)
KASARA-ASANGAON MEGABLOCK : आसनगाव- कसारा तिसऱ्या मार्गिकेवर ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीसाठी विशेष ब्लॉक घेतला जणार आहे... रेल्वेकडून ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते पहाटे ५.३० या वेळेत विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे... त्यामुळे कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल पहाटे उंबरमाळी आणि खर्डी स्थानकावर थांबणार नाहीत...
FDA RAID : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांना चाप लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात धडक तपासणी मोहीम राबवली आहे. यानुसार २३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ४७२ तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ७२ परवाने निलंबित करण्यात आले. २४९ सुधारणा नोटीस देण्यात आल्या. तर १३.६ कोटी रुपये किंमतीचा ९ हजार ६१० क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक ६ कोटी ४३ लाख, पुणे विभागात ३ कोटी ९९ लाख व कोकण विभागातील ३ कोटी ९९ लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
MUMBAI : मुंबईत रस्त्यावर कचरा टाकणा-यांनो सावधान.... कचरा टाकून हळूच पळून जाणाऱ्यांना यापुढे 'एआय' आधारित कॅमेऱ्याने हेरले जाणार आहे. हा कॅमेरा कचरा टाकणाऱ्यांना स्वच्छतेचा संदेशही देणार आहे. मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईत कचरा टाकण्याच्या ठिकाणी असे कॅमेरे बसविण्याचे ठरवले असून त्यापैकी पहिला कॅमेरा माहीम येथील गजानन वाटिका परिसरात लावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबईत दृश्यमान स्वच्छतेसाठी आणि वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांच्या निर्मूलनासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' प्रशासकीय विभागाकडून माहीम येथील गजानन वाटिका परिसरात एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याद्वारे कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल टिपून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 30 OCTOBER महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.