पळस्पेची वाहतुक कोंडी फुटणार, मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग, नवी मुंबईत 20 मिनिटांत पोहोचणार
अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या नवी मुंबईतील 7.35 किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई-पुणे या दोन महानगरातील अंतर आता आणखी कमी होणार आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या नवी मुंबईतील 7.35 किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या नवीन प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक वेगवान होणार असून मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या दीड तासात पार करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2027पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सध्याची प्रगती पाहता निर्धारित मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.
अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडणारा 9.35 किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग तयार करण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अटल सेतू जोडमार्गाचे काम सुरू. या प्रकल्पासाठी 1,420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
नवीन जोडमार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूककोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार. दक्षिण मुंबईहून निघालेली वाहने विनासिग्नल पुण्याच्या दिशेने प्रवास करू शकणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर आणि पुणे-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही फायदा होणार.
नवीन मुंबई-पुणे महामार्गामुळं नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवासही लवकरच जलद होणार आहे. शिवडीपासून सुरू झालेला अटल सेतू नवी मुंबईत उतरतो. शिवाजीनगर इंटरचेंजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र कोस्टल रोड उभारण्यात येणार.
6.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून या मार्गावर 808 मीटर लांबीचा डिस्ट्रिक्ट उन्नत मार्ग उभारण्यात येणार. दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 ते 25 मिनिटांत होण्याची शक्यता आहे. अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांना पळस्पे येथे मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. नवीन जोडमार्गामुळे पनवेल मुख्य जंक्शन टाळून थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करता येणार. त्यामुळे पळस्पे येथील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार.