• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मध्यरात्री विशेष ब्लॉक अन् रविवारीही तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

मध्यरात्री विशेष ब्लॉक अन् रविवारीही तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारीदेखील तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 21, 2026, 23:04 IST|Updated: Nov 21, 2026, 23:08 IST
joinshare
मध्यरात्री विशेष ब्लॉक अन् रविवारीही तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा
Image Credit: Mumbai local train mega block

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा यार्डमधील विस्तारीकरणाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 11.10 ते मध्यरात्री 1.40 या वेळेत खर्डी ते कसारा दरम्यान अप मुख्य मार्गिका आणि तिसऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएमएमटी येथून सकाळी 9.34 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गांवर वळण्यात येणार आहेत. तर या गाड्या पुढे ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. परंतु या गाड्यांना रेल्वे स्थानकांवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे उशिरा लागण्याची शक्यता आहे. कल्याणमधून सकाळी 10.28 ते दुपारी 2.58 या वेळेत सुटणाऱ्या अप फास्ट/ सेमी फास्ट उपनगरीय रेल्वे या कल्याण आणि ठाणे स्टेशनदरम्यान अप धीम्या मार्गावर वळण्यात येणार आहेत. तर या गाड्या नियोजित रेल्वे स्टेशनवर थांबतील. पुढे मुलुंड रेल्वे स्टेशनवर या गाड्या पुन्हा अप फास्ट मार्गावर वळण्यात येतील.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान डाऊन हार्बर मार्गावर 10.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटीदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर सीएसएमटीमधून सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी 10.06 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर  पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.12 ते दुपारी 3.20 या वेळेत सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत.  तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 9.13 ते सायंकाळी 5.13 या वेळेत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.  ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ठाणे – वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. पोर्ट लाईन (उरण लाईन) सेवा नेरुळ/बेलापूर – उरण – नेरुळ/बेलापूर स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय. या मेगाब्लॉकसाठी ब्लॉक अप आणि डाऊन धीम्या (स्लो) मार्गांवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत असणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील लोकल गाड्या फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय रेल्वे सेवा रद्द राहणार आहेत. तसेच, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या वांद्रे किंवा दादर स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai Local