Live Updates : टिपू सुलतानचे विचार रुजवण्यासाठी मदत करणार, आमदार अमित देशमुखांच्या विधानाने नवा वाद
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
19 Nov 2026 17:59 IST
शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी मागितली माफी
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्यामुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायन एनसी यांनी अखेर माफी मागितली आहे. शायना एनसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली आहे. सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांवरचे आपले प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
19 Nov 2026 17:58 IST
आमदार अमित देशमुखांच्या विधानाने वाद
राज्याच्या राजकारणात इतिहासाची पानं पुन्हा एकदा उलटली जातायत आणि त्यातून नव्या वादाची ठिणगी पडलीय. लातूरमधील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान यांचं कार्य आणि त्यांनी दाखवलेला मार्ग येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कव्वाली कार्यक्रमात देशमुख यांनी हे विधान केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याने भाजपमध्ये संतापाची लाट उसळलीय. भाजप नेत्यांनी देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. त्यामुळे टिपू सुलतान यांच्या इतिहासावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं रण पेटलंय. नेमकं काय म्हणाले अमित देशमुख आणि भाजपचा आक्षेप काय?
19 Nov 2026 16:31 IST
SC Hearing Shivsena Live : २१ जून रोजी बैठकीवर आक्षेप कपिल सिब्बल यांनी घेतला - राहुल शेवाळे
राहुल शेवाळे - २१ जून रोजी बैठकीवर आक्षेप कपिल सिब्बल यांनी घेतला.
२१ जून रोजी एकनाथ शिंदे यांना गटनेते निवड केले होती आणि चीफ व्हीप म्हणून गोगावले यांची निवड केली होती. यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला.
विधानसभा अध्यक्षांनी आणि राज्यपालांनी विधीमंडळ पक्षाला नियमानुसार मान्यता दिली आहे.
पक्ष बदल केला नव्हता फक्त पक्षाचा गटनेता आणि व्हीप बदलला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे बुधवारी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपेल
19 Nov 2026 16:28 IST
SC Hearing Shivsena Live : राजकीय पक्षाला उद्धवस्त करण्याचे काम - ॲड. असीम सरोदे
ॲड. असीम सरोदे - व्हीपनुसार भरत गोगावले यांची निवड योग्य आहे का? हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला
२० जून २०२२ रोजी क्रॅास वोटींग झाले. त्यावरही युक्तीवाद झाला. भाजप उमेदवाराला मतदान करणे हे योग्य आहे. कारण हे कृत्य बेकायदा आहे.
पक्षांतर्गत वाद होता तर राज्यपालांकडे पत्र का पाठवले. कारण पक्षाचा मुद्ता होता तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवायला पाहीजे होते.
गुवाहाटी मधून २३ जून रोजी शिंदे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून आम्हीच पार्टी असल्याचे सांगितले जाऊ शकते का ?
सभागृहात राहून कार्यवाही करणे गरजेचं असतं.
राजकीय पक्षाला उद्धवस्त करण्याचे काम केले.
पुढील युक्तीवाद बुधवारी आणि गुरुवारी होईल.
19 Nov 2026 16:09 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
- पक्षांतर्गत वादात राज्यपालांचा हस्तक्षेप का? राज्यपाल या वादाचा भाग कसे होऊ शकतात, असा सवाल
- पक्षांतर्गत वाद आणि राज्यपालांची भूमिका यांचा परस्पर संबंध काय?
19 Nov 2026 16:08 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
आजची सुनावणी संपली
पुढील सुनावणी बुधवारी २५ नोव्हेंबरला होणार
कपिल सिब्बल युक्तिवाद सुरू ठेवणार
19 Nov 2026 16:06 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - 21 जून रोजी एकनाथ शिंदे म्हणजे राजकीय पक्ष नव्हे तर विधिमंडळ पक्ष होते
19 Nov 2026 16:05 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही
19 Nov 2026 16:05 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - ठाकरे गट पक्ष नाही, तर शिंदे गट पक्ष आहेत असं समजूया ....मग ठाकरे गट काय आहे
19 Nov 2026 16:04 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
ज्येष्ठ वकील कपिल सिबल: प्रतिवादातील काही युक्तिवादांकडे मी माननीय न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यापूर्वी, ढोबळमानाने, मूलभूत तत्त्वांनुसार, अध्यक्षांचे अधिकारक्षेत्र काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे, अध्यक्षांचा राजकीय पक्षाच्या घटनेशी संबंध नसतो. त्यात त्यांची कोणतीही भूमिका नसते.
19 Nov 2026 16:04 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
शिवसेनेच्या अपात्रता वादात ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी दाखल केलेल्या प्रत्युत्तरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सिबल यांचा युक्तिवाद आहे की, सभापती विधिमंडळातील पक्षाला राजकीय पक्षाशी एकरूप मानू शकत नाहीत. “जर याला परवानगी दिली गेली, तर कोणतेही निवडून आलेले सरकार टिकू शकणार नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या मान्यतेला आव्हान दिले आहे.
19 Nov 2026 16:02 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - अजित पवार देखील आघाडीत होते
19 Nov 2026 16:01 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - शिवसेना शिंदे गटाने 22 जून रोजी एक ठराव पारित केला
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतच्या आघाडीतून बाहेर पडायचे आहे
19 Nov 2026 15:56 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे हे कायदेशीर रित्या चुकीचे होते
त्यांनी ठाकरेंच्या आमदारांना नोटीस पाठवणे देखील बेकायदेशीर होते
19 Nov 2026 15:55 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - ठाकरे यांच्या वतीने 21 जून रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आले आणि एकनाथ शिंदे हे नेते नसल्याचं कळवण्यात आलं
19 Nov 2026 15:54 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती घटनात्मक तरतुदींनुसार चुकीची असल्यास ती रद्द केली जाऊ शकते
- विधानसभा अध्यक्षांची निवड हा राजकीय पक्षाचा निर्णय नसून पक्षांतर्गत वाद असल्याचा युक्तिवाद
- २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जूनला आमदारांनी महाराष्ट्रातून सुरत आणि सुरतहून गुवाहाटीला प्रवास केला
- आमदारांचे बंड पूर्वनियोजित होते
- आमदारांचा भाजपसोबत संगनमत असल्याचा केला आरोप
- सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून आमदारांनी हे पाऊल उचलल्याचा ठाकरेंच्या वकिलांचा दावा
- पक्षांतर्गत वादात राज्यपालांचा हस्तक्षेप का? राज्यपाल या वादाचा भाग कसे होऊ शकतात, असा न्यायालयात सवाल
- पक्षांतर्गत वाद आणि राज्यपालांची भूमिका यांचा परस्पर संबंध काय, असा महत्त्वाचा मुद्दा न्यायालयात केला उपस्थित
19 Nov 2026 15:52 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
भरत गोगावले यांची नियुक्ती ही चुकीची होती कारण राजकीय पक्षाचा याला पाठिंबा नव्हता - सिब्बल
19 Nov 2026 15:49 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - शिवसेनेच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या ठरावाचा केला उल्लेख - दस्तऐवजावर २२ जूनचा शिक्का, मात्र त्यावर २१ जूनची तारीख असल्याचे न्यायालयात निदर्शनास आणून दिले
- शिवसेनेच्या आमदारांनी लिहिलेल्या पत्रात पक्षाच्या विचारधारेपासून दूर जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त.
- पक्षाच्या मूलभूत विचारधारेकडे पुन्हा परतण्याची पत्रातून मागणी.
- पत्रातील भावनिक भाषा बाजूला ठेवून त्यातील मूळ आशय तपासण्याचा न्यायालयात युक्तिवाद.
- संबंधित ठराव एकमताने मंजूर झाल्याचा युक्तिवाद. हा मुद्दा प्रतिस्पर्धी पक्षाच्या वकिलांनी वाचला नसल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.
19 Nov 2026 15:47 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
सिब्बल - २३ जूननंतर घडलेल्या घटनांचा पुरावा म्हणून विचार करता येणार नाही, असा न्यायालयात युक्तिवाद
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एकूण तीन याचिका दाखल झाल्याचा युक्तिवादात उल्लेख
२३ जूनला 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी याचिका दाखल
२७ जूनला आणखी २२ आमदारांच्या अपात्रतेची मागणी.
- जुलै महिन्यातही उर्वरित आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केल्याचा उल्लेख
- पक्षाचा व्हिप, पक्षनेता निवड, राज्यपालांकडे जाणे आणि विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती या मुद्द्यांवर न्यायालयात युक्तिवाद
- सरकार स्थापन करणे आणि मुख्यमंत्री होणे हे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा युक्तिवाद
19 Nov 2026 15:39 IST
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
SC Hearing Shivsena Live : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केला
आमदार अपात्रता प्रकरणी बोलणार असल्याचे सुरुवातीला त्यांनी सांगितले
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.