SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं? संजय राऊत यांचा सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना सवाल, शेअर केला खळबळजनक व्हिडिओ

या माणसाला समर्थन देत आहात? त्या पेक्षा राजकारण सोडलेलं बरं... संजय राऊत यांनी एक व्हिडिओ सेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 28, 2026, 23:32 IST | Updated: Nov 28, 2026, 23:38 IST
Join

संजय राऊत : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन  विधेयकाला पाठिंबा दिल्यांनतर राजकारण पेटले आहे. काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसनेचे नेते देखील आक्रमक झाले आहे. आम्हाला धोका दिला अशी टीका ठाकरेंचे नेते करत आहेत. अशातच आता संजय राऊत यांनी खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. या माणसाला समर्थन देत आहात? त्या पेक्षा राजकारण सोडलेलं बरं असं म्हणत संजय राऊत यांनी  सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना सवाल केला आहे. 

डिलिमिटेशन विधेयक पाठिंबा देणारे 21व्या शतकातील मोठे गद्दार असं म्हणत संजय राऊत यांनी आधीच टीकेची झोड उडवली आहे. आता  अमित शाह यांचा शरद पवारांवर टीका करणारा व्हिडिओ  संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांकडून सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना टॅग करत एक सवाल केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकावर सोमवारी संसदेत भूमिका स्पष्ट केली जाईल असं म्हटलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांचा एक व्हिडिओ पोस्ट करुन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना एक प्रश्न विचारला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कशा प्रकारे देतात ते पाहावं लागेल. संजय राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांना टॅग करुन एक प्रश्न विचारला आहे.

संजय राऊत यांच्याकडून अमित शाह यांचा व्हिडिओ पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. अमित शाह शरद पवारांवर भ्रष्टाचाराला संस्तात्मक रुप दिल्याचा आरोप त्या व्हिडिओत केला आहे. या व्हिडिओसह संजय राऊत यांनी एक कॅप्शन लिहिलं आहे. त्या ते म्हणतात, "या माणसाला समर्थन देत आहात? त्या पेक्षा राजकारण सोडलेलं बरं"

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES