• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशी तिथी 6 नोव्हेंबर ला सकाळी 10.30 सुरु होणार आहे तर 7 नोव्हेंबरला सकाळी 10.47 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी नेमकी कधी याबद्दल संभ्रम आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 02:04 PM IST|Updated: Nov 02, 2026, 02:10 PM IST
joinshare
धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त
Image Credit: Dhanteras

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
तुम्ही दिवाळीच्या होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली? घरातून 12 लाखांचे दागिने लंपास, पोलिसही चक्रावले!

तुम्ही दिवाळीच्या होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली? घरातून 12 लाखांचे दागिने लंपास, पोलिसही चक्रावले!

2

‘दिया मिर्झा 100 टक्के ब्लॅकलिस्ट’; महापौर रितू तावडे संतापल्या; 'देशविरोधी, हिंदू विरोधी बोलणाऱ्यांना यापुढे...'

3

गाव विक्रीला काढणाऱ्या तुळशी गावाचा भन्नाट उपक्रम, आता पाणी स्वयंपूर्णतेचा ‘तुळशी पॅटर्न’

4

CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू

5

धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. दिवाळीतील हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. यादिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेरांची विशेष पूजा केली जाते. यादिवशी धन्वंतरी जयंतीदेखील असते, जी वैद्यकिय क्षेत्रातील मंडळी साजरे करतात. वैद्यकिय क्षेत्रात भगवान धन्वंतरीची पूजा करण्यात येते. तसंच यादिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोनं, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी तिथीबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे धनत्रयोदशीची योग्य तिथी, पूजेपासून खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.

धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी?

'द्रिक पंचांग' नुसार धनत्रयोदशी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी तिथी 6 नोव्हेंबर ला सकाळी 10.30 सुरु होणार आहे तर 7 नोव्हेंबरला सकाळी 10.47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार हिंदू धर्मात सण साजरे करण्यात येतात. पण दिवाळीतील सणांची पूजा ही प्रदोष काळात करतात. त्यामुळे  6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे.

हेसुद्धा वाचा  -  दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

धनत्रयोदशी पूजा मुहूर्त    - संध्याकाळी 6:02 ते 07:57
प्रदोष कालावधी - संध्याकाळी 05:33 ते रात्री 08:09

सोनं - चांदीसह खरेदीसाठी शुभ मुहूर्त काय?


धनत्रयोदशी 6 नोव्हेंबरला सकाळी 10.30 सुरु होतेय, त्यामुळे त्यानंतर तुम्ही खरेदी करु शकता.

शुभ मुहूर्त
दुपारी - 12:02 ते 1.24 वाजेपर्यंत
दुपारी -  4.07 ते संध्याकाळी 5.29 वाजेपर्यंत 
रात्री - 8.46 ते 10.24 वाजेपर्यंत

हेसुद्धा वाचा - दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

धनत्रयोदशीला अशी करा पूजा!

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जिथे पूजा मांडायची आहे, तिथे पाट मांडा आणि रांगोळी काढा. देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी मूर्ती किंवा फोटो ठेवा. आता त्यांची विधीवत पूजा करा. देवासमोर एखाद्या वाटीत पाच कडधान्य ठेवा. दिवे, फुले, धूप, फळे आणि मिठाई अर्पण करा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals