बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत फसवणूक! एक नाही दोन नाही तब्बल 6 वेळा घडली घटना, नेमकं काय घडलं?
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्या ठाकरेची एक नाही दोन नाही तब्बल 6 वेळा सायबर फसवणूक झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात.
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्या ठाकरेची तब्बल 6 वेळा सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्य ठाकरेच्या बँक खात्यातून सहा वेळा व्यवहार झाला आहे. त्याच्या खात्यातून एकूण 19015 रुपये काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना 30 ऑक्टोबरच्या रात्री घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सहा व्यवहार भारतातून नाही तर परदेशातून झाल्याचे तपासात समोर आले आहेत. ऐश्वर्याने ओशिवरा पोलिसांकडे या घटनेबद्दल तक्रार नोंदवली आहे. आता ऐश्वर्या ठाकरेच्या बँक अकाऊंटचा संबंधित गैरवापर कशा प्रकारे झाला आणि त्याची फसवणूक कशी झाली याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
ऐश्वर्य ठाकरे हा स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरेंचा मुलगा आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. अनुराग कश्यप यांच्या निशांची या चित्रपटातून त्यांनी फिल्म जगतात एण्ट्री मारली आहे. आता ऐश्वर्य ठाकरेसोबत झालेल्या सायबर फसवणुकीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुलुंडमध्ये खासगी कंपनीत 10 लाखांचा गंडा!
मुलुंडमधील एका खासगी कंपनीला 10 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. कंपनीच्या लेखापालाला मालकाचा डीपी वापरून हा गंडा घालण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांतून सहा आरोपींना गजाआड केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, हे आरोपी सराईत सायबर गुन्हेगार आहे. तर या टोळीने 1200 बँक अकाऊंटमधून 72 कोटींची फसवणूक झाल्याचा संशय आहे.
पोलिसांनी सांगितलं की, 30 जुलै 2026 रोजी मुलुंड इथल्या एका खासगी कंपनीतील लेखापालाला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. आरोपीने कंपनीच्या मालकाचा फोटो डीपी ठेवला होता. आपणच मालक असल्याचे भासवत त्याने कंपनीच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये हस्तांतरित केले. लेखापालाने तो मालक आहे हे समजून त्याला पैसे पाठवले. त्यानंतर ही फसवणूक झाल्याचे उघड झालं.
याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून बँक व्यवहार आणि मोबाइल क्रमांकांच्या आधारे तपास करून या सहा जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान मेरठमधील एका बँक अकाऊंटमधून 5.50 लाख चेकद्वारे काढल्यामुळे पोलिसांना कळलं. त्यानंतर मेरठमधून तिघांना आणि गाझियाबाद, बडोदा, कांदिवली येथून आणखी तीन आरोपींना अटक केली.