• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'मोदींच्या जवळच्या लोकांवर अदृश्य शक्ती हल्ले करतेय', ठाकरेंच्या सेनेला वेगळीच शंका; अमित शाहांचं नाव घेत म्हणाले, 'यात काहीतरी...'

'मोदींच्या जवळच्या लोकांवर अदृश्य शक्ती हल्ले करतेय', ठाकरेंच्या सेनेला वेगळीच शंका; अमित शाहांचं नाव घेत म्हणाले, 'यात काहीतरी...'

"हा मजकूर लिहीत असताना नागपूर येथील दहा प्रमुख सराफांना बिष्णोई गँगकडून मोठ्या खंडणीसाठी धमक्या आल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर लगेच ‘चिंता करू नका. सराफांना पूर्ण सुरक्षा देऊ,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले."

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 04, 2026, 08:49 AM IST|Updated: Nov 04, 2026, 09:03 AM IST
joinshare
'मोदींच्या जवळच्या लोकांवर अदृश्य शक्ती हल्ले करतेय', ठाकरेंच्या सेनेला वेगळीच शंका; अमित शाहांचं नाव घेत म्हणाले, 'यात काहीतरी...'
Image Credit: केंद्रीय गृहमंत्र्यांना केलं लक्ष्य (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'जर मी बॅलेटवर असतो, तर...', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

'जर मी बॅलेटवर असतो, तर...', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

2

काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण

3

21 वर्षीय तरुणी, 3 पुरुष अन् एक फ्लॅट...लातूरच्या छाप्यामध्ये काळा कारभाराच्या उघड, पोलीसही चक्रावले

4

'तुला मुलगी झाली, फ्लॅटमध्ये दोरी..; सासरच्यांचे ते शब्द अन् पायलने घेतला टोकाचा निर्णय, 'त्या' रिकाम्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

5

चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या विहानच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? 2 महिन्यांनी चौकशी अहवाल सादर, म्हणाले 'असं एकच कारण...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

"गृहमंत्री अमित शहा हे ‘लोकशाही वाचवा’ नामक आंदोलनातून पदयात्रा वगैरे करताना दिसू लागले आहेत. मोदी-शहांच्या बेबंदशाहीविरुद्ध काँगेस पक्ष आणि इंडिया आघाडी जन आंदोलन करत आहे. त्यामुळे भाजपही लोकशाही रक्षणार्थ प्रति आंदोलने करत आहे. गृहमंत्री व त्यांचे लोक अशा ढोंगबाजीमुळे उघडे पडत आहेत. अमित शहा किती बकवास गृहमंत्री आहेत याचे चित्र रविवारी मुंबईच्या जुहू परिसरात दिसले व ते संपूर्ण जगाने पाहिले," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "हिंदी चित्रपटांचे महानायक अमिताभ बच्चन हे दर रविवारी जुहूतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात, पण 1 नोव्हेंबर सकाळचे दृश्य मुख्यमंत्री फडणवीस व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना लाज आणणारे होते. ‘जलसा’चे दरवाजे उघडताच महानायक बच्चन समोर आले ते ‘बुलेटप्रूफ’ काचेच्या पिंजऱ्यातून. याच बुलेटप्रूफ काचेच्या पिंजऱ्यातून बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना अभिवादन केले. बच्चन यांचे वय 84 वर्षांचे आहे. ते आता शरीराने थकले आहेत. अशा महानायकास बुलेटप्रूफ पिंजऱ्यातून फिरावे लागते, बच्चन व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित वाटत नाही हे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे अपयश आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

खुलासा मुंबई पोलिसांनी करायला हवा

"राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे दिवसाढवळय़ा निघत आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने व्यापारी, बिल्डर्स, सिने अभिनेते व निर्माते यांना धमक्या येत आहेत. खंडण्यांसाठी या धमक्या दिल्या जात आहेत. याचा अर्थ देशात आज कोणालाही सुरक्षित वाटत नाही, पण लोकशाहीच्या संरक्षणासाठी फडणवीस, अमित शहा वगैरे लोक पोलीस बंदोबस्तात ‘रॅली’ काढत आहेत. जेथे तुमच्या राज्यात लोकच सुरक्षित नाहीत तेथे लोकशाही रक्षणासाठी सरकारी रॅल्या काढून काय साध्य करीत आहात? बच्चन हे ‘जलसा’ बंगल्याबाहेर बुलेटप्रूफ काचेच्या पिंजऱ्यातून आले. कारण काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफच्या गाडीवर बिष्णोई गँगच्या शूटर्सकडून गोळीबार झाला. याच बिष्णोई गँगपासून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान वगैरेंना धोका असल्याचे उघड झाले. बच्चन यांचे तर कुणाशीच वैर नाही. ते सर्व पक्ष व येईल त्या सरकारांना धरून असतात. मग बच्चन यांच्यामागे या गुन्हेगारी टोळय़ा का लागल्या आहेत? याचा खुलासा मुंबई पोलिसांनी करायला हवा," अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. 

हिंमत का दाखवत नाही?

"भारतातील सर्वात मोठा व लोकप्रिय सिने अभिनेता बुलेटप्रूफ काचेच्या पिंजऱ्यातून चालत असल्याचे चित्र पाहून गृहमंत्री शहांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामाच दिला पाहिजे. सरदार पटेलांच्या खुर्चीवर ते बसले आहेत व स्वतःच्या खुर्चीमागे त्यांनी सरदार पटेलांचे भव्य चित्र लावले आहे. सरदार पटेल यांनी सशस्त्र सैन्य बाळगणाऱ्या हैदराबादच्या निजामाचा बीमोड केला होता व या अमित शहांना एका गुन्हेगारी गँगचा बंदोबस्त करता येत नाही. जे शहा नक्षलवादाचा बीमोड केला, कश्मीरात हिमतीने 370 कलम काढले वगैरे सांगतात, विरोधी पक्ष फोडतात, आमदार-खासदार विकत घेऊन हवा तो खेळ करतात, त्या शहांना बिष्णोई गँग खतम करता येत नाही याचे आश्चर्य वाटते. हा मजकूर लिहीत असताना नागपूर येथील दहा प्रमुख सराफांना बिष्णोई गँगकडून मोठ्या खंडणीसाठी धमक्या आल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर लगेच ‘चिंता करू नका. सराफांना पूर्ण सुरक्षा देऊ,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. प्रश्न इतकाच आहे की, अशा प्रकारे तुम्ही किती जणांना विशेष सुरक्षा कवच पुरवणार आहात? त्यापेक्षा त्या गँगचेच मुळापासून उच्चाटन करण्याची हिंमत का दाखवत नाही?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

...तोपर्यंत कुणालाच सुखाने व सुरक्षित जगता येणार नाही

"हा जो कोणी लॉरेन्स बिष्णोई आहे तो गुजरातच्या साबरमती जेलमध्ये गृहमंत्री अमित शहांचा पाहुणा म्हणून नांदत आहे. या बिष्णोईचे साधे नखसुद्धा कोणी पाहिलेले नाही. तो जणू एक अदृश्य शक्ती म्हणून वावरत आहे व त्या अदृश्य शक्तीभोवती शहा यांनी खास सुरक्षेचे कवच उभे केले आहे. बिष्णोईला साबरमती जेलच्या बाहेर नेता येणार नाही असा आदेश गृहखात्याने काढला आहे. त्यामुळे त्याच्या नावाने एखाद्या राज्यात कितीही अपराध घडले तरी त्या राज्याचे पोलीस या लॉरेन्सला चौकशीसाठी आपल्या राज्यात घेऊन जाऊ शकत नाहीत. हे एक चमत्कारिक प्रकरण आहे. शहा यांनी जणू आपल्या स्वार्थासाठी एक अदृश्य शक्ती निर्माण केली आहे व त्या अदृश्य शक्तीकडून देशात कुणालाही धमक्या दिल्या जातात, कुणाकडूनही वसुली केली जाते किंवा गोळीबार करून मुडदे पाडले जातात. अमिताभ बच्चन (वय 84) यांच्यासारख्या महानायकास बुलेटप्रूफ काचेचा पिंजरा घेऊन वावरावे लागते ते त्यासाठीच. आपल्या देशात लोकशाही धोक्यात आहे तसे देशातील लोकही धोक्यात आहेत. फक्त शहा व त्यांची ‘शाही’ तेवढी मजेत आहे. भारतात अदानी यांनी बरेच उद्योग निर्माण केले. संरक्षण खात्यातही ते शिरले. आता त्यांना एक नवा उद्योग सुरू करावा लागेल तो म्हणजे काचेचे बुलेटप्रूफ पिंजरे बनवण्याचा. जोपर्यंत मोदी-शहांची राजवट आहे तोपर्यंत कुणालाच सुखाने व सुरक्षित जगता येणार नाही," असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. 

काहीतरी वेगळे सूत्र नक्कीच आहे

"शहा यांना गृहमंत्री म्हणून याचे वैषम्य वाटले पाहिजे. लोकांना दुर्बल, भयभीत करून आपले आश्रित करावे ही त्यांची मानसिकता आहे व त्या कामी त्यांनी लॉरेन्स बिष्णोईचे अदृश्य भूत उभे केले आहे. खरे तर या भुताचे नाव ‘लॉरेन्स शहा’ किंवा ‘लॉरेन्स मोदी’ असायला हवे होते. सलमान खानने काळवीट मारले म्हणून एखाद्याचा राग असू शकतो, पण ज्यांना धमक्या आल्या व ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांनी कोणतीच शिकार केली नव्हती. सलमान तर मोदींच्या राज्यात पतंग उडवायला गेला होता व बच्चन हे गुजरातच्या पर्यटनाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. मोदींच्या जवळच्या लोकांवर ही अदृश्य शक्ती हल्ले करीत आहे यात काहीतरी वेगळे सूत्र नक्कीच आहे. बच्चन यांच्या भोवतीचा बुलेटप्रूफ पिंजरा तेच सांगत आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Amit Shah
Uddhav Thackeray
Shiv Sena UBT
Amitabh Bachchan