एका लग्नसोहळ्यात आनंदाचे वातावरण क्षणात चिंतेत बदलले. मुंबईतील भांडुप परिसरातील एका लग्न समारंभात नवरा -नवरीसह जवळ 27 पाहुण्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. लग्न सोहळ्यातील जेवण्यानंतर सर्वांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. धक्कादायक या पाहुण्यांमध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे.
मुलुंडमधील अग्रवाल महापालिका रुग्णालयात या सगळ्यांवर उपचार सुरु आहे. रात्री सुमारे 11.40न नंतर एकापाठोपाठ एक रुग्ण येत होते, त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, रुग्णालयात सध्याच्या स्थितीत 27 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 11 महिला, 9 पुरुष आणि 7 लहान मुलांवर उपचार सुरू आहे.
डॉ. मारस्कोले सांगितलं की, "सर्व रुग्णांना जेवणानंतर उलट्या, जुलाब आणि अपचनाचा त्रास सुरु झाला होता. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना लग्नातील जेवण्यातून विषबाधा झाली. महाबोधी रत्नविहार हॉलमधील लग्नात दुधापासून बनवलेली मिठाई 'खरवास' खाल्ल्यानंतर सर्वांना विषबाधा झाली.
#WATCH | मुंबई, महाराष्ट्र: मुंबई के भांडुप इलाके में एक शादी समारोह में खाना खाने के बाद, एक नवविवाहित जोड़े सहित लगभग 27 लोग बीमार पड़ गए। एमटी अग्रवाल म्युनिसिपल जनरल अस्पताल के मेडिकल ऑफिसर, डॉ. कैलाश मारस्कोले ने बताया, "27 मरीजों को भर्ती किया गया है। इनमें 2 बच्चे, 11 महिलाएं और 9 पुरुष शामिल हैं। उन्हें उल्टी और दस्त की शिकायत होने लगी। एक कार्यक्रम में खाना खाने के बाद उन्हें अपच (इनडाइजेशन) की समस्या हुई। वे रात 11:40 बजे यहां पहुंचे। फिलहाल सभी 27 मरीजों की हालत स्थिर है।"
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2026
तर वराच्या नातेवाईकांने सांगितलं की, माझ्या मेहुण्याचे लग्न होतं. लग्नाचे सगळे विधी झाल्यानंतर घरी गेल्यावर अचानक महिलांची प्रकृती बिघडली. हा आकडा 30 ते 40 लोकांना एकच त्रास व्हायला लागला. कॅटरिंगच्या कर्मचाऱ्यांनी अन्नात काहीतरी खराब पदार्थ वापरले किंवा ते वाढले, त्यामुळे ही धक्कादायक घटना घडली.
Nahur, Maharashtra: Around 70–100 people are suspected to have suffered food poisoning after consuming food at a wedding ceremony held at Nalanda Buddha Vihar Hall in Nahur West on November 1. All patients are reported to be stable. Family members have alleged negligence by the caterers and demanded strict action Mother of groom says, "At Nalanda Buddha Vihar, towards the end during the meal, when all of us, including the groom and bride, sat down to eat, everyone became ill. After that, everyone was admitted to the hospital. Around 30 to 40 people from our neighboring households fell sick. Strict action should be taken against those responsible..."
— IANS (@ians_india) November 1, 2026
दरम्यान पीडित कुटुंबाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच मुंबई पोलिसांकडे या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच दोषीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.