• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /...तातडीने हस्तक्षेप करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, 'माझा स्पष्ट विरोध...भ्रष्टाचाराचा संशय '

...तातडीने हस्तक्षेप करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, 'माझा स्पष्ट विरोध...भ्रष्टाचाराचा संशय '

समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावण्याला आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 30, 2026, 08:04 AM IST|Updated: Oct 30, 2026, 08:08 AM IST
joinshare
...तातडीने हस्तक्षेप करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, 'माझा स्पष्ट विरोध...भ्रष्टाचाराचा संशय '
Image Credit: समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावण्याला आदित्य ठाकरेंचा विरोध

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

2

'असा अपमान केला तर...,' आमने-सामने वादावर वंदना गुप्तेंनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या.. 'लीना-मंगेश तुम्ही अचानक...'

3

सारा अली खानच्या 'शिवभक्ती'वर फतवा, मौलानांचा आक्षेपावर नितेश राणे म्हणतात, 'हिंदू मंदिरांना भेट देणाऱ्या प्रत्येकाचे...'

4

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6....; फलंदाजांचा कहर! ठोकले तब्बल 27 षटकार आणि 14 चौकार, 36 चेंडूत कुटल्या 135 धावा, ऑस्ट्रेलियाचा धुमाकूळ

5

रोहित शर्माला पुन्हा धक्का? कर्णधारपदाची पुन्हा हुलकावणी? IPL 2027 मध्ये 'या' तरुणाकडे 'मुंबई इंडियन्स'चं नेतृत्व?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावण्याला आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मुंबईचं नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करणाऱ्या ‘तरंगते होर्डिंग्ज’च्या निर्णयाला आपला तीव्र विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या निर्णयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे.

पत्रात काय लिहिलं आहे?

समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोधाबाबत आणि तातडीने हस्तक्षेप करण्याबाबत हे पत्र असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावून शहराचे सौंदर्य विद्रूप करण्याच्या निर्णयाला माझा स्पष्ट विरोध दर्शवण्यासाठी मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे असं ते पुढे म्हणाले आहेत.

"पहिली गोष्ट म्हणजे, सतत वाढणारे प्रदूषण आणि त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे, किनारपट्टीपासून थोड्या अंतरावरूनही आता शहरातील बहुतांश भागातून समुद्र व्यवस्थित दिसत नाही. अत्यंत दुर्दैवाने, होर्डिंग कंत्राटदारांच्या टोळीला पाठिंबा देण्याच्या ह्या अवाजवी आणि 'व्यावसायिक हित' जपणाऱ्या निर्णयामुळे, जे काही थोडेफार चित्तवेधक दृश्य उरले आहे, तिथेही नागरिकांच्या डोळ्यांसमोर फक्त जाहिरातीच दिसतील. जमिनीवरील बेसुमार प्रदूषण आधीच सहन करणाऱ्या मुंबईकरांवर हा आणखी एक अन्याय आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

मुंबईचं नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करणाऱ्या ‘तरंगते होर्डिंग्ज’च्या निर्णयाला मी तीव्र विरोध दर्शवला असून, ह्या निर्णयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ————— My letter to Chief Minister of Maharashtra, voicing my strong objection to the floating hoardings and asking him to intervene in this extremely ridiculous and possibly corrupt idea of his regime to support the contractor cartel.

— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 29, 2026

 

"वास्तविक पाहता, शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या एलईडी होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवणारे आणि संपूर्ण मुंबईत होर्डिंग्जच्या संख्येवर मर्यादा घालणारे एक निश्चित धोरण असायला हवे. कंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचे सौंदर्य आणि नैसर्गिकता जपण्याला प्राधान्य देणे हाच नियम असायला हवा, परंतु दुर्दैवाने हा नियम सौंदर्याऐवजी कंत्राटदारांची निवड करतो," असा आरोप त्यांनी केला आहे.

माझी आपल्याला विनंती आहे की आपण यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि अत्यंत बेजबाबदार, संभाव्य भ्रष्टाचाराचा संशय असलेला आणि मुंबईचे सौंदर्य नष्ट करणारा हा निर्णय थांबवावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Aaditya Thackeray
Devendra Fadnavis