SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

24 तासांत चक्रीवादळ धडकणार? 3 राज्यांना इशारा, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट

बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या कमी दाब पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 26, 2026, 06:59 AM IST | Updated: Oct 26, 2026, 07:01 AM IST
Image Credit: maharashtra weather update
Join

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारपर्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होऊ शकते. त्याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र उन्हाचा चटका कायम असून उपसागरातील वादळी प्रणालीमुळं विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे. तर, उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात उन्हाचा चटका कायम असून गेल्या 24 तासांत अमरावती येथे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळतेय. आज 26 ऑक्टोबर रोजी निरभ्र आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळं विदर्भात मात्र पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणात 26 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे असेल. येत्या 2-3 दिवसांत दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत 26 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज नाही. नाशिकच्या घाटमाथा परिसरातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

26 ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असली तरी पुढील दोन दिवसांत काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर आंध्रसह शेजारी राज्यांत वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 140 राहू शकतो. रविवारी पहाटे हे कमी दाबाचे क्षेत्र ताशी पाच किमी वेगाने पुढे सरकत होते. मंगळवारी त्याचे रुपातंर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकले तर त्याचे नाव अर्णब असेल. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 115-125 किमी असू शकतो. हा वेग ताशी 140 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणजे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस होऊ शकतो. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES