दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह 'झी २४ तास'ची दिवाळी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'उत्सव बांधिकली'चा या उपक्रमाचे कौतुक
'झी २४ तास'ने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विशेष उपक्रमाचे कौतुक केले आहे.
CM Devendra Fadnavis : यंदा महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. बळीराजा दुष्काळात होरपळत आहे. देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आहे. 'झी २४ तास'ने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. उत्सव बांधिकलीचा.. 'झी २४ तास'ची दिवाळी,
बळीराजाच्या दारी. हा विशेष उपक्रम 'झी २४ तास'नं राबवला. 'झी २४ तास'च्या उत्सव बांधिलकीचा या विशेष उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'झी २४ तास'चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यासह 'झी २४ तास'च्या टीमने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.
'झी २४ तास'च्या या उपक्रमात प्रवीण तरडे, अलका कुबल, मानसी नाईक अशा प्रसिद्ध कलाकरांनीही सहभाग घेतला. 'झी २४ तास'च्या या उपक्रमाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'झी २४ तास'चं कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने सर्व समान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या 'झी २४ तास' उत्सव बांधिकलीचा हा कौतुकास्पद उपक्रम रावबला आहे. दिवाळी हा आनंद, आशा, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. दुष्काळाच्या संकटाची झुंजणाऱ्या शेथकरी बांधवाच्या कुंटुबासाठी या सणाचा आनंद आर्थिक अडचणीच्या सावटाखाली हरवून जातो. अशा कठिण प्रसंगी शेतकऱ्यांचया सुख दुखा:त सहभागी होत शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याच्या उद्देशाने 'झी २४ तास'तर्फे उत्सव बांधिकली या विशेष उपक्रम राबवला. 'झी २४ तास'च्या टीमने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन दिवाळी साजरी केली. 'झी २४ तास'चा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.