• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट! रेल्वे नाही तर मेट्रो स्थानकाचं होणार नामांतर, CMO कडून अधिकृत माहिती

दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट! रेल्वे नाही तर मेट्रो स्थानकाचं होणार नामांतर, CMO कडून अधिकृत माहिती

दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 19, 2026, 15:49 IST|Updated: Nov 19, 2026, 16:01 IST
joinshare
दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट! रेल्वे नाही तर मेट्रो स्थानकाचं होणार नामांतर, CMO कडून अधिकृत माहिती
Image Credit: दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानक नाही तर मेट्रो स्थानकाचे नामांतर करणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराची माहिती समोर आल्यानंतर मनसे, शिवसेनेसह विरोधकांनी टीकेसह विरोध करण्यास सुरुवात केली होती. इतकेच नाही तर महायुतीमधूनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध होऊ लागला होता. यादरम्यान आता राज्य सरकारने दादर मेट्रोचे नामांतर 'चैत्यभूमी' करणार असल्याचे सांगितले आहे.

दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झालं आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी साठी सरकार तत्पर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांवर अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटोरिक्षांना प्रवेशाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील 5 ते 7 दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य कायम राखणे आवश्यक असून, या दिवशी उत्सवी स्वरूपाचे आयोजन टाळण्यात यावे. हा दिवस दुःखाचा असल्याने उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमाऐवजी अनुयायांसाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट अथवा त्यांच्या विचारांशी सुसंगत अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही इंदू मिल येथील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास सरकार तयार असून, उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, अनुयायांच्या सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी शक्य त्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्यात येईल. महापरिनिर्वाण दिन हा महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय बनसोडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @madhurimisal @iYogeshRKadam @BansodeSpeaks #Maharashtra #DevendraFadnavis #MahaparinirvanDin

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 19, 2026

 

इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अनुयायांना सर्व सुविधा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांना सुविधा देण्यासाठी शासन पूर्णपणे तयारी करत आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग आणि अन्य संबंधित विभागांनी एकत्रितपणे केलेल्या नियोजनातून दरवर्षी व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. समन्वय समिती व विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

मुंबईतील प्रवेश करताना महामार्गावरील टोल यापूर्वीच बंद करण्यात आला असून, महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis
Railway News
Mumbai Metro