भारत देश हा सर्वधर्म सहिष्णूता मानणारा म्हणून जगात ओळखला जातो. मुंबईदेखील या सर्वधर्म एकोप्याचे उत्तम उदाहरण आहे. जिथे सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात. दरम्यान मुंबईतील हिंदू-मुस्लिम जन्मदराची आकडेवारी समोर आलीय. यावर भाजप नेत्याने प्रश्न उपस्थित केलेयत. ज्यावरुन मुंबईतलं राजकारण पेटताना दिसतंय.काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाचा मुद्दा उपस्थित केलाय. मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम समुदायांमधील जन्मसंख्येचे आकडे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील लोकसंख्येच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे मुंबईतील लोकसंख्याशास्त्र आणि धर्मनिहाय आकडेवारीचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेत आला आहे.
Muslim Mumbai Muslim Mumbai Muslim Mumbai https://t.co/u0GxTJERw1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 6, 2026
सोमय्या यांनी एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये 2025 मधील मुंबईतील जन्मसंख्येचे आकडे मांडले. 2025 या वर्षात हिंदू कुटुंबांमध्ये 70 हजार 380 बालकांचा, तर मुस्लिम कुटुंबांमध्ये 48 हजार 554 बालकांचा जन्म झाला. या आकड्यांच्या आधारे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम बालकांच्या जन्माचे प्रमाण 3:2 आहे. गेल्या पाच वर्षांत हिंदू कुटुंबांमध्ये 3 लाख 36 हजार 625, तर मुस्लिम कुटुंबांमध्ये 2 लाख 20 हजार 754 बालकांचा जन्म झाल्याचाही त्यांचा दावा किरीट सोमय्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
मुंबईतील लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र ‘डेमोग्राफिक कमिटी’ स्थापन करावी, अशी मागणी सोमय्यांनी केलीय. या समितीने शहरातील जन्मदर, स्थलांतर आणि लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास करून सरकारला अहवाल द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी टॅग केले आहे.
MUSLIM Mumbai In 2011 Census Mumbai Population 76% #Hindus ( & Sikh, Jain... Others) 4% #Christian 20% #Muslim Tata Institute Social Science Report in 2051 Mumbai Population will be 64% Hindus ( & Sikh, Jain... Others) 5% Christian 31% Muslim #Demography @BJP4India @AmitShah @Dev_Fadnavis @RSSorg
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 7, 2026
सोमय्या यांनी मांडलेल्या आकडेवारीला अद्याप स्वतंत्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या 2026 च्या अधिकृत सिव्हिक डायरीनुसार 2025 मध्ये संपूर्ण मुंबईत 1 लाख 17 हजार 606 जन्मांची नोंद झाली. असे असताना सोमय्या यांनी दिलेल्या हिंदू आणि मुस्लिम जन्मसंख्येची बेरीज 1 लाख 18 हजार 934 होते. म्हणजेच महापालिकेच्या एकूण आकड्यापेक्षा ही बेरीज 1 हजार 328 ने जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे जन्मसंख्येवरून लोकसंख्येचा निष्कर्ष निघतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. एखाद्या शहरातील लोकसंख्येतील बदल समजून घेताना स्थलांतर, मृत्यूदर, वयोगटानुसार लोकसंख्या आणि इतर सामाजिक-आर्थिक घटकांचाही अभ्यास करावा लागतो, असे तज्ज्ञ सांगतात.