतजमीन असणा-यांच्या पाल्यांनाही हा लाभ मिळणार नाही. दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे २०२६-२७ मधील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय... या सवलतीसाठी सुमारे 20 लाख 38 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे...

04 Nov 2026, 7:54 AM

साता-यात ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण

SATARA : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला चालता ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवून दिला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काल पासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील किणी टोलनाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. तब्बल २० तासांपासून महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला आंदोलकांनी आग लावली. या घटनेमुळे ऊसदर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने मुंबई-पुण्याहून कोल्हापूर, बेळगाव आणि बंगळूरकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत

04 Nov 2026, 7:51 AM

ऊस दरासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक

KOLHAPUR : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये.. पुणे बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी पुणे बेंगळुरू महामार्गावर झोपले...दरम्यान ऊस दराचा तोडगा न निघाल्यास मुंबई-पुण्याला पुरवठा होणारा दूध आणि भाजीपाला रोखण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय.  शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर मंत्र्यांची आणि सरकारचीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टींनी घेतलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.

ZEENEWS TRENDING STORIES